Skip to main content

आत्मविश्वास

लेखक असुर यांनी गुरुवार, 10/02/2011 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं! त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं.

स्वप्न बघायला हरकत काय ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 10/02/2011 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम ..!!. प्रेम अगदी मस्त असते प्रेमाचे एक गाणे असते बाईकवर बसले की ते छान फुलून येते कळीचे फुल होते सुरवटाचे फुलपाखरू होते प्रेम अगदी मस्त असते कसे होते ..? कधी होते ...? ते कळते कोठे ..? हे सगळे नकळत होते म्हणून ते प्रेम असते शांत रस्ता छान ढग आता प्रवास छान होईल छान हवा गाणे गाईल गळ्यात असतात लडिवाळ हात गालावर रेंगाळतात अलगद श्वास ....!! हे खूप छान असते हे खूप छान वाटते मस्त मस्त हवा नि हवे तेवढे सुख मन तृप्त....
काव्यरस

गंध मायेचे..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 10/02/2011 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी! गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने
काव्यरस

वर्‍हाडी खिचडी

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 10/02/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवते, मी लहान असताना, मामाच्या गावाला गेले होते. माझे आजोळ म्हणजे, जळगाव मधील चाळीसगाव. तर, आम्ही सगळे माझ्या मामाच्या लग्नासाठी गेलो होतो. मी तेव्हा साधारण ३री मधे होते. लग्न लावुन आम्ही सगळे घरी आलो होतो. मी माझ्या मामे भावांसोबत खेळत होते. ते सगळेजण मला जेवायला घेउन गेले. तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा ही खिचडी खाल्ली. तेव्हा त्या सगळ्यांनी मला मसाले भात आहे असे सांगितले. मला आठवते, आम्ही सगळे अक्षरशः पराती मधे ही खिचडी घेउन मस्त ओरपली होती. तेव्हा पासुन ही वर्‍हाडी खिचडी माझा अगदी weak ponit आहे. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या मामीनी मला केळवण म्हणुन ही खिचडीच केली होती.

सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी

लेखक मुलूखावेगळी यांनी गुरुवार, 10/02/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
बरीच गाणी छान असत्तात पन तितकीशी कर्णोपकर्णी झालेली नसत्तात. आजकाल बरीच गाणी रीमिक्स झाल्यामुळेपण माहित झालेली आहेत.(चांगली आनि काही वाईट पण) उदा- बिन तेरे सनम,चांदनी रातें. मला माहित असलेली अशीच गाणी तुमच्यासोबत शेअर करतेय. (कदाचित तुम्हाला माहित असतील ही) १.हे लता मंगेशकरनी म्हणालेल्या अनेक गाण्यांपैकी वन ऑफ द बेस्ट आहे.दिल कही होश कही अल्बम मधले आहे. हेच गाणं कुमार शानुच्या आवाजात पण आहे. हे खुपच हार्ट टचिन्ग सॉन्ग आहे .हार्ट ब्रेक झालेल्यानी क्रुपया स्वतःच्या रिक्स वर ऐकावे किंवा ऐकु नये.

कोंबडी वडे

लेखक समई यांनी बुधवार, 09/02/2011 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
मला कोंबडी वडया ला लागणार पिठ द्ळुन आणायच आहे. माझ्या कडे आहे ति रेसिपि अशि आहे.. १ किलो तांदुळ-- धुवुन वालवुन घ्यायचा १ वाटि-उडिद डाळ - भाजुन १ वाटि चणा डाळ - भाजुन ३ चमचे धणे भाजुन २ चमचे बडीशेप भाजुन २५ ग्राम मेथ्या (भाजाय्च्या नाहित्...अजुन कडु होतात) २ मुठि गहु भाजुन वरिल सर्व एक्त्र द्ळुन अणायच थालिपिठाच्या पिठासारख.. या मध्ये अजुन काहि सुधारणा अस्तिल तर सांगा.. बाकि कोंब्डि वडे रेसिपि लवकरच फोटोसहित कोणि टाकल्यास आभारि आहे :):)

इग्नोबल पुरस्कार

लेखक विकास यांनी बुधवार, 09/02/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो? आपल्याला सगळ्यांना नोबेल पुरस्कार माहीत आहे. सोप्या शब्दात, त्याच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे इग्नोबल पुरस्कार. १९९१ साली हार्वर्ड-एम आय टी या दोन्ही विद्यापिठांतर्गत असलेल्या संस्था/व्यक्ती यांनी इम्प्रॉबेबल रिसर्च अशी संस्था चालू करून "discoveries that cannot, or should not, be reproduced" साठी म्हणून हा मजेशीर पुरस्कार चालू केला.