Skip to main content

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..

'दिल्ली बेली' - एक बेली ढवळक अनुभव

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
"भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." अशी आर्त स्वरातली विनंती न ऐकून चालणारच नव्हतं. पहिल्यांदा हे गाणे ऐकले तेव्हा मला प्रश्न पडला की हा का एवढं 'भागायला' सांगतोय. बरं, गंमत म्हणजे हे गाणं मी एका रम्य आणि शांत सकाळी पहिल्यांदा ऐकलं होतं. मी अर्धवट झोपेत होतो; खिडकीतून उन्हाची कोवळी तिरीप माझ्या देखण्या चेहर्‍यावर प्रभा फाकवत होती; गॅसवर ठेवेलेल्या चहाच्या आधणाचा गोडसर उबदार वास नाकात शिरत होता; सोसायटीच्या पाण्याच्या पंपाचा मंद आवाज अस्पष्टपणे कानावर पडत होता, लिफ्टच्या दरवाजाचा आणि तो उघडा ठेवल्यानंतरच्या कर्कश अलार्मचा आवाज अधून-मधून कानावर पडत होता.

मासे २९) माकुळ/माखुल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 05/08/2011 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः माखली लसुण ४-५ पाकळ्या ठेचुन आल-लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट हिंग, हळद मसाला सुके खोबरे व कांदा भाजुन केलेले वाटण मिठ गरम मसाला अर्धा चमचा तेल लिंबु किंवा चिंच (ऑप्शनल) पाककृती माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली.

महिमा अंगठीचा

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी शुक्रवार, 05/08/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला ओळखणार्‍या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय. त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय.

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 05/08/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट अन्यायाची सीमा जेव्हा मर्यादेला लांघते तुझे हक्क तुडवून तिरडीवर बांधते शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट पोशिंद्याच्या छाताडावर हरामींच्या मौजा तेव्हा राज्य करतात लुटारूंच्या फौजा स
काव्यरस

दृष्टीभ्रम

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 05/08/2011 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
मीटिंग निमित्ताने एका हॉटेल मध्ये आलो आहे, मधे थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून मिपावर चक्कर टाकावी म्हणून लाऊंज मध्ये बसलो तर घडलेला किस्सा: बर्‍याच खुर्च्या कलात्मक रीत्या मांडून ठेवलेल्या या लाऊंजमध्ये माझ्या खुर्चीखाली एक wavy पॅटर्नचा गालिचा होता. तो गालिचा क्रॉस करून पलिकडे जाणार्‍या आईच्या मागे दुडुदुडू धावत आलेलं दोन-अडीच वर्षांचं बाळ. आई फरशीवरून गालिच्यावर, आणि मग गालिच्यावरून परत पलिकडच्या फरशीवर चालत निघाली.

परदेशात घर विकत घ्यावे का? असल्यास काय काळजी घ्यावी?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 05/08/2011 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत काही वर्षांपासून रहात असलेल्या एका परिचिताने (घरभाड्याएवढा मासिक हप्ता देऊन स्वतःचे घर होईल या विचाराने) घर विकत घेतले, आता त्यांनी दुसर्‍या शहरात नोकरी धरली, तसेच मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहेत, परंतु घेतलेले घर विकले जात नाही, व भाडेही पुरेसे मिळत नाही, अशी पंचाईत झाली आहे. यावर काय उपाय आहे, एकूणच परदेशात घर विकत घेण्यात काय काय फायदे- तोटे असतात? घ्यायचेच असेल तर काय काय काळजी घ्यावी?

(एकांत....)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 05/08/2011 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
... पोरांनी पार धुडगुस घातला होता. येणार येणार म्हणून आम्ही पोरं ज्या मोठया विकांताची वाट पाहत होतो, तो विकांत एकदाचा आला होता. मी, चिंटू, अम्या, रव्या, जग्या आणि सम्या अशी सहा टाळकी केव्हाच ब्यागा भरून तयार होती. एंटरप्राईजमध्ये जीएमसी युकॉन बुक करुन झाली होती. गाडी कसली म्हणा, एक अजस्त्र धुडच होतं ते. अंगात नुसती सुरसुरी भरली होती. साहजिकच होतं म्हणा. कारण आम्ही सारे लाँग विकेंडला डिझ्नेलँडला जाणार होतो. यथावकाश ती शुक्रवारची संध्याकाळ आली. आणि आमचा लॉस एंजेलिसच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सम्या व्हीलवर बसला होता. आधीच सम्याला वेगाचं भयानक वेड त्यात हातात युकॉनचं व्हील. मग काय विचारता.

आर्क्टिक होम इन वेदाज, टिळक

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 04/08/2011 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
आर्क्टिक होम इन वेदाज याबाबत काही गोष्टी शेअर करू इच्छितो. कुणाला अधिक माहीती असेल तर जरूर द्यावी, आनंद होइल. आर्क्टिक होम इन वेदाज हे टिळकांनी १८९८ च्या आसपास लिहिलेले आहे पण या विषयाची सुरुवात त्यांनी १८९३ ला केलेली दिसते. आपले म्हणणे मांडतान टिळकांनी रसायनशास्त्र, भूमिती, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे सूर्याची गती, पृथ्वीची गती, त्या दोघांमधील सापेक्षता पृथ्वीच्या कक्षेने सुर्याच्या कक्षेशी केलेला कोन ५००० ते ८००० वर्षांपूर्वी ध्रूवावर पडणार्‍या सूर्यकिरणांचा कोन त्यामुळे तिथे असलेले सरासरी तापमान, जे मानवाला अनुकु

नागपंचमी-पुरणाची दिंडं व तांदुळाची खीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 04/08/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुरणाची दिंडं माझ्या माहेरी नागपंचमी ला नैवेद्याला बनवतात :) साहित्य दिंडः १ वाटी चणाडाळ स्वच्छ धुवून, कुकरला शिजवून घेणे व त्याचे पाणी निथळून घेणे. १ वाटी चिरलेला गुळ १ टीस्पून वेलचीपूड ३/४ टीस्पून जायफळ्पूड २ वाटया गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ, व २-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून कणीक मळून घेणे. पाकृ: शिजवून घेतलेली चणाडाळ चांगली डावाने घोटून घेणे. . त्यात १ वाटी चिरलेल