पचनसंस्थेतील वायूनिर्मिती
सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….
अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात.
शुभेच्छा २०२२
या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या पिसाऱ्याचा गुलाम होत नाही. हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल.
नवीन वर्ष आणि स्वयंसुधारणायोजना - तुमचा काय बेत??
प्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
नवीन वर्ष आणि स्वयंसुधारणायोजना आखणे, काही नवीन नाही.
सध्या माझा भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) वापर बराच वाढला आहे. त्यामुळे इतर शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु झाले आहेत आणि होत आहेत.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काही सुधारणा करणे आवश्यक आहे.
मी नवीन वर्षामध्ये भ्रमणध्वनीचा वापर कमी, म्हणजे ज्या कामांसाठी भ्रमणध्वनी लागतो अशीच कामांसाठी फक्त, करण्याचे ठरवले आहे.
----------------------------------
तुमची काय योजना आहे?
पर्यटकांचे आकर्षण - आयफेल टॉवर
आयफेल टॉवर – फ्रांसचे बोधचिन्ह. संपूर्ण फ्रांसमध्ये व्हर्सायपासून मार्सेलिसपर्यंत कितीही भव्यदिव्य राजवाडे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू उभ्या असल्या तरी फ्रांस हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर जी प्रतिमा उमटते ती असते केवळ आयफेल टॉवरचीच. पॅरिसमधून वाहणाऱ्या सेईन नदीच्या किनाऱ्यावर हा टॉवर उभा आहे. त्याच्या उभारणीला सुरुवात झाली, त्या घटनेला यावर्षीच्या सुरुवातीलाच 135 वर्षे पूर्ण होत आहेत.
फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पॅरिसमध्ये 1889 मध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने एका आकर्षक रचनेची उभारणी करण्याचे ठरले होते.
ध्रांगध्रा-३
" ते झाड मागे टाकून अर्धा तास झाला पुढे आलो आपण तु म्हणतोस तसा रस्ता कुठे दिसलाय? आपण पुढे तर नाही ना आलो? नाही रे . झाड मागे गेलं हे खरं, पण तुला वाटतं तसं ते वळण झाड गेल्यावर लगेच येणार नव्हतं तर थोड्या वेळाने नंतर म्हणजे थोडे आणखी चालल्यावर. आम्ही इतकं बोलतोय तोच समोरून कोणीतरी येताना दिसतय. लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी,हातात पिशवी. "कोण असेल रे?" हळू हळू तो माणूस आमच्या जवळ येतोय.मागील दुवा ध्रांगध्रा-२ http://misalpav.com/node/49721 "रामराम दादा " तो जवळ आला तशी महेशने त्याला हाक मारली.
लक्ष्मणपूर, एक पडाव......२
https://www.misalpav.com/node/49710
लक्ष्मणपूर, एक पडाव
मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद.
नोकरी मुळे सतत बदली नवे शहर नवे लोक तेव्हा कळाले की शहराचा इतिहास आणी भुगोल जाणून घेणे आवश्यक आसते. त्यामुळे शहराची प्रथम दर्शनी ओळख होते. शहरातील पारंपारिक खुणा (conventional signs ) जर लक्षात ठेवल्या तर त्या शहरा मधे सहज फिरता येते. सैन्यात "नकाशा वाचन (मँप रीडिंग) हा एक खुपच महत्वाचा विषय.
अस्तित्व - बालकथा
अस्तित्व
----------------------------------------------------------------------------------------------------------------
लोहगडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव . आमच्या छोट्याशा गावच्या छोट्याशा शाळेत एक पाहुणे आले होते. आबा . आम्हां मुलांना भेटायला. शिक्षणातून आयुष्य कसं घडवता येतं , यावर त्यांचं भाषण होतं . शिक्षणाच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते .
पावसाचे दिवस.पण पाऊस काही नव्हता.त्यामुळे आम्ही शाळेच्या मैदानातच होतो . लाल मातीमध्ये बसलेलो. तर आमच्या मागे, हिरवा झालेला लोहगड धुक्याची तलम पांढरी ओढणी पांघरून बसलेला.
राजा आणि इतर पोरांची बडबड चाललेली .
मिसळपाव