Skip to main content

जलेबी बाई...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 12/08/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

शोध

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 12/08/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
नाव काय रे तुझं? कमच्या. कमच्या! हे कुठलं रे नाव? कुठला रे तू? कोणत्या गावाचा? लोक विचारयचे. कमच्या चुपच राहायचा. अरे काय विचारतोय? इथे कसा काय आलास तू? बापाचं नाव काय? आडनाव काय? माहीत नाही. कमच्या म्हणायचा. अरे रे! च, च... लोकं म्हणायचे. अनाथ दिसतंय पोर. वणवण फिरतंय पोर, काडी सारखा लुकडा दिसतोय ना म्हणून कमच्या म्हणत असावे ह्याला. लोकं स्वत:च निष्कर्ष काढायचे. काम मिळायचे.

आजी

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शुक्रवार, 12/08/2011 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजी म्हणजे मैत्रीण असते सगळ्या घराची वीण असते, मेणबत्तीला उभारण्यासाठीचे खाली वितळवलेले मेण असते. आजी ज्ञानाचे भांडार असते अंधारात प्रकाशाचे दार असते, कधी मायेची हळुवार फुंकर कधी छडीचा कडवा वार असते. आजी आमचे होकायंत्र आहे तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे. आजी म्हणजे दरारा असतो आजी म्हणजे शहारा असतो कुठलही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असतो. आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेम पण आहे पाहता क्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे. स्वराज्य घडविले शिवबाने पण लढविले बाजीने आहे जन्म आई-वडिलांनी दिला संस्कार दिले आजीने आहे घरटे साजिरे

अंतर -२

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 12/08/2011 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
3

श्रावणाच्या कविता १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 12/08/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल कविता करायचे योजिले आहे. त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.
झिंगलेल्या बाबाची कहाणी
आपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.

पुस्तकविश्व: लहानपणीचे मित्र-मैत्रिणी

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/08/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुवि सुरू झाले आहे सुदैवाने मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. आणि एकत्र कुंटुंबातील त्यावेळी एकमेव लहान सदस्य या नात्याने प्रत्येकाकडून हक्काने कोणती ना कोणती पुस्तके मिळायचीच.टिव्ही मर्यादित असल्याने आमचे अनेक हिरो-मित्र-मैत्रिणी आम्हाला या पुस्तकांनीच दिले. काल शाळेतल्या काही मुलांची कार्टुनमधल्या पात्रंबद्दल चाललेली बडबड ऐकली आणि मलाही माझ्या लहानपणीच्या अश्याच गप्पांची आठवण झाली.

मिसळपाव सदस्य

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 12/08/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकीवरही अनेक मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता मिपा चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे. {{सदस्य चौकट मिसळपाव सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे मिसळपाव संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे मिपाचिन्ह चौकट तुमच्या सदस्य पानावर दिसू लागेल.

न्युयॉर्क स्ट्रीट फोटोग्राफी

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शुक्रवार, 12/08/2011 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
सभासदांनी सुचवल्याप्रमाणे आणि एकाच विषयावर बरेच फोटो संग्रही असल्यामुळेच यावेळी बरेच फोटो एकत्र टाकत आहे. हे सर्व फोटो दोन वर्षापुर्वी काढलेले आहेत.

कधी सांज ढळत असताना...

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 12/08/2011 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंड एमबीबीएसचा क्लास सुटला. उदयाचे डॉक्टर भराभरा वर्गातून बाहेर पडू लागले. तसे थेअरीच्या क्लासेसना मुलं अ‍ॅप्रॉन घालत नाहीत. परंतू क्वचित एखादया मुलाच्या अंगावर पांढराशुभ्र अ‍ॅप्रॉनही दिसत होता. अविनाश सुद्धा या घोळक्यात बाहेर पडत होता. एकटाच, कुठेतरी हरवलेला. नुकतंच झालेलं डॉ. नंदनवारांचं अ‍ॅनाटॉमीचं लेक्चर अजूनही त्याच्या डोक्यात घुमत होतं. किती सुरेख समजावतात सर अ‍ॅनाटॉमी. डॉ. हेन्री ग्रेचं अ‍ॅनाटॉमी हे पुस्तक सर संदर्भग्रंथ म्हणून वापरतात. हेन्री ग्रे एकोणविसाव्या शतकात होऊन गेलेला अ‍ॅनाटॉमीमधला बाप माणूस. आणि नंदनवार सरांची हेन्री ग्रेवर देवापेक्षाही जास्त श्रद्धा. त्यामूळे डॉ.

बॅचलर्स पनीर बर्फी

लेखक सूड यांनी शुक्रवार, 12/08/2011 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही रेसिपी जरा सवडीनंच टाकायचा विचार होता, पण एकेक अनवट ब्याचलर्स रेशिप्या येताना बघितल्या आणि म्हटलं आपली साधीशी रेशिपी ह्यात डकवून टाकावी. कोणाही ब्याचलराला/ ब्याचलरणीला ही रेशिपी सहज जमायला काहीच हरकत नसावी असं माझं मत, कारण याची सुरुवातच बिघडवण्याने होते. साधलीच नाही तर यद्वा तद्वा भविष्यति ( सु'संस्कृत' मंडळींनी जरा सांभाळून घ्या ) असा प्रकार आहे, कसं ते पुढे सांगतोच आहे.