जर तू असता तर
जर तू असता तर
तुला दिसले असते
सुरे घेतलेले हात
कल्ले कापलेलं शरीर
निळ्याशार पाण्यातला लाल ढग
तुला दिसले असते
अजस्त्र शरीरावरचे
निर्जीव भासणारे डोळे
दिसलीही असती त्यात वेदना
पण नसती दिसली दया याचना
जर तू असता तर
तुला दिसले असते
काळे पिवळे पट्टे
आणि त्यावर लाल जखमा
भेदरलेले गोड बछडे
आणि जमिनीवर आपटलेली शेपटी
दिसले असते तुला
थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे
क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा
पण तुझ्या प्रार्थनेची वानवा
जर तू असता तर
तुला दिसले असते
कुर्हाडीचे घाव सोसणारे
महाकाय मूक वृ़क्ष
चूड घेतलेल्या हातांनी
पेटवलेले भीषण वणवे
उघडे बोडके डोंगर
त्यावरचे तुझे मंदिर
आणि हातापाया न पडता
समोर कोसळणारी झाडे
सूर्यास्त
त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा
जरासा सौम्य झाला काय आणि
सगळा नूरच पालटला.
रंगांच्या उत्सवात
तारकांच्या मांडवात
तो उभा होता क्षितिजावर
स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात.
काव्यरस
जवाहिरीचा खात्मा
लादेनचा खात्मा झाला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आता कधी एकदा त्या नं. २ ला संपवतो असे झाले होते. त्यांनी लगेच सुरक्षा समितीची बैठक बोलावली. परत तीच युक्ति वापरता येणार नाही यावर एकमत झाले. मग पर्यायी उपायांचा विचार सुरु झाला. बाँबिंग, ड्रोन हल्ला, कमांडो हे सगळे मार्ग आता परिचयाचे झाले होते, त्यामुळे शत्रु आता जास्त सावध असणार हे नक्कीच होते. नवीन काय करावे याचा उहापोह सुरु झाला. सीआयए च्या प्रमुखाने सुचवले की याबाबत भारताची मदत घ्यावी. राष्ट्राध्यक्षांसह सर्वांनीच विरोध केला.
अभिष्टचिंतन.... आणि अर्थातच 'प्यार्टी' ची मागणी.
मिपावरील अत्यंत उत्साही,
सळसळते, भटके आणि कट्टोत्सुक कार्यकर्ते,
उदयोन्मुख होऊन बराच काळ लोटलेले आणि ज्येष्ठ होऊ घातलेले,
मध्यम- निम्नउच्चवर्गीय जीवनाच्या वास्तवाची प्रखर जाणीव करुन देणारे लेखक,
मिपावरील स्त्री सदस्यांची विशेषत्वाने काळजी करणारे आणि मोलाचे सल्ले देणारे भावोजी
५० फक्त अर्थातच हर्षद छत्रपति यांना
'ढ' दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!!
-शुभेच्छुक.
प्यारे (सक्रिय सदस्य, खव उपामं)
धमु ( उपाध्यक्ष, खव उपामं)
... ( खव उपामं अध्यक्षांची परवानगी नाही मिळाली अजून)
वल्ली (संस्थापक, भटकंती ग्रुप)
वपाडाव ( सदस्य, विवाहोत्सुक तरुण मंडळ)
टारझन (हॅहॅहॅ)
;)
तुझी आठवण येते....
तुझी आठवण येते....
कितीही विसराव अस म्हणालो तरी,
का..? कुणास ठाऊक पण...।
तुझी आठवण येते....
एकट्यानेच चालताना वाटेवरूनही,
तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर,
आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
कुठून तरी एखादा आवाज कानी येतो
खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो,
आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...।
का..?
एक संध्याकाळ अशी....
एक संध्याकाळ अशी....,
गजबजाटात हरवलेली ।
गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत,
हसत-खेळत घालवलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
दुःख सारे ते विसरलेली ।
सुखद साजिऱ्या क्षणांनी,
तुडूंब भरून वाहिलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
डोळ्यां मध्ये ह्या साचलेली ।
मिटूनयेत म्हणता डोळे,
ओघळुन खाली ती सांडलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
खाण्या-पिण्यात गुंतलेली ।
टेर खेचत एक-मेकांची,
हास्य-विनोदात गुंगलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
रंगात साऱ्या ह्या रंगलेली ।
रंग..संगतीत मिसळून असे हे,
चित्र देखणे ते साकारलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
खेळ काळाचा....
थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्ष्यात येईल...
की... आपलं हे आयुष्य फक्त,
तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं ।
जसं भूत आणि भविष्या मध्ये,
हे वर्तमान घुसमटत असतं ।
ह्या तिघां मध्ये चालू असतो एक अजबच खेळ...
वर्तमान धावत असतो जणू,
भविष्यास त्या गाठण्या साठी ।
पण भूत अडवून धरतो त्यास...,
भविष्यात त्याने ह्याला विसरूनये ह्यासाठी ।
पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ...
वर्तमान जातो थकून,
धावता-धावता त्या भाविष्या कडे ।
मग भूत येऊन म्हणतो त्यास...,
थकला असशील तर..
मिसळपाव