Skip to main content

वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण....

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/05/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, वसंत बहरला पानोपानी । लाली धरली गुलमोहरांनी ।। कंठ आला कोकिळेला । रुंजलेकवि शब्द गंधाला ।। कविराजांनो अणि राणींनो, आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्.... आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण - Beer आपण फक्त इतकेच करायचे आहे - जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा - जेणे करून आपला परिचय त्यात

सिनामन रोल्स (cinnamon rolls) ....

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 17/05/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त तोंडावर आलेला वीकेंड ..मस्त मोट्ठा मग भरून स्ट्रॉंग चहा आणि हे दोन अप्रतिम cinnamon rolls! दालचीनीचा मस्त अरोमा..गरम गरम चहा.. नक्की काय कशाला compliment करतंय हे सांगणं मुश्किल! आणि आगामी दोन दिवस सुट्टी..... सू sssssssss ख... बाकी चहाचं तुम्ही बघा!

गृहिणीच "सोप्प "लाईफ

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 17/05/2011 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
गृहिणीच "सोप्प "लाईफ
सकाळ झाली गजर वाजला, निवांत झोपलेला जीव माझा दचकून उठला , वाटल होत आज जरास उठाव उशिरा ,नवऱ्याच फर्मान होऊन जाऊदे आज बदाम शिरा , बेल एकदाच वाजवायची असते हे दुधवाल्याला कळत नाही , दार उघडेपर्यंत त्याच बेलवरच बोट ढळत नाही,
छोट्या सोन्याला उठवायची रोजची आहे कसरत झोपेत असतो तरी नेम धरून लाथा मारतो , त्याला उठवायची नाही होत लवकर हिम्मत सकाळच्या या गोंधळात छोटी छकुलीही उठते माझ्याकडे इवले हात पसरत मम्मा मला घे न ,घे ना, करत माझ्यामागे फिरते , दोन चार दात तिच्या तोंडात तरी ब्रश करण्याची तिला घाई

दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 17/05/2011 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल. ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो.

मन उगाच भरकटते -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 17/05/2011 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे सर्व कामं आटपून हातात वर्तमानपत्र घेतलं . कुठेतरी कुणीतरी आंदोलन केलं होतं , त्याचा पाठपुरावा म्हणून आंदोलनाविषयी सविस्तर बातमी आली होती . माझी नजर त्या बातमी मधील चौकटीवर खिळली होती. आंदोलन 'संपवण्या'साठी आतुर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचे छायाचित्र त्या चौकटीत दिसत होते. त्यात पोलीस कुणाच्या पाठीवर , कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर - हातातील काठीने जमेल तसा (त्वेषाने-) मार देतांना दिसत होते ! एका बाजूला पाठमोरा बसलेला एक मरतुकडा ज्येष्ठ नागरीक दिसत होता. ' अहो पोलीसदादा , मी नुसता या बाजूने चाललो होतो, माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही हो!

एडसचा जीवघेणा पाश

लेखक पिंगू यांनी मंगळवार, 17/05/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली. ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो. मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो.

मटण बिर्याणी

लेखक शोनू यांनी सोमवार, 16/05/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ५ तास लागणारे जिन्नस: दोन ते अडीच पाउंड मटण वाटण क्रमांक १ -६-७ पाकळ्या ( अमेरिकेत मिळणार्‍या , जाड्या पाकळ्या ) लसूण + इंचभर आले एकत्र वाटून -३ टेबलस्पून दही -अर्धा टी स्पून हळद -२ टीस्पून मीठ वाटण २ -१५-१६ सुक्या मिरच्या -मी ब्याडगी मिरच्या वापरते - या फारशा तिखट नसतात -८ काळे मिरे , ८ लवंगा -अर्धा मध्यम कांदा -६-७ पाकळ्या लसूण -१ इंच आले -१टेबलस्पून खसखस -१ छोटा तुकडा दगडफूल -चिमूटभर शहाजिरे -एक टेबलस्पून धणे -एक टीस्पून जिरे -चण्या एवढा जायफळाचा तुकडा -१ तेजपान -२ इंचाचा दालचिनिचा तुकडा -६ हिरव्या वेलची -असल्यास ४-६ तुकडे जावित्री. चार मध्यम कांदे बारीक चिरून २-३ प्लम ट

मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 16/05/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १ http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २ ************************************************************** काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली.