पार्श्वभुमी :
हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व)
व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच .
त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.