Skip to main content

६: पाउलखुणा

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 10/12/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
५ : मी ..एक स्त्री प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा कशाचा ?.. कश्यासाठी ... ? बहुदा तो आहे एक अखंड प्रवास एका प्रश्नमालिकेतून, दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्याचा माझ्यासारखीच गुरफ़टलेली ही रात्र आहे .. उद्यास्ताच्या रंगात न्हाऊनही काळवंडली आहे बिच्चारी माझे काय आहे मग त्यापुढे ?.. माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 10/12/2010 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत) राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे मला समजू नको भोळीभाळी रे ......॥१॥ कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार बोलीचालीत अंगार सखे, भरला गं तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥२॥ राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते? सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला मुरलीचा मोह नच पाडी रे मला समजू नको भोळीभाळी रे ......॥३॥ कृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग

राष्ट्रस्पाऊस

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 10/12/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत बरेच शब्द हे पुरुष वाचक आहेत जसे राज्यकर्ता , मंत्री , महापौर , ससा , मासा या शब्दांचे स्त्रीलिंगी शब्द मराठीत लिहिले जात नाहीत अर्थात बरेच शब्द हे स्त्री लिंगी आहेत त्यांचे पुल्लिंगी शब्द मराठीत नाहीत जसे: माशी वाटी पण त्यामुळे पंचाईत होते. यावर जायच्या अगोदर इंदीरा गांधी ना रशियन अधिकार्‍यानी त्याना काय संबोधले जावे अशी विचारणा केली "हर एक्सेलन्सी "की "हर हायनेस" किंवा "मॅडम प्राईममिनिस्टर" इंदीरा गांधी म्हणाल्या की त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यावर त्या रशियन अधिकार्‍याने विचारले की तुमचा स्टाफ तुम्हाला काय संबोधतो.

कुणा कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा ??

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 10/12/2010 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाकुणाचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा ? अगदी लहानपणापासून डोक्यात होते शिकवणारे ,सल्ला देणारे पोटभर होते आमच्या आदर्शांचे बाबा जब्लिंग झाले ....! कुठला आदर्श समोर ठेवायचा ..? सगळे गणितच चुकीचे झाले ..!! तुम्ही कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ? कृपया सांगाल का मला ? शाळेमध्ये गेलो नि मित्र आमचा आदर्श झाला ओठाचे वर्तुळ करून शीळ घालणारा लखू आमचा हिरो झाला कशी गिर गिर घालायचा मस्त शीळ कोठल्यातरी सिनेमाचे गाणे मस्त सोडायचा मस्त मस्त कसा स्वप्न बघायचा मान असा झटकायचा आम्ही बघतच बसायचो ओठ गोलगोल करून फक्त आम्ही हवाच सोडायचो शीळ अशी कधी घालता आलीच नाही मला मग तोंड पाडून आ
काव्यरस

धार्मिक स्थळं आणि.........

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 10/12/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी मुद्दामच शीर्षकात टिंब टिंब टिंब केलं आहे. माझ्या कडुन या विषयावर काहीही गंभीर लिखाणाची अपेक्षा करु नका, धर्म या बाबतीत मी खुप मोठा ढ आहे. मला लिहियाचं आहे, विविध धार्मिक स्थळं, ती असेनात का विविध धर्माची, तिथल्या खाण्याबद्दल. मग ते अन्नछत्रातलं असो नाही तर एच्छिक देणगी नाही तर सक्तीची वर्गणी देउन मिळालेलं असेल. ब-याचदा हे जाणवते की सत्यनारायणाचा शिरा हा नेहमीच्या शि-यापेक्षा जास्त वेगळा लागतो. घरी मधुमेह असण्यानं चमचाभर साखर खायला घाबरणारी माणसं देवळांत ३-३ वाट्या प्रसाद काही न वाटता खातात आणि जास्ती गोळ्या न घेता पचवतात सुद्धा.

हिंदू धर्म-वादग्रस्त विधाने

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 10/12/2010 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
लोकप्रभेच्या ताजा अंकात संदीप जावळे यांनी हिंदू धर्माबद्दल अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. http://www.loksatta.com/lokprabha/20101217/pratisad.htm मिपाकरांच्या प्रतिक्रीया वाचण्यास उत्सुक.

मिरची लोणचे..

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 10/12/2010 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-- एक पावशेर हिरव्या, ताज्या मिरच्या, एक केप्र किंवा इतर कोणतेही मिरची लोणचे मसाला पाकीट. एक वाटी मीठ, एक वाटी तेल, फोडणीचे साहित्य.लिंबे सहा -सात.
From

सावरकर आणि नास्तिकवाद

लेखक आमोद शिंदे यांनी शुक्रवार, 10/12/2010 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच मिपावर ने मजसी ने ह्या सावरकरांच्या अजरामर गीताची शताब्दी साजरी होत आहे त्या निमित्त काही विचार मनात आले. सावरकरांच्या विचारांचा चाहता असा एक मोठा गट मिपावर आहे जे मला नेहमीच सुखकारक वाटते. आजही त्यांची आणि त्यांच्या विचारांची आठवण नेमाने काढली जाते. पण त्याचवेळेस मिपावर भाविक/श्रद्धाळू असाही एक बहुसंख्य कल आहे. देवाचे अस्तित्व नाकारणारे किंवा श्रद्धावंताच्या भावनांना छेडणारे लेखन इथे नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरते. अशा लोकांना 'विचारजंत' वगैरे उपाध्याही मिपावरच जन्माला आल्या असाव्यात असे मला वाटते. तर अशावेळेस बहुसंख्य मिपाकरांना सावरकरांच्या नास्तिकवादा विषयी काय वाटते?