Skip to main content

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/07/2010 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भा
काव्यरस

मिपाकरहो...कोणी आहे का ?

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 08/07/2010 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... मी वाटाड्या...असाच वाट चुकत असतो.. सध्या वाट चुकुन पुण्यात आलोय. शक्य असलेल्या सर्व मिपाकरांना भेटण्याची इच्छा आहे. ज्यांना शक्य आहे / आवडेल त्यांनी कृपया आपला नंबर व्यनी मधुन पाठवावा. मी संपर्क नक्की करीन. शक्य झाल्यास आपले खरे नावही सांगावे. धन्यवाद.. - वा

कारण हा आहे..........

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 08/07/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
डावा स्टँड....मॅच सुरु आहे ..तेवढ्यात "ए ***" अशी शिव्यांची लाखोली ऐकु आली की समजायचे .. पी टी एम ची मॅच सुरु आहे ..आणि रणवीर ने किंवा कार्लोस ने एखादा साधा पास सोडलेला आहे ...शिव्या देणारा पण अगदी स्टँड कडेला येऊन शिव्या देणार.. आणि तो ६ वर्षाचा पोरगा असो वा ८५ वर्षाचा म्हातारा ..त्याला तो खेळाडु सॉरी म्हणुन मगच पुढे जाणार ....... वरचा स्टँड ,मध्यभाग... हा भाग फुल्ल असला की समजायचे आजची मॅच दिलबहारची ..जीव तोडुन खेळावे तर त्यांच्यासारखे .. न खेळुन सांगतो कोणाला .. तालमीत रहायचे आहे ना ..
विशेष

शाही कुल्फी

लेखक गणपा यांनी गुरुवार, 08/07/2010 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत गावालाच मुक्काम असायचा. दुपारी उकाड्याने जिवाची नुसती काहीली काहीली व्हायची (फ्रिज वगैरे लाड तेव्हा गावाला नव्हते) आणि तेव्हा तो देवदुता सारखा यायचा. मगन आईस्फ्रुटवाला. त्याच्या कडे १० पैश्यांपासुन ते १ रुपया पर्यंतची वेगवेगळी आईस्पृटं/ कुल्फ्या असायच्या. लांबुनच त्याच्या सायकलची घंटी (देवळात असते ना तशी घंटा) कानी आली की आम्ही धुम घरात पळायचो. आजीच्या मागे कटकट करुन शेवटी २०-२५ पैसे पदरात पाडुन घ्यायचो. पण तो वर तो पठ्या पुढे निगुन हेलेला असायचा. मग माकडा सारख्या उड्या मारत आम्ही त्याच्या मागावर जात असु.

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/07/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला. सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो.

निवडुंग........

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 08/07/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
निवडुंग अपेक्षिले प्रेम फुलांचे वैर त्या सवे होते भाली, दूर सारले जरी काट्यांना प्रीति त्यांची नित्य लाभली प्रेम बहरले मग काट्यासंगे, रुतवण हवी हवीशी जाहली. निवडुंगा सम जाहले जीवन, नाजूक नाती विरून गेली फुलाचे बाग सुकतात कधीकधी निवडुंग फुले सदैव फुलती. गुलाब काटेरी फांदीवरचे, कुंतलांना नित्य सजवती. निवडुंग जाहला म्हणुनी तयासि, आस फुलाची गैर नसे. काटेरी झाडावरहि त्याच्या, धवल फुलांत टवटवी वसे. निरंजन वहाळेकर

मिर्ची चे लोणचे

लेखक नेहमी आनंदी यांनी गुरुवार, 08/07/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
लाल किंवा हिरव्या मिर्च्या १ किलो मीठ १५० ग्रम चिंच ३०० ग्रम तेल अर्धा किलो भाजुन कुटलेले तीळ १५० ग्रम मोहरीची पावडर ४० ग्रम जिरा पावडर २० ग्रम मेथी पावडर १० ग्रम शोप पावडर १५ ग्रम हळद १५ ग्रम हिंग आवडी नुसार कृती:- मिर्च्या उभ्या चिरुन घ्या.चिंचेचा कोळ तयार करुन घ्या.थोड्या तेलात मिर्च्या थोड