Skip to main content

अख्खा मसूर आणि दीड (शहाणे) आम्ही!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/02/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्‍यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्‍या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं. तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल.

"परराष्ट्र" मंत्री श्री. एस एम कृष्णा

लेखक विकास यांनी रविवार, 13/02/2011 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. एस एम कृष्णा यांनी नुकतेच "परराष्ट्र मंत्री" म्हणजे "परराष्ट्राचे" मंत्री पण ठरू शकतो हे अनावधानाने दाखवून दिले. झाले असे, संयुक्तराष्ट्र सुरक्षा समितीच्या सभेपुढे चर्चेदरम्यान बोलताना पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्याचेच भाषण साधारण तीन मिनीटे वाचले. युनो मधील भारतीय प्रतिनिधी श्री. हरदीप सिंग यांनी नंतर चूक लक्षात आणून दिली. अपेक्षेप्रमाणे माध्यमांना आणि विरोधीपक्षाला खुराक मिळाला. मात्र श्री. कृष्णा म्हणाले, "नॉट अ बिग डील! नथींग राँग".

विहीर - माझ्या मनातील...

लेखक अज्ञात यांनी रविवार, 13/02/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांनी आज गावाला निघालोय... तशी माझी दर महिन्याला चक्कर असायची गावाकडं, पण मागचे ६ ते ७ महिने काही जमलच नाही, मलेरियाने आजारी होतो आणि नंतर बराच वेळ अशक्तपणामुळे किवा कामामुळे जमलच नाही गावी यायला... खूप दिवसांनी आता सवड मिळाली म्हणून म्हंटल गावाला चक्कर मारावी, म्हातारीची ख्याली खुशाली पुसावी म्हणून निघालो. आमच गाव तस खूप प्रसिद्ध अस नाही... कोलवडी त्याचा नाव, तिथे जायच म्हणजे मोठा आणि कंटाळवाणा प्रवास असा करावा लागतो..

वांगी-टोमॅटो भाजी.

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 13/02/2011 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
https://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" एक वांगे आणी एक टोमॅटो या पासुन बनविलेली भाजी... आजच्या भाजीला नाव काय द्यायचे ह्या

तोतयांची, फक्त...

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 13/02/2011 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
कापल्या गेल्यांवरी तर मदार होती तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती समजले नाही मने करपली कशाने ? सूर्य होता माजला की दुपार होती.... नाचली होतीस तू थयथया कशाला ? हाक प्रेमाची जराशी... चिकार होती उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती माणसांची त्या वयेही उतार होती 'जीवही देईन प्रेमात आज माझा' मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ? साधनेला वेदनेची किनार होती

सती - मला भावलेली कथा...

लेखक अज्ञात यांनी रविवार, 13/02/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचण्यात आल. "देवचाफा" त्याचं नाव. विद्याधर पुन्द्लीकांच हे लघुकथांच पुस्तक आहे. त्यातल्या सगळ्याच कथा खूप सुंदर आहेत. पण नुकतीच वाचून झालेली कथा "सती" तिच नाव, हि मला खूप भावली. हि कथा ज्या पद्धतीने लिहिली आहे त्यावरून जे जाणवत कि एखादा ताक्तीचाच लेखक अस काही लिहू शकतो. हि कथा भावन्याच कारण म्हणजे पद्धत, ज्या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे. सदर कथा एक खूप नाजूक आणि धाडसी विषयावर भाष्य करते. ह्या कथेची रोचकता आणि सौंदर्य वाच्ल्याखेरीच समजणार नाही. हि कथा खूप नाजूक अशा विषयावर बेतलेली आहे. ह्या कथेची मांडणी खूप छान पद्धतीने केलेली आहे.