Skip to main content

काशीतल्या आठवणी - १

लेखक ईश आपटे यांनी गुरुवार, 28/07/2011 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाराणसीला जायच बरेच दिवसा पासुन मनात होते. एकदा गंगास्नान करुन सर्व पापांपासुन मुक्ती मिळाली की झाल. असो गंगास्नान तर झालच पण काशीला फिरण, जुनी जुनी मंदिर पाहण, जुनी पुस्तक पाहण, तत्वज्ञान-धर्म ह्यातील कुणा ताकदीच्या इसमाला भेटण असे बरेच उद्देश होते. पण काही कारणान पुढ पुढ जात राहिल. आणि गेलो तर किमान आठ दिवस तरी राहायच ठरवल होत. ट्रॅव्हल कंपन्यांसारख २ दिवसात स्पॉट उरकण्याच्या वृत्तीचा मला प्रचंड तिटकारा आहे. तुम्हाला त्या शहराच फिल ह्यायला हवा. जो बर्‍यापैकी दिवस तेथे राहिलात तरच येतो. भारतीय लोकांची प्रवास करण्याची मानसिकता उरकण्याची असते.

गात येथे तू उगा का थांबलेला

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/07/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
गात येथे तू उगा का थांबलेला वाहवा तो करुन मारा पेंगलेला ! जाउ दे त्याला किती उंचावरीही - दोर आम्ही नीट त्याचा कापलेला तोंड भरुनी मानलेला जो सलोखा पाठ फिरताना गळा का दाबलेला ?
काव्यरस

या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे ?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 28/07/2011 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#

मिपा कट्टा, ३० जुलै

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी गुरुवार, 28/07/2011 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरहो, आमचे मित्र सूड यांनी नुकताच काढलेला शतकी धागा वाचनमात्र झाला आहे. त्यामुळे कट्ट्याचे नक्की काय होणार हे कुणालाच कळले नाही. ते सांगण्यासाठी हा धागा काढत आहे. बेत आधी ठरलेलाच आहे. तपशील खालीलप्रमाणे स्थळ :- स्वाद (शाकाहारी थाळी) , ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे. (स्टेशन पासून जवळ आहे आणि प्रसिद्ध आहे, कुणालाही विचारा, प्रकारचे ) दिनांक :- शनिवार ३० जुलै रोजी संध्याकाळी ६:३० कार्यक्रम :- अमर्यादित थाळीचा आणि अमर्यादित गप्पाटप्पांचा आस्वाद. कुणाला काही शंका असेल तर प्रतिसादातून विचारा अथवा मला, स्पाला किंवा सुधांशू देवरुखकर उर्फ सूड याला व्यनि करा.

राखीला करायचंय रामदेवबाबांशी लग्न

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी गुरुवार, 28/07/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
सातत्याने वादग्रस्त विधाने करून माध्यमांचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करून घेणाऱ्या राखी सावंतने आज आणखी एक खळबळजनक विधान केले. "" रामदेवबाबांशी विवाह करण्याची माझी इच्छा असून, त्यांचीही इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांच्याशी लग्न करेन,'' असे राखी सावंत म्हणते. अतिशय मूर्ख अशी ही एक व्यक्ती आहे. आणि हि एक मराठी मुलगी आहे याची लाज वाटते.

एफेमवाले

लेखक इरसाल यांनी गुरुवार, 28/07/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी घरून ऑफिसला येताना एफएम वर गाणे ऐकत होतो. च्यानेल होते ९१.१.तसाही ह्या च्यानेल वर सकाळी सकाळी वायफळ बडबड करणारी सिमरन नावाची निवेदिका आहे. (हिला शोधण्याची मोहीम २ वर्षापूर्वी ९१.१ वाल्यांनी राबवली होती........बलबीर पाषा कोण ह्या स्टाइलने, तो भाग म्हणजे पण एक अतिरंजित मनोरंजक प्रकार होता). सध्या एफेम वर कोणाला तरी बकरा बनवणे, टोपी घालणे हे प्रकार सुरु आहेत.

रिझर्व ब्यान्के चा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट.

लेखक वारा यांनी गुरुवार, 28/07/2011 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
कालच पेपरात बातमी वाचली की रिझर्व बॅन्केच्या रेपो व रिव्हर्स रेपो दरात वाढ केली. यामुळे ग्रुह व वाहन कर्झ महागले. नव्या निर्णयामुळे रेपो रेट ०.५० ने वाढुन आता ८ टक्के झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट आता ७ टक्के झाला आहे, त्यामुळे मुदतबन्द ठेवीदाराची चान्दी झाली आहे. पण याचा परीणाम म्हणजे ऑटो आणि रिअल ईस्टेट ला फटका बसायचे चान्सेस आहेत.

`किल्ल किंवा बांबूच्या कोवळ्या कोंबाची भाजी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 28/07/2011 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- एक बांबूचा कोवळा कोंब. पाव वाटी तूरडाळ. अर्धा चमचा मालवणी मसाला. पाव चमचा हळद. हिरवी मिरची. थोडा गुळ. मिठ. खवलेले खोबरे. तेल. मोहरी व हिंग फोडणीसाठी. कृती :-हा बांबूचा कोंब. किल्लाचे आतील कोंब आदल्या दिवशी रात्री बारीक कोचून (काकडी कोशिंबीरीसाठी कोचतो तसे) पाण्यात घालून ठेवावे.(त्यामुळे उग्रपणा कमी होतो).