६: पाउलखुणा
५ : मी ..एक स्त्री
प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत..
सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा
आणि मागोवा कशाचा ?.. कश्यासाठी ... ?
बहुदा तो आहे एक अखंड प्रवास
एका प्रश्नमालिकेतून, दूसर्या प्रश्नमालिकेत जाण्याचा
माझ्यासारखीच गुरफ़टलेली ही रात्र आहे ..
उद्यास्ताच्या रंगात न्हाऊनही
काळवंडली आहे बिच्चारी
माझे काय आहे मग त्यापुढे ?..
माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर
माझ अस्तित्वच संपत चाललय ..
पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच
मी जगते आहे..
मिसळपाव
