Skip to main content

आई गं! काय ती जळजळ!

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 06/06/2011 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
जळ-जळणे, आम्लपित्त, घश्याशी येणे, अ‍ॅसीडीटी मुळे पोटात/छातीत दुखणे- काही वर्षांपूर्वी ही लक्षणं फक्त पन्नाशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये आढळून येत होती. पण गेल्या काही वर्षात दिवसंदिवस तरुण वयोगटात पण अ‍ॅसीडीटी चा विकार वाढत चाललाय. असं अचानक कसं झालं? हे अचानक झालेलं नसून बऱ्याच वर्षांपासूनच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्यामुळे झालंय. शाळेत असे पर्यंत रोज दिवस भरात ६ वेळा खाणारी मुलं, कॉलेजला गेल्यावर फक्त चहा/कॉफी, पफ/पॅटीस व इतर जंक फूड आणि वरचेवर बाहेरचं अन्न खायला लागली. स्लिम फिगर च्या नादात तरुण मुलींनी 'ताटभर जेवण म्हणजे विष' असल्यासारखे त्याचा बहिष्कार केला.

दिसभर उन्हातान्हात

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/06/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिसभर उन्हातान्हात
दिसभर उन्हातान्हात तोड केली जंगलाची बाभळीचा काटा रुतला धार काढली रक्ताची जीव जगवला खावून कोरडी भाकरी चटणी तहान भागवाया आहे ओढ्याचे पाणी साता महिन्यांची घरधनीन पोटूशी तिला कसं आनू संगती? ती तर पोटाने उपाशी मोळी वाळल्या लाकडांची जाईल का विकून? तेल मिठ मिरची आणायाला पैसं मिळलं का त्यातून? - पाषाणभेद (दगडफोड्या) ०६/०६/२०११

अवलिया

लेखक निल्या१ यांनी सोमवार, 06/06/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅंक पापा या माणसाची माझी पहिली गाठ झाली ती ऑफिस मध्ये. बरेच दिवस आमच्या टीम मध्ये एक कॉन्ट्रॅक्टर येणार येणार अशी चर्चा रंगत होती आणि एक दिवस माझ्या शेजारच्या क्यूबवर पाटी लागली. फ्रॅंक पापा. नाव वाचून थोडं हसू आलं. मनात म्हटलं बघुया किती दिवस टिकतो? कॉन्ट्रॅक्टर आला की सगळे आधी संशयाच्या नजरेनेच पाहतात. बरेच देसी कॉन्ट्रॅक्टर्स नवीन प्रोजेक्ट्वर थोडं दबकत दबकतच काम सुरु करतात. हे प्रकरण जरा निराळंच दिसलं. दुस-याच दिवशी सकाळपासूनच बाजुच्या क्यूब मधून फोनवर विविध संभाषणे आणि गंभीर चर्चा ऐकायला यायल्या लागल्या.

मासे २७) वडा

लेखक जागु यांनी रविवार, 05/06/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा. नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या.

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

लेखक विकास यांनी रविवार, 05/06/2011 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते.

चैत्य-भुमी की दादर आणि नामान्तरचा घोळ !!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी गुरुवार, 02/06/2011 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्य-भूमीला कसली मरणाची गर्दी होती यार ! अरे भैईया वो चैत्यभुमी मे उतरके चौपटीके चैत्यभुमी कोनसी बस जाती है ! चैत्य-भूमीच्या ब्रीजवर आलोकी गर्दिने धडकी बसते ! ---------------------------------------------- अशी वाक्य आता सहज एकू येऊ लागतील , दादर स्थानकाच चैत्य-भुमी नामकरण करण्याचा मानस काही दादा मंडळींनी जाहीर केल्यापासून अनेक आठवणींना उजाळा मिळाला. मराठवाडा विद्यापीठाच नामांतर काय किवा वी-टी ते सी-एस-टी काय प्रत्येक नामांतर कालांतरांनी स्वीकारले गेले , तस कदाचित हे ही स्वीकारले जाईल.

गंमतच आहे

लेखक शरद यांनी गुरुवार, 02/06/2011 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
झाडातून झाड ? आपणा सर्वांना बांडगुळे माहीत आहेत. एका झाडाच्या फांदीतून उगवलेले दुसरे झाड. बांडगुळ मूळ झाडाच्या फांदीतून अन्नरस शोषून घेते व स्वत : वाढते. पण तुम्ही अशी झाडे पाहिली आहेत कां की जात दोनही झाडांची मूळे जमीनीत आहेत पण एका झाडाचा बुन्धा दुसर्‍या झाडाच्या बुन्ध्यातून वाढला आहे व दोनही झाडे चांगली वाढलेली आहेत ( व अजूनही वाढत आहेत) ? अशी दोन झाडे पुणे विद्यापीठाच्या आवारात आहेत. मुख्य इमारतीच्या शेजारच्या हिरवळीच्या कडेला एक चांगले ३०-४० फूट उंचीचे गुलमोहराचे झाड आहे. व त्याच्या बुन्ध्यातून दुसरे पिंपळाचे झाड उगवले आहे. पहिल्या चित्रात दोनही झाडे लांबून दिसतात.

तसा प्रत्येक दिवशी मून येतो

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 02/06/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल तसा प्रत्येक वर्षी जून येतो तसा प्रत्येक दिवशी मून येतो तझ्या वाचूनही हनिमून येतो फिकटसे चेहरे स्मरतात काही पुन्हा नोस्ताल्जिया गडदून येतो कुणी नाही, कुणी चिटपाखरूही अशा वाटाच मी पाहून येतो कुणी आहे तिथे, बेचैन आहे किती आवाज हा आतून येतो तिच्या मौनातली उद्गारचिन्हे असा का हा बरे थांबून येतो? कसे सांगू तिला मी काय होते इथे कोणी कधी सांगून येतो? हवेला हुंगतो मी आणि म्हणतो अरे हा वास गुत्यातून येतो मला ढोसायचे नसते तरी पण तिथे, जातो पुन्हा ढोसून येतो!! स्वतःचा भार सोसेना स्वतःला किती हा देह ओथंबून येतो अ