Skip to main content

शिल्लक रव्याच्या लाडुचा शिरा

लेखक कुक यांनी गुरुवार, 18/11/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
रव्याच्या लाडुनचा शिरा. साहीत्य > रव्याच्या लाडु , साखर, तुप, दुध क्रुती > लाडुनचा चुरा २ वाटी घ्या. (लाडु कुसकरा) हा चुरा तुपावर परतवा. (हयात कमी तुप घाला लाडु बनवताना तुप घातलेले असेल त्या नुसार घाला. जर लाडुन मधे खोबरे असेल तर ते चुरा भाजताना जळणार नाही ह्याची काळजी घ्या.) दुध गरम करुन चुरा भाजलेल्या पातेल्यात घाला. साखर घाला. कमीच घाला कारण लाडुत असणार . काजु बदाम हवे असतिल घाला. गरम गरम खायाला द्या.

महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 18/11/2010 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ दुवा, अंबाजोगैहून २ वाजता निघालो खरे, पण मोठा प्रॉब्लेम झाला , त्यादिवशी private गाड्या दिसतंच नव्हत्या,जादा गाडी ४ ची होती,म्हणजे जर ती गाडी पकडली असती तर पोहोचे पर्यंत ११-१२ वाजले असते. मग काय २.१५ च्या "लाल डब्यात" कसे बसे चढलो ( तिथेच माती खाल्ली). ती बस already खच्चून भरलेली होती.... सुरु झाल्यावर कळलं , कि आपल्याला औरंगाबादच्या तिकिटात , Essel world ची सफर सुद्धा फुकटात लाभणार आहे.....खिळखिळेपणाचा कळस होती ती बस.... एवढ्या टिनपाट डब्यात पहिल्यांदाच बसलो होतो. पहिल्या १० मिनटातच सगळी हाडं ढिली झाली... त्यात बसायला जागा नवती...

कलर्स थीम हवी आहे.

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 18/11/2010 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
"कलर्स" या वाहिनीची थीम असलली (बासरी ) ओरिजिनल एम. पी. थ्री. स्वरुपात कुणाला नेटवर / अन्यत्र सापडली असल्यास त्याचा यु. आर. एल. येथे द्यावा अथवा ती थीम माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. आभारी आहे. इमेल : sonar.nimish@gmail.com .... माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या : http://thinknimish.blogspot.com

मी आणि नवा पाऊस

लेखक नीधप यांनी गुरुवार, 18/11/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली माझी कथा. --------------------------------------------------------------------------------- ‘‘कधी येणार तुझा मित्र?’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

सुरमई शाम (मां.) आणि वाङ्मयीन संध्याकाळ (शा.)

लेखक गवि यांनी गुरुवार, 18/11/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पीत असलात तर तीन पेग व्हिस्की (रॉयल च्यालेंज), पाव किलो मध्यम आकाराचा सुरमई, दोन मोठे चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला, चार तेवढ्याच आकाराचे चमचे तेल, थोडा रवा, थोडा मैदा, दोन चिमटी मीठ,एक चांगली म्युझिक सिस्टीम, आणि घरात बायकोचा अभाव हे सगळं जमवा. दोन चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला चार चमचे तेलात मिसळा. सुरमईच्या कापांना त्यात बुडवा. पूर्ण माखला की तसाच प्लेटमध्ये घालून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. मैदा रवा आणि मीठ मिक्स करून घ्या.

कागदाचा कपटा

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/11/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
कागदाचा कपटा मिश्र माध्यम.

एका हरण्याची गोष्ट

लेखक नीधप यांनी गुरुवार, 18/11/2010 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
परत एक जुनीच कथा. मी मिपावर येण्याच्या अगोदर लिहीलेली. --------------------------------------------------------------------------------------------------------------- तसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात. तोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही.