Skip to main content

वॅलेंटाईन वॅलेंटाईन

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 24/03/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे. "वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं.

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 24/03/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात.

ससा आणि कासव -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 24/03/2011 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा शुभ्र कापूस जसा इवला पिटुकला होता ससा लाजरा बुजरा भित्रा जरा अवखळ चपळ होता ससा एकदा मळ्यातून फिरता फिरता गेला तो तळ्याकाठी तडक इवल्या पिटुकल्या सशाला दिसला मोठा एक खडक खुदकन ससा मनात हसला ऐटीत खडकावरती बसला थोड्या वेळाने झाली गम्मत सशाला वाटली जम्माडी जम्मत खडक लागला हलायला ससोबा लागले डुलायला अचानक घडले तरी काय सशाचे थरथरले की पाय सशाला वाटले झाला भूकंप त्याच्या अंगाला सुटला कंप पाहिले त्याने पायाखाली जीव झाला वर खाली नव्हता पायाखाली खडक होती कासवाची पाठ टणक कासवाने हलवली हळूच मुंडी ससोबाची उडाली घाबरगुंडी धूम ठोकली सशाने मळ्यात कासव निघाले निवांत तळ्यात
काव्यरस

बातमी अर्थसंकल्पाची

लेखक मराठी_माणूस यांनी गुरुवार, 24/03/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
काल महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. आजच्या ईकॉनॉमिक टाईम्सच्या मुंबई आवृत्तीत , पहील्या पानावर ह्या बातमीचा कुठेही , अगदी दोन ओळींचा देखील उल्लेख नाही. केंद्रिय अर्थसंकल्पाच्या बातम्या भरभरुन छापणार्‍या ह्या वृत्तपत्राला , महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प ही पहील्यापानावर न छापण्याइतकी बिनमहत्वाची घटना वाटावी ? तेही महाराष्ट्राच्या राजधानीच्या अवृत्तीत ? हा नक्कीच खोडसाळपणा वाटतो , आर्थिक घडामोडिना वाहीलेल्या वृत्तपत्राने ह्या मोठ्या घडामोडिला महत्व न देण्याचे (पहील्या पानावर न छापता इतरत्र छापुन) दुसरे कारण काय

व्यापार

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 23/03/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
केला सुखाचा व्यापार दु:ख झाले, तोटा झाला झोळीभर पश्चाताप, खरा दाम खोटा झाला ! देवा, जगणं रुचंना काय करावं सुचंना भल्या सुपीक डोक्याचा नर्मदेचा गोटा झाला ! तोंडावर लाडीगोडी पाठ फिरताच खोडी असे ग्राहक भेटले, ठकसेन छोटा झाला ! जमा अक्कलखात्यात, तुझी सावकारी त्यात हात बुद्धीचे गहाण, उभा जन्म थोटा झाला ! कधी केली ना लाचारी, आज देणेकरी दारी ऐकती ना विनवण्या गोंधळ वांझोटा झाला ! खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य झोकून झाले भणंग, भिकारी मुद्दलात तोटा झाला !

साखरांबा

लेखक रेवती यांनी बुधवार, 23/03/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी. कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा. कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा. झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली.