Skip to main content

तंबाखू

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 21/06/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
०===तंबाखू===० ओठ बरेचदा बदलतो पण तंबाखू सुटत नाही डावीकडचा फाटलाय हे,उजवीकडच्याला पटत नाही तोंडही जुन्या चाळीसारखं तंबाखू म्हणजे बिह्राडकरु ओठांसारख्या मोकळ्या खोल्या ईकडे भरु का तिकडे भरु? भाडेकरुंचं प्रेमही अजीब.. रहायला चालते कुठचीही खोली एकीकडचा उडाला चुना.. की लगेच दुसरीकडे रहायची बोली दारुवाल्यांना म्हणतात तळिराम त्यांचा सगळा साजच मोठा.. आंम्हालाही म्हणावं मळिराम आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा आंम्हा दोघांची एकच गल्ली त्यांना झाकुन आंम्हाला काढा त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा रस्ता वेगव
काव्यरस

वेगळी माझी खोली

लेखक काव्-काव् यांनी मंगळवार, 21/06/2011 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
बाबंकडे हट्ट करून घेतली वेगळी माझी खोली आतातर मी मोठा झालो, ४ वर्ष पूर्ण झाली दंग-मस्ती करतो, ठेवतो खेळणी पसरून सारी एकटे खोलीत राहण्याची, मजाच काही न्यारी वेगळी माझी खोली, वेगळी माझी कॉट माझे छोटेसे कपाट, असा माझा थाट छोटीशी खिडकी, त्याला छोटेसे दार थोडे दार उघडले, तर वारा येतो फार मी माझ्या खोलीत मोठ्या ऐटीत राहतो संध्याकाळी दुध पिताना खिडकी बाहेर पाहतो काऊ करतो कावकाव, चिऊ गोड गाणे गाते खारुताई मारते उडी, तेव्हा खूप मजा येते बागेत खेळून घरी येताच मी माझ्या खोलीत येतो रात्री जेवण होताच माझ्या कॉटवर झोपू पाहतो मला झोपच येत नाही, रात्री थंडी पडते गार किर्र काळोख होतो, मला भीती वाटते फार

कित्ती लागली मला भूक

लेखक काव्-काव् यांनी मंगळवार, 21/06/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती लागली मला भूक खायला दे खूप-खूप-खूप वरण-भात, लिम्बू तुप खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप कित्ती लागली मला भूक खायला दे खूप-खूप-खूप मसाले-भात, टोमेटो-सूप खूप-खूप-खूप, खूप-खूप-खूप पोटात बसलाय भस्मासुर भुकेला माझ्या आलाय पूर बाबा म्हणतो दानासूर आई म्हणते बकासूर जेवढे खाइन तेवढे थोड़े कांदा भजी, बटाटे वडे बिनचूक म्हणतो सगळे पाढे चोकलेट मागतो बाबाकड़े सगलेच मला आवडते गोड़, तिखट, आंबट, कडू सगलेच मला कमी पड़ते शेव, चकली, चिवडा लाडू कित्ती खाशील लेका तू? आई माला रागावते म्हणते.. सगळेच संपले घरातले आता शेजारून मागवते पण, आई तुला खर्र..

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 21/06/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.

तुम्ही नकळतपणे धर्मांतराला मदत करत आहात का?

लेखक आंसमा शख्स यांनी मंगळवार, 21/06/2011 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ड व्हिजनच्या लोभसवाण्या जाहिराती आपण सर्वजण पाहत असतो. त्या निरागस चेहेर्‍याच्या मुलांना मदत करण्याची इच्छा आपणा सर्वांनाच होते. यांच्या जाहिराती महत्त्वाची संकेतस्थळे, बरेचसे कॉर्पोरेट इव्हेंटस ते चक्क जेट एयरवेज मध्ये फिरणारा डोनेशनचा डबा येथ पर्यंत दिसतात. मी ही अशाच एका निरागस चेहेर्‍याच्या मीना नावाच्या मुलीला मदत देण्याच्या निर्णयावर येणार होतो. पण पैसे देतांना आधी हात भाजले आहेत म्हणून जरा खात्री करण्यासाठी माहिती घ्यायला सुरुवात केली. मला मिळालेली माहिती तुमच्या पर्यंतही पोहोचावी म्हणून हे लेखन करतो आहे.

इमरती / जांगरी

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 21/06/2011 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः उडदाची डाळ - १ वाटी तांदुळाचे पिठ - १/२ वाटी साखर - १ वाटी पाणी - १ वाटी वेलची पावडर - १ चमचा केशर - १/४ चमचा खायचा लाल रंग - १/४ छोटा चमचा तेल तळण्यासाठी मिठ अगदी चिमुटभर कृती: १. उडदाची डाळ ८ तास भिजवुन ठेवावी. भिजवलेली डाळ मऊ वाटुन घ्यावी. २. ह्यात १/२ वाटी तांदुळाचे पिठ टाकुन हाताने निट फेटुन घ्यावे. ह्याच पिठात मिठ व खायचा लाल रंग टाकुन मिक्स करुन घ्यावे. ३. एका पातेल्यात १ कप साखर व १ कप पाणी घेउन, त्याचा १ तारी पाक करावा. ह्या पाकात वेलची पावडर व केशर टाकावे. ४. एका खोलगट pan मधे तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे. तेल हे जास्त गरम नाही झाले पाहिजे. ५.

देरसू उजाला

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 20/06/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
जे जंगलात हिंडतात, ट्रेकींग करतात, त्यांना भावणारा हा सिनेमा. मला तरी हा बघितल्यावर रात्रभर झोप आली नाही. देरसूची शप्पत !

दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात.

  1. पाडस नावाचे पुस्तक आणि
  2. देरसू उझालाची सी. डी.

देरसू उझाला

   

कोळंबी भात

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 20/06/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दीड वाटी बासमती तांदुळ स्वच्छ धुवून, निथळून ठेवणे दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी (किंचित मीठ, हळद व लिंबाचा रस लावून ठेवावी) ३ वाटया नारळाचे दुध २-३ टेस्पून आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट १ टेस्पून लाल तिखट १/२ टेस्पून गरम मसाला १/२ टेस्पून धणेपुड १/४ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १ टीस्पून शाहीजिरे किंवा साधे जिरे ४-५ लवंग २-३ दालचिनीच्या काडया २-३ तमालपत्र २-३ हिरवी वेलची तेल .

पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 20/06/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न? राजकीय वनवासात आणि स्वत:हून पत्करलेल्या (?) हद्दपारीत तीनपेक्षा जास्त वर्षे काढल्यावर मुशर्रफना पुन्हा राजकारणात पडून पाकिस्तानचे अध्यक्ष व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत असे दिसते. सत्तेची नशाच तशी असते!