शाप
माझ्याच जवळच्या माणसाने माझ्या मनाच्या हळव्या-दुखर्या वर्मावर वार केल्यावर..... यथावकाश मी अंतर्मुख झालो. या सगळ्या वेदनांचे पुढे काय होत असेल ? त्या कुठे जात असतील ?
माझ्या मनाच्या भिंतींवर, जागोजागी लटकणारी चित्रं मला आठवली.. त्यातली कुरुप बीभत्स चित्रं उघडीनागड्या लावसटींसारखी माझ्यावर धावुन येत होती, जणु त्यांचेच अस्तित्व त्या चार भिंतीत राज्य करते असे ठसवायचा प्रयत्न करत होती. वेदनांची अशीच कुरुप चित्रे होत असावीत.
मिसळपाव