Skip to main content

तुला आपलेसे करावे किती ?...

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 05/12/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
तुला आपलेसे करावे किती ? जगावे किती ? मी ! मरावे किती ? किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? तुझी याद येते ! तसा तोल जातो सावरून मी ! वावरावे किती ? ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? चांदणे सारखे आज जाळू पहाते तुझे आज नसणे स्मरावे किती ? मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी" परक्या परी -हे झुरावे किती ? मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०
काव्यरस

बासुंदी......मदत हवी आहे...

लेखक मृगजळ यांनी रविवार, 05/12/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवड्यात बासुंदी करायचे ठरवले...कृती माहित नसल्याने तयार बासुंदी मिक्स वापरले...पण म्हणावी तशी टेस्टी नाही झाली बासुंदी...जर कुणी मिपाकर खवा बासुंदीची कृती जाणत असेल तर ...कृपया मदत करावी...

माझ्या देशात राहणाऱ्या बाबास ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 05/12/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?-- आपल्या मातीचा वास आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती नि ते गुळखोबरे …..
काव्यरस

मरण्यात अर्थ नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 05/12/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मरण्यात अर्थ नाही . संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही गंगाधर मुटे .....................................................
काव्यरस

सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 05/12/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ... गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,...

श्रीदिपलक्ष्मी दिवाळी २०१०

लेखक सरपंच यांनी शनिवार, 04/12/2010 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, श्री दिपलक्ष्मी दिवाळी अंकाची आंतरजालावरील आवृत्ती मिसळपाववरून सर्वप्रथम उपलब्ध करून देताना मिसळपाव परिवाराला आनंद होतो आहे. या अंकाची मृद्रीत आवृत्ती मराठी साहित्य जगतात प्रसिध्दच आहे मात्र आता हा अंक सर्वत्र पोहोचायला सहज होईल. खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारून हा अंक उतरवून (डाऊनलोड) घेता येईल.

नमस्कार मंडळी...

लेखक मृगजळ यांनी शनिवार, 04/12/2010 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तशी मिसळ पाव म्हणजे लहानपणा पासूनच माझा जीव कि प्राण...एन्जिनिएरिग नंतर पुण्यात आलो नोकरी साठी. मग काय "काटा-किर्र" , "नेवाळे मिसळ " यांच्या कडे जाने सुरु झाले...

सिंगल अ‍ॅन्ड रेडी टु मिंगल.. ;)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 04/12/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमसाकर मित्रांनो/मैत्रीणींनो.. बरेच दिवस म्हणजे खरंतर मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन हा विषय मनात घोळत होता; आज म्हणलं लिहुन टाकु.. साधारणपणे वय वर्षे १४-१६ पासुन आपल्या मनात किशोरसुलभ भावना यायला सुरवात होते, म्हणजे ते साहित्यीक वगैरे जे शब्द वापरतात ना, मोरपंखी इ. तश्या. पण आपण नक्की ठरवु शकत नाही की आपल्याला नेमकं कोण आवडतंय ते.. म्हणजे त्या वेळेला सर्वच भिन्नलिंगी (आणि समवयस्क) लोकसंख्या आपल्याला आवडत असते अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दर १५ दिवसांनी आपण प्रेमात पडत असतो..

व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..

लेखक गवि यांनी शनिवार, 04/12/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस.. दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान.. भेंडी गव्वार ललिता पव्वार.. ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका... हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..? हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..? दाद्या दाद्या खच्चून पाद्या.. एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा.. रामाच्या दु.. कानात ऊ..