Skip to main content

.

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 01/12/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
.

हिरवा माज

लेखक विकास यांनी बुधवार, 01/12/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चेच्या शिर्षकावरून असे सहज वाटू शकेल की ह्याचा संदर्भ अनिभा (अनिवासी भारतीय अथवा त्याहूनही अधिक अमेरिका निवासी भारतीय) असलेल्या व्यक्तींशी आहे म्हणून. पण तसा तो नाही तसेच तो कुठल्या धर्माशी संबंधीतही नाही. तर "हिरवा" रंग ज्याच्याशी समांतर मानला जातो त्या पर्यावरणाशी आणि त्यात काम करणार्‍या भारतातील पर्यावरणवादी संस्थांशी आहे. आज हिंदूस्थान टाईम्स मधील "CAG sniffs scam in NGO funding" बातमी वाचली.

..

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 01/12/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
..

आई...मिटलेला श्वास - ११

लेखक गणेशा यांनी बुधवार, 01/12/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई...मिटलेला श्वास -१० अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी मनभृंग पोखरे विचारांच्या भिंती छ्प्पर हरविलेले घरटे विराण रडती अंतरीचे दाटता धुके भासांची स्मरणे मागे दग्ध भाव निर्मिते मायेचे सोवळे धागे -------- शब्दमेघ
काव्यरस

लेखन स्पर्धा २०१०

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 01/12/2010 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.

३३ कोटी देव........

लेखक स्पा यांनी बुधवार, 01/12/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
असे म्हणतात, किंवा मानले जाते कि हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत..... इतके देव? एका देशाची लोकसंख्या एवढी होऊ शकते... मला एवढीच माहिती हवी आहे कि आपल्याला जास्तीत जास्त २५ ते ५० देवांची नावे माहित आहेत ... मग बाकीच्या देवांचं काय? कुठल्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो काय?

अनादिसिद्ध हें आघवें ... होत जात स्वभावें ...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 01/12/2010 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी रिकामा वेळ सापडतो. सर्व कामं आटोपलेली असतात. पुढली कामं अवकाशाने केली तरी चालणार असतात. मस्त निवांत वेळ असतो. अशा वेळेस बसल्या बसल्या कधी एखादे गाणे गुणगुणतो, रेडीओ, सीडीप्लेअर लावतो अथवा टिव्ही लावतो. पण कधी कधी त्याचा कंटाळा येतो. मग उगाच टिवल्या बावल्या करण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचत बसतो. हे तर झाले नेहमीचे. पुस्तकातही सतत डोके घालुन वाचण्याचा कंटाळा आला की एखादे जुनेच वाचलेले पुस्तक मधुन मधुन पानं उघडत नजर टाकत, त्यातल्या एखाद्या वाक्यावर विचार करत बसणे हा माझा आवडता उद्योग.

बाबा !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 01/12/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पावसाळे डोक्यावरून गेले मोजू नये ईतकी वर्ष उलटली परंतु तुम्ही माझ्या आठवणीत सतत असता बाबा !! हे शपत कुणाला सांगायला हवे का ?? तुम्ही अचानक निघून गेलात असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !! आह्मी तर लहान होतो नि आईचे तर किती छान दिवस होते हौस-मजेचे आणि तुम्ही एकदम निघून गेलात अचानक !! किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व दुखाचा पहाड कोसळला आई नको त्या वयात म्हातारी झाली पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ?? माझी बायको मुले फक्त तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !! त्यांना काय वाटते ?
काव्यरस

रिक्तता.... शून्य

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/12/2010 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
या इंटर्व्ह्यूला मला एक प्रश्न विचारला गेला होता जो मला खूप आवडला कारण तो प्रश्न मला अतिशय "इनसाइटफुल" असा वाटला. प्रश्न हा होता की "तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करता?" जसे माणसाचे मित्र त्याच्याबद्दल बरच काही सांगतात त्याचप्रमाणे एखादा माणूस त्याच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करतो हे त्याच्याबद्दल खूप काही सांगून जातं असं मला वाटतं. आपण सगळेच जणं आपापला रिकामा वेळ कोणत्या ना कोणत्या कामांनी, विचारांनी भरून काढत असतो. कोणी नाना व्याप मागे लावून घेतो तर कोणी व्यसने, कोणी चांगल्या सवयी अंगी बाणवतो तर कोणी चिंता करत बसतो. नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे.