Skip to main content

चारोळी : नव्या वर्षाचा नवा थाट!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"नव्या वर्षाची सोनेरी पहाट मनामनांत आशेचे ढग दाट घेवूनी अंगावर चैतन्याची लाट चालावी आयुष्याची सुंदर वाट" आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!! -निमिष न. सोनार, पुणे
काव्यरस

अपेक्षा २०११ कडून

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ कडून माफक अपेक्षा
  • कांदे तोळ्यावर विकत घेण्याची वेळ येऊ नये. अगदी तशीच वेळ आल्यास कांद्यांचा तोळ्याचा भाव सोन्याच्या भावापेक्षा कमी असावा.
  • पेट्रोल रु. ११२/लीटर होऊ नये. तशीच वेळ आल्यास 'वर्क फ्रॉम होम' चा फतवा सरकारने जारी करावा. सगळ्यांनी घरूनच काम करावे, अगदी चितळे बंधूंनी सुद्धा!
  • डाळी, धान्ये विकत घेण्यासाठी बँकेचे कर्ज घेण्याची वेळ येऊ नये.
  • सुरेश कलमाडींचे राजकीय पुनर्वसन होऊ नये. त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचेच असल्यास त्यांना 'एनएसयुआय' च्या श्रमदान समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे.

हैप्पी ३१ स्ट

लेखक विनायक बेलापुरे यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)

नुसतेच !

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री उशिरापर्यंत काम करत असताना, माजघरातून अचानक कुजबुज ऐकू आली .... पाहिलं तर जुने कोपरे, कोनाडे स्वताशीच काहीतरी कुजबुजत होते ... कान देऊन ऐकल ... देत होते मला शिव्या काढत होते खोट ... गेली बरीच वर्ष त्यांना विसरून नुसतेच भरतोय खिसे, नुसतेच भरतोय पोट ... मला म्हणाले ... आठवतंय का तुझ रुसून कोपर्यात बसण ... आणि आई ने कान धरले कि गालात खुदकन हसण ... आता फार मोठा झालास ... घरातही वावरतोस साहेब म्हणून ... रुसलास कि काय बुआ...

कडेलोट !

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज वाटले इतक्या लवकर रात सरली ... आभाळ निळावले पण कुशीतून तुझ्या मोकळे होण्यास मन आळसावले ... सांगत होते अगतिक मन अजून फिटली नाही हौस झेलूदे चार हाताच्या ओंजळीत हा दवाचा पाउस झटकून मोकळे केस उठून लगबगीने कुठे जासी ? झालो आहे ह्या मोहरानात मी वनवासी ... शोधात होत्या अनंत काळ तुला माझ्या चुरगळलेल्या नजरा .. हातात उरला होता तुझ्या सुगंधाने घमघमणारा गजरा ... समजावले मनाला .. चला भरायचे आहे पोट ... पुन्हा एकदा ........ मी माझाच केला कडेलोट ...

अल्कोहोलिक कॅलोरीस

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद. ३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत.

नव्या वर्षांच्या शुभेच्छा

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 31/12/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो. दरवर्षी नेमाने येणारा क्षण आज पुन्हा येतोय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. नवी नवरी माहेराहून सासरी जाताना तिच्या मनात असते तशी हुरहुर आणि आनन्द अशा सम्मिश्र भवना घेवून आपण हे क्षण जगत असतो. सरत्या वर्षात काय गमावले /काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. लहानपणी १ जानेवारीला मी गेल्या वर्षी झोपलो ते एकदम थेट्या वर्षीच उठलो असे सांगायचो. ते खरे देखील होते. ३१ दिसेंबरला टीव्हीवर फारतर रात्री ११ पर्यन्त कार्यक्रम असायचे. गावात एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. ३१ डिसेंबर हा इवेन्ट झालेला नव्हता.

लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असते..........

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 31/12/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्श म्हणॆ लवासाला तु किती लाखाचा तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला तु किती कोटीचा एक घोटाळा म्हणे दुस-याला काडीने खाल्ले काय अन हाताने खाल्ले काय शेण म्हणजे शेण असते लाखाचा असो वा कोटीचा तुमचे आमचे सेम असते अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली.

२०१०: एक उत्तम वर्ष

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 31/12/2010 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा: क्रिडा: क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती.