Skip to main content

पुतिन बर्‍याचदा मुद्द्याचे बोलतात, आजही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 08/12/2010 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज रशियाचे पंतप्रधान (आणि खरेखुरे "बिग बॉस") असलेल्या पुतिनसाहेबांनी एक उत्तुंग षट्कार मारलेला आहे. वाचा इथे http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7065924.cms (पुतिन यांचे 'दस नंबरी' निवेदन वाचून/ऐकून चिनी नेत्यांनीसुद्धा टाळ्या वाजविल्या असतील.) पुतिन यांनी या आधीही यू-ट्यूबद्वारा असाच २०-२० छाप षट्कार मारला होता. तो दुवा सापडल्यास (नंतर) पाठवून देईन.

मोरपिसे....

लेखक भानस यांनी बुधवार, 08/12/2010 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला.

इतिहास

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 08/12/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न भोळी भाबडी, अगदी साधी. तुझ्या न माझ्या साथीची आयुष्याच्या वाटचालीची.
तु उघड्या डोळ्यांनी साकारतोयस, शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी. मी अन तु , अगदी भिन्न माणस. मी अधिर , आवेगी, तु शांत , संयमी. मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी. तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी. अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, त
काव्यरस

नरकयात्रा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 08/12/2010 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
सरणावर माझ्या नको ते लोक रडूनी गेले ओले लाकुड त्यामुळेच का पेटूनी गेले जीवंतपणी पाहीलेले स्वार्थी परके आप्तगण मी गेल्यावर माझ्याशी ते नाते सांगूनी गेले आयुष्यभर सिताफ़ीने ज्यांनी पै पै माझी लुटलेली सरणावर ही माझ्या ते अश्रू गहान ठेवूनी गेले जगताना एकटाच लढलो मी स्वता:शी ज्यांनी मारले तेच आज मज खांदा देवूनी गेले चंद्रासही माझ्या कधी ना डाग होता काही नजरेच्या निखार्‍यांनी आगीस ते भडकवूनी गेले संसाराच्या झोळीत होता स्वाभिमान जपलेला कोरड्या आसवांची आज ते भीक घालूनी गेले मिळेल त्या गोष्टीत कायम स्वर्गसुख घेत गेलो स्मशानात आज ते नरकयात्रा दाखवूनी गेले श्वासांसही न दिली अंतरे कधी जीवनात मी हुं

शिखर त्यांनी गाठलेले -

लेखक विदेश यांनी बुधवार, 08/12/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१| देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२| शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी कालच्या सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो |३| फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू झाकतो अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो |४| चोर अपराधीच येथे उजळ माथे मिरवती वेदना इतरां न होते तीच का कवटाळतो |५| बीज ते साधेपणाचे काल कोणी पेरले रोप भाऊबंदकीचे आजला सांभाळतो |६|

धान्यापासून बनवा दारू ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 08/12/2010 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
[निर्माण ग्रुपमधील .माझा मित्र त्रिशूल त्यातला छान कार्यकर्ता आहे .सर्वांनी धान्यापासून दारू ह्या विरोधात मोठे आंदोलन छेडले होते .त्यावरून हे रामायण ..!!] शेता मध्ये पिक येऊ दे पाउस पडून सारे कुजू दे मग बनवू त्याची दारू जरा खिसा भरू दे ....! बाजरीची दारू ज्वारीची दारू भाताची बी दारू बनवू दे जरा खिसा भरू दे ...! शेता शेता मध्ये लागुदेरे भट्टी देवा तुझी करतो मी सेवा जरा खिसा भरू दे...!
काव्यरस

धान्यापासून मद्यार्क..

लेखक गवि यांनी बुधवार, 08/12/2010 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
धान्यापासून मद्यार्क बनवण्याविषयी खूप ठिकाणी गेल्या दोन - तीन वर्षांत तीव्र प्रतिक्रिया येताहेत. माझ्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी भिजून/ पडून राहून/ कीड पडून वाया गेलेल्या / सरकार दरबारी किंमत न येणार्‍या धान्यापासून औद्योगिक उपयोगाचे इथेनॉल (पेय मद्य नव्हे) बनवण्याची योजना आहे , ज्याचा उपयोग पेट्रोलमधे मिसळून अ‍ॅडिशनल बायोफ्युएल म्हणून केला जाऊ शकतो आणि इतरही इंडस्ट्रीज (वैद्यकीय वगैरे) मधे वापरला जाऊ शकतो.

एकास तीन

लेखक अवलिया यांनी बुधवार, 08/12/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची कंपनी पर्यावरणाविषयी अत्यंत जागरुक असल्याने प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात तीन तीन झाडे आम्ही लावली असुन कायद्याचे पालन करण्यात कोणतीही कसुर केलेली नाही आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत पावडरचे थर थापलेली हसतमुख तोकड्या स्कर्ट बाह्या घातलेली बाहुली मान वेळावुन वेळावुन पत्रकार परिषदेत सांगत होती आणि एलसीडी प्रोजेक्टरवर दाखवत होती कंपनीच्या एमडीच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणाचे फोटो केलेल्या खर्चाचा हिशोब एकाला तीन झाडे घातलेले किलोलीटर पाणी इतके टन शेणखत वगैरे.. निर्विकार मनाने पत्रकार उतरवुन घेत होते कागदावर किंवा रेकॉर्ड करत होते मोबाईलवर दुसर्‍य

आला थंडीचा महिना

लेखक टारझन यांनी बुधवार, 08/12/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. दसर्‍याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला. त्यामुळे बर्‍याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले. त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . अरे नोव्हेंबरात काय पाऊस पडायचा असतो का? प्रत्येक ऋतुला चार-चार महिने वाटुन दिलेले असताना असं एकाने दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करुन वातावरणिक अवांतरगिरी करणं मला खरोखर न रुचणारं वाटलं.