Skip to main content

गेटवे -मुखपृष्ठ आणि मनोगत

लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी शनिवार, 13/08/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या.घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे. पत्रकारिता करत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपर्‍यात फिरण्याची संधी मिळाली.प्रत्येक वेळेला वेगळा रंग ,वेगळा आशय जाणवला.

कॉर्पोरेटमधील उच्चपदस्थ आणि विश्लेषक यामधील संबंध: वल्डकॉम

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 13/08/2011 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाची प्रेरणा प्रदीप यांच्या साहित्यिक आणि समीक्षक यांच्यातील संबंधांवरील लेख ही आहे. अर्थातच माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष मनुष्याला साहित्य, काव्य अशा प्रकारांमधले फारसे काही समजत नाही. तेव्हा त्या लेखावर नाही तरी साधारण कल्पना एकच पण विषय पूर्णपणे भिन्न असलेला लेखच लिहावा असे म्हणतो. तर विषय आहे माझ्या जिव्हाळ्याचा म्हणजे अर्थातच फायनान्स मधला.

पौर्णिमेचा चंद्रमा..

लेखक योगप्रभू यांनी शनिवार, 13/08/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरी मिळाल्यानंतर सुखाने राहणारा पुरुष जगाला बघवत नाही हेच खरं. आता हेच बघा ना! मला नोकरी लागली आणि आई-बाबांचा धोशा सुरु झाला, 'विद्याधर! आता वेळ घालवू नकोस. मनावर घे. आम्हाला लवकर सून बघायची आहे. तू फक्त हो म्हण. बाकी स्थळे बघण्याचा उपद्व्याप आम्ही आनंदाने करु.' मी हा हट्ट फारसा मनावर घेतला नाही. कारणे दोन. एक तर माझी भटकण्याची आवड आणि दुसरी माझी दिसेल त्या विषयावर वाद घालण्याची खोड. घरी वाद घालायला लागलो, की आई-बाबा कंटाळून म्हणायचे, 'ए बाबा! तू सारखा भटकत असतोस तेच परवडले. सॅक उचल आणि चालू लाग हवे तिथे.' मग पडत्या फळाची आज्ञा समजून मी घराबाहेर पडायचो.

स्वत:ला प्रेरित कसे कराल ?

लेखक माझीही शॅम्पेन यांनी शनिवार, 13/08/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
Get happiness out of your work or you may never know what happiness is. - Elbert Hubbard ऑफिस मध्ये पाय टाकायच्या आपल्या डोक्यात कामाची एक यादी असते , माझा असा अनुभव आहे कि कामाची यादी खूप लाम्बलचक असेल किवा हाती आलेलं काम खूप किचकट असेल तर सुरु करायचा खूप कंटाळा येतो. किवा सुरु केल तरी आरंभ-शूर होवून मध्येच ते सोडून पण देतो. कामाच्या ठिकाणी आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असताना लक्ष देवून काम करणे किती कठीण आहे ह्याचा अनुभव बरेच जणांना असेलच. आपली कामाची एकाग्रता कुठल्याही कारणाने विचलित होवू शकते. जसे १.

कबिर च्या एका वचनचा अर्थ....??

लेखक अनुरोध यांनी शनिवार, 13/08/2011 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
मधे कबिर च एक दोहा ऐकण्यात आला.... पण आपली अर्थ लावन्यात जरा गल्लत होतेय तर जर मदत कर दोस्तहो.... ' कबिरा खडा बझार मे, मान्गे सबकी खैर, ना कहो एसे दुश्मनि ना कहो एसे बैर... '

द लँग्वेज ऑफ लाईफ : अ फेस्टिव्हल ऑफ पोएटस - पुस्तक ओळख

लेखक शुचि यांनी शनिवार, 13/08/2011 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी भेटायला गेले होते मुलीला आणि नवर्‍याला आणि प्रेमात पडून आले एका पुस्तकाच्या. नवीन काहीच नाही म्हणा. कवितेचे आणि कवींचे इतके अजोड, अप्रतिम पुस्तक वाचनात आले तर दुसरे काय होणार? एक तर मुलीकरता म्हणून ग्रंथालयात गेले. ती तिच्या विभागात आ॓णि मी माझ्या विभागात असे आम्ही रमलो. नंतर मी हे पुस्तक घरी घेऊन आले पण वाचता वाचता माझी खरच तहान-भूक हरपली. मला ते खाली ठेववेना. आता काही काळाने तर मी ते विकतच घेतले आहे. असे काय आहे या पुस्तकात? तर बिल मोयर्स या प्रथितयश मुलाखतकर्त्याने घेतलेल्या अनेक कवी-कवयित्रींच्या खूप वेगळ्याच वाटेवरील मुलाखती या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

अधुनिक लोकशाहीची आई...

लेखक विकास यांनी शनिवार, 13/08/2011 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटन या राष्ट्रास बर्‍याचदा "mother of all democracies" अर्थात "अधुनिक लोकशाहीची आई" असे सार्थपणे संबोधिले जाते. ब्रिटनच्या लोकशाही मुल्यांविषयी कधी कोणाला शंका आल्याचे सहसा दिसत नाही. अर्थात येथे ध्यानात घेतले पाहीजे की "लोकशाही" ही आपल्या (स्वतंत्र) देशातील लोकांसाठी असते...तरी देखील असे म्हणावे लागेल की या "आईने" भारत-अमेरीकेसहीत अनेक राष्ट्रांमध्ये जरी पारतंत्र्य आणले असले तरी अनेक देशांनी तीच्या पावलावरपाऊल ठेवत नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये लोकशाही आणली आणि स्वतःच्या जनतेला/सत्ताधार्‍यांना पचेल अशी रुजवली. असो.

मासे ३०) शिंगाळ्याची अंडी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 12/08/2011 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः शिंगाळ्यांची अंडी हिंग, हळद मसाला १ कांदा बारीक चिरुन मिठ कोकम्/टोमॅटो किंवा चिंच थोडासा गरम मसाला. थोडी चिरलेली कोथिंबिर तेल हा आहे शिंगाळ्याच्या अंड्यांचा घड पाककृती : प्रथम शिंगाळ्याची अंडी घडातुन बाहेर काढुन सुट्टी करुन घ्यावीत व स्वच्छ धुवुन घ्यावीत.

कोथिंबीर झुणका

लेखक कुंदन यांनी शुक्रवार, 12/08/2011 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच मिपा कर पा़कृ पाडत आहेत असे पाहुन मग मी पण म्हटले आपण पण हात धुवुन घेउयात. साहित्य : २ मोठे कांदे ( माझ्याकडे १ च होता , म्हणुन मी १ च घेतला) २ मिरच्या ( हिरव्या) २ लसुण पाकळ्या ( सोलुन ;-) ) १ चमचा हळद १ चमचा लाल तिखट २ चमचे गोडेतेल्/सुर्यतेल. ( इकडे सुर्यतेल मिळते , म्हणुन मी ते वापरले.) २ चिमुट मोहोरी २ लहान गड्ड्या कोथिंबीर , स्वच्छ करुन बारीक कापुन घ्या. १ वाटी बेसन पीठ कृती: कांदे नीट स्वच्छ करुन बारीक कापुन घ्या.