झाझिकी..
सध्या आमच्याकडे पारा ३५ अंशावर झेपावला आहे. युरोपातल्या मंडळींना कुठली इतक्या उच्च तपमानाची सवय? त्यात ह्या लोकांना घरात सिलिंगफॅन लावायला नकोत आणि ए सी ची आम्हाला गरज नाही म्हणतात.वर्षातून आठ दहा दिवस ३०/३२ अंश से.पर्यंत चढतं तपमान, उन्हाळ्यात २२/२५ अंश आणि एरवी तर सिंगल डिजिट किवा उणेच.. मग लागतात कशाला अशा गोष्टी? हा यांचा युक्तिवाद ३५/३७ अंश से. नी या उन्हाळ्यात अगदी हाणून पाडला आहे . मॉलमधली आइसक्रीम्स, दही पटापट संपायला लागले आहेत.
काल दुपारी त्सेंटा आजीकडे ह्याच गप्पा चालू होत्या. आजी म्हणाली ह्या हवेसाठी एकदम उत्तम रेसिपी म्हणजे ग्रीक झाझिकी ! आता हे काय प्रकर्ण आहे?
मिसळपाव
त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो.