Skip to main content

"संभवामि युगे युगे" असे वचन देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण अण्णांच्या रूपात आले आहेत!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 16/08/2011 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीची कैरोच्या दिशेने वाटचाल? अलीकडे पैसे खाऊन ते पैसे स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करताना त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरत नाहींत! आताशी तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10‌^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेले (पण कधीही न वापरलेले) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असले एकक (units) नव्याने वापरावे लागत आहेत. अगदी अलीकडचे गुंडांनी वापरलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत.
काव्यरस

अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

लेखक उदयन यांनी मंगळवार, 16/08/2011 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669 अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे... दोघांचे अवलोकन करण्यात यावे.. यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे १) प्रकरण ७ मधे.... पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल.. अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा.. २) प्रकरण ८ मधे.. अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराच

मुलगी का नको?

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/08/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही.

ए टेल ऑफ टू सिस्टर्स

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
द ग्रज पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले.

सिंघम

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 16/08/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'सिंघम' पाहिला. मनाची आणि मेंदूची व्यवस्थित मशागत करून गेलो असल्याने मनोरंजनाचे पीक तरारुन आले. चांगल्याचा वाईटावर सणसणीत विजय याखेरीज कुठलेच बोधामृत नाही, कुठलाच मेसेज नाही, कुठल्याच गोष्टीचा धांडोळा-बिंडोळा घेण्याचा प्रयत्न नाही, कथेत कुठलाच वेगळेपणा नाही आणि तरीही 'सिंघम' पुरेपूर मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसमोर मनमोकळेपणाने रीता करतो. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी, एक अतिवाईट प्रवृत्तीचा गुंड-राजकारणी आणि त्यांच्यातला संघर्ष हेच चित्रपटाचे कथाबीज. शेवट अपेक्षेप्रमाणे गोड!

आरसा

लेखक निनाव यांनी मंगळवार, 16/08/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चेहरा बघतो मी रोज, हल्ली विद्रुपच.. बदळणारा - वेळो वेळी पण पुन्हा - विद्रुपच एवढ्यात, हसणे तसे बरेच कमी झाले आहे, चेहर्‍यावर - आजारपणानं रेघोट्या काढल्या आहेत, हास्य शोधण्याचा प्रयत्न असतो, -सुंदर दिसण्याचा प्रयत्न होतो - विफल असहाय मी, मग आरसा बदळण्याचा प्रयत्न होतो मनी. पण, हा दोष आरस्याचा नाही, हा दोष आहे माझ्या चेहर्‍यात, जो सुंदर-सुबक दिसण्यास तयार नाही, अंगवळणी पडलेले आजारपण, आवडायला लागले आहेत. प्रामाणिकता मात्र जगू देत नाही, बदलायचा हट्ट सोडत नाही. अन चीड येते माझीच मला, उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला , काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास पण नकळत, पुन्हा तोच चेहरा बनवत

मुलगी वाचवा !!!

लेखक धन्या यांनी मंगळवार, 16/08/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल पंधरा ऑगस्ट. सूट्टीच्या दिवशी कूठला सुशिक्षित निवांत उठतो तसाच उठलो. घडयाळात पाहीलं. नऊ वाजले होते. लवकर का उठवलं नाही म्हणून आईला विचारलं. "मी तुला उठवायला गेलेय आणि तू लवकर उठला आहेस असं कधी झालंय का?". मी ओशाळं हसलो. "ठीकंय ठीकंय" म्हणत कामाला लागलो... "अरे काय करतो आहेस घरी. ये लवकर. गुरुजी आणि मुलं वाट पाहत आहेत." ईति फोनमधून बाबा. ""हो हो. आवरलंच. येतो पंधरा मिनिटांत शाळेत." ... बरीचशी उलथापालथ करत शेवटी एकदाचा वह्यांचा आणि कंपास पेटयांचा खोका शोधून काढला. गाडीच्या डीकीत टाकला. चार पाच मिनिटे रीव्हर्स फॉरवर्ड करत एकदाची गाडी वळवली... मोजून पाचव्या मिनिटाला शाळेत... ...

दोर

लेखक निनाव यांनी मंगळवार, 16/08/2011 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली दोर - मोकळे आकाश विसरले पंख - भरारी घेताच क्षणात सारे - घायाळ आघात न आठवे कुणाच कुणी न वाटे आठ्वावेसेही बेधुंध उडायची ताकत का दिशा यावी आड? युगे बदलली - दोर वेगळीच ह्या वेळीस न कळे ह्या जीवास - कदाचित घडावेच ज़णू पुन्हा ते संग्राम!!

मदत हवी आहे - एनआरआय लोन चे रेसिडेंट लोन मधे Conversion

लेखक अंतु बर्वा यांनी मंगळवार, 16/08/2011 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, मी सध्या भारताबाहेर असुन भारतात घर घेण्यासाठी NRI लोन घ्यायचा विचार करत आहे. परंतु काही गोष्टींवर मला खुप धुंडाळुनही काही माहीती मिळत नसल्याने मिपाकरांना शरण आलो आहे. जर NRI लोन घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव (असाईन्मेंट संपल्यामुळे म्हणा किंवा ईतर काही कारणाने) भारतात जावे लागले, तर लोनचे प्रोसेसिंग कसे होते? म्ह्णजे ideal केस मधे ते रेसिडेंट लोन मध्ये बदलले जायला हवे परंतु समजा मला इथे राहुन महीना ४५००० EMI देणं परवडत आहे, पण भारतात परत गेल्यावर जर माझा भारतातला पगार ही अमाऊंट कवर करु शकत नसेल तर काय होईल?

शेवटी जे व्हायचे होते ते झालेच.सरकारचे अभिनंदन!

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 16/08/2011 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी जे व्हायचे होते ते झालेच. अण्णा, अरविंद केजरीवाल्,किरण बेदी पोलिसांच्या तब्यात. आम्ही काहीही करू शकतो! तुम्ही कोण विचारणारे? पैसे,ताकद्,सत्ता यांची मस्ती आणी गुर्मी! शंका होतीच. सरकारला आत्ता जाग आली. अण्णा या दिवसाची मनात तयारी करूनच होते. सरकारचे अभिनंदन!! असेच आंदोलन चिरडीत रहा. भारतीय लोकशाही झिंदाबाद! भारतीय राज्याघटनेचा विजय असो! केंद्र सरकार झिंदाबाद! ममो सिंग सरकार आगे बढो! सर्व देशाचा तुरुंग बनवा. ज्या लोकांना आणिबाणी ची इतिहासाची प्रत्यक्ष माहीती नाही, त्यांना तर ही इतिहासाची साक्ष होण्याची पर्वणीच.