Skip to main content

हिरवा पाचू

लेखक जागु यांनी शुक्रवार, 07/01/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.

बँकांची कृतघ्न्ता

लेखक चिप्लुन्कर यांनी शुक्रवार, 07/01/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसां पूर्वी एका " अ " बँकेच्या पैसे देणाऱ्या स्वयं चलित यंत्रातून मी रु १००० काढले पण त्या उदार यंत्रा ने मला रु १००० ऐवजी ५००० मात्र दिले आणि माझ्या खात्यातून रु १००० वजा केले. मी गडबडलो व जात्याच पापभिरू (?) असल्याने मी त्या ठिकाणच्या सहाय्यकाला शोधण्याचा प्रयत्न केला . पण तो मिळाला नाही . तसे ते यंत्रा वाशी ला स्टेशन च्या एका कोपर्यात आणि दुर्लक्षित जागी असल्याने वर्दळ कमीच होती पण नेमकी त्या वेळी इतर काही बँकेची यंत्र बंद झाल्याने त्या यंत्रा ला शोधात अनेक मंडळी तेथे आली. मी अनेक लाकाना खोटे सांगून तिथून फुटवले.

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/01/2011 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

थंडीपासुन बचाव

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 07/01/2011 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी सध्या मरणाची थंडी पडली आहे.. कुड कुड करत रात्रभर थंडी वाजते.. दातावर दात आपटतात दिवसा सुद्धा गारठा जाणवतो शरीर नुसतं गार पडतं. बोट वाकडी होतात नुसतं बसुन रहावंसं वाटतं असं वाटत की आता संपला कार्यभाग... छ्या ! या थंडीपासुन बचाव करण्याचे साधे सोपे, कठीण अवघड जे जे काही उपाय असतील ते सांगा बरे... आपलाच (गारचटलेला) नाना

कमाई

लेखक चिप्लुन्कर यांनी शुक्रवार, 07/01/2011 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
अरे **व्या , अजून कुठे आहेस ? वेळणेश्वर ला काय तुझा बाप येणार आहे का आत्ता ? विशाल ने जरा घुस्शात च फोन वर विचारले पण पलीकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्या मुले विशाल रागात गुहागर कडे निघाला. आज त्याचा २७ वा वाढ दिवस आणि तोच त्याला अमेय या बालमित्र सोबत वेळणेश्वर ला दोघांची लाडकी किंगफिशर पिऊन साजरा करायचा होता पण अमेय मात्र त्याच्या राणी सोबत गायब झाला होता.