Skip to main content

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

भारतरत्न लतादीदी व आशा ताई

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी बुधवार, 05/01/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
asha& lata आपल्या भारतरत्न लतादीदी यांनी twitter वर प्रकाशित केलेला फोटो ! (मी संग्रही केला) लतादीदी व आशा ताई एका मंगलक्षणी फुगडी खेळत असता !! मिपाकरांकरिता खास!!!@!!!!

दहशतवाद

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 05/01/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान भारताला एखाद्या कुत्र्यासारखा चावतोय. लचका तोडतो आणि मग भ्याडासारखा शेपूट घालून पळून जातो. १९९२ चे जबरी बॉम्बस्फोट, २६/११ चा रक्तपात, लोकल ट्रेनमधले आणि बेस्ट बसमधले बॉम्बस्फोट, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, संसदेवरचा हल्ला, जर्मन बेकरीतला स्फोट, हैदराबादचा स्फोट...काही विचारू नका. शिवाय जगभर धर्मांध अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तर संतापजनक आहे. ९/११ चा विमाने घुसवून इमारती पाडण्याचा अघोरी प्रकार असो की अजून कुठल्याही देशात होणारा रक्तपात असो, धर्मांध अतिरेकी जगाला बुडवायला निघालेले आहेत. सगळ्या देशांनी या 'जिहादीं'ची धास्ती घेतलेली आहे.

ओळख

लेखक चिप्लुन्कर यांनी बुधवार, 05/01/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो , शेवटी पुष्कळ प्रयत्न नंतर मिसळपाव वर प्रवेश मिळाला आहे . नव्या वर्षाची हि एक मला चागली भेट मिळाली आहे असे मला वाटते . सर्वाना आपली ओळख कशी करून द्यावी हे न कळल्या मुळे ओळखीसाठीच हा काथ्याकुट. तूर्तास इतकेच. महा - ०८ चिपळूणकर

किती वर्षाने असे निवांतपण ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 05/01/2011 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षाने असे निवांतपण स्वच्छ आभाळ नि असे मोकळेपण खिडकीवर बसलेली चिमणी नि तिचे एकटेपण खिडकीतून दिसणारे चिमणीच्या मागचे गुलमोहराचे झाड ते आभाळ तो ढगांचा शुभ्र कल्लोळ आभाळात शांत विहरणारी घार कसे शांत ,स्वच्छ निवांत ध्यान लावून बसलेय हे वातावरण बायको बसलीय देवघरात देवाजवळ काय मागतेय देवाजवळ कुणास ठाऊक ? चेहऱ्यावरचा शांत भाव प्रसन्नपणा सगळे मिळाल्याची तृप्तता तृप्तीचा हा अनोखा क्षण तो सेव्ह करून ठेवतोय कितीतरी वेळा सेव्ह न केल्यामुळे डिलीट होऊन गेल्यात कितीतरी घटना ,प्रसंग आयुष्याच्या ऊतरवंडीवरचे हे क्षण हे निवांतपण कोठे हरवून गेले ते क्षण ते सुख नि ते तारुण्य .
काव्यरस

तंदुर चिकन

लेखक जागु यांनी बुधवार, 05/01/2011 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच जणांचा मार्गशिर्ष महिना सुटला असणार म्हणून दाबुन ठेवलेली रेसिपी आज वर आणत आहे. लागणारे जिन्नस: चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे. मॅरीनेड करण्या साठी : घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा) लिंबु रस आल, लसुण, पुदीना पेस्ट मिठ लाल तिखट गरम मसाला रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर. तळण्यासाठी बटर किंवा तेल सजावटीसाठी कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी. क्रमवार पाककृती: चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा.

(घट डोईवर घट कमरेवर)

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 05/01/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा पी. सावळाराम यांची माफी मागून, घट सगळे धर चल सखये, नळ मोरीमधला बंद झाला, बंद झाला रे ॥धृ.॥ धुणि कशि होतील, अर्धीच र्‍हातील, जो तो आता रांगही लावील सर्व कुळाच्या संडासाला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥१॥ बघ तो वरचा भट शिंदळिचा, कितके घट तो आणि एकटा मध्येच लायनित तो घुसला रे, बंद झाला रे बंद झाला रे ॥२॥ नेलीस जोडी, भरे तेवढी तोवर करतो जिन्यात कोंडी छकुली तूही धर हा पेला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥३॥ मूळ गीत : घट डोईवर घट कमरेवर
काव्यरस

वृषभ रास / वृषभ लग्न

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 05/01/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
राशी चक्रातील दुसरी रास वृशभ. या राशीतील व्यक्तींबद्दल सांगताना बरेच जण ही रास शुक्राची रास असते. रसिक असते. वगैरे सांगतात. राशीचक्र कार्यक्रम करणारे शरद उपाध्ये सांगतात की वृषभ रास असणार्या व्यक्ती या आपल्या रहाण्याबद्दल फार काटेकोर असतात.

आई ची स्पेशल- भेंडी ची भाजी

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 05/01/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
हि भेंडी ची भाजी म्हणजे आमच्या आई ची 'स्पेशल' कॅटेगरी मधला पदार्थ. नेहमी ची भेंडी ची भाजी म्हणजे नुसतीच भेंडी परतून केलेली, स्पेशल भाजी म्हणजे - कांदा, टोमाटो, आलं आणि लांबट चिरलेली भेंडी. हि भाजी आईच्या खूप खूप मागे लागून मिळायची. आमची आई म्हणजे (अजून पण) केक, लाडू, बटाट्या चा कीस, साबुदाण्याचा चिवडा, करंजी इत्यादी पदार्थ आम्ही खूप हट्ट केला कि मगच करायची. आणि ते आम्ही म्हणायचो तेव्हा हमखास न करता अचानक कधी तरी करून आम्हाला सरप्राईज करायची.