Skip to main content

सुरेश वाडकरांनी गायलेला नवीन अल्बम "आता उजाडेल"

लेखक योगेश पितळे यांनी गुरुवार, 01/09/2011 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
आता उजाडेल या अप्रतिम अल्बमद्वारे ओंकार घैसास या तरूण संगीतकाराने संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची १० गीते आहेत. कै. श्री सुरेश भटांनी लिहिलेली "जगून मी पाहिले कितीदा" ही गझल आणि शास्रीय अंगाने जाणारं, तीनतालात बांधलेलं "बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन", "उजाडेल तरी न का" या सगळ्या गाण्यांचं सुरेशजींनी आपल्या स्वरांनी सोनं केलय!

अप्रतिम हैद्राबाद !

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 31/08/2011 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात हैदराबाद ( आंध्रपद्रेश) येथे जाण्याचा योग शेवटी जुळून आलाच. :) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जाण्याचा बेत होता. आता रमजानचा मुहूर्त पाहून ही भेट शक्य झाली. या धावत्या भेटीचा हा धावता वृत्तांत. हैदराबाद ! - हैदराबाद असं केवळ ऐकून होतो. वाचून होतो. बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन पाच नवीन शाह्या (शाही चे अनेकवचन) तयार झाल्या होत्या त्यात आपल्या जास्त ओळखीचे म्हणजे विजापूर, अहमदनगर (निजाम), बिदर, बेरार (वर्‍हाड) आणि गोवळकोंडा (कुतुबशहा) असे होते. यातील गोळवकोंडा म्हणजे आताचे हैदराबाद. अर्थात गोवळकोंड्याचा किल्ला आजही आहे आणि तो शहराच्या पश्चिमेस आहे.

जकार्तातील रिक्कामे रस्ते!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 31/08/2011 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
९४ टक्के मुस्लिम वस्तीच्या इंडोनेशियात त्यातही जावा बेटावर इदुलफित्रीला सर्वांनी आपापल्या आई-वडिलांकडे किंवा आजी-अजोबांकडे जायचा प्रघात आहे. जकार्तात नोकरी करून आपले ऐश्वर्य मिरवायलाही कांहीं लोक जातात असे माझे कांहीं इंडोनेशियन मित्र म्हणतात. स्वतःचे नोक-झोकवाले कपडे, घरच्यांना द्यायला विकत घेतलेल्या भेटीं वगैरेमुळे बरेच लोक कर्जबाजारीही होतात. असो. एरवी अ‍ॅक्सिलरेटर ऐवजी ब्रेकवर पाय ठेवून गाडी चालविणार्‍या आम्हा लोकांना हे चार दिवस म्हणजे "फॉर्म्यूला-१"चेच दिवस वाटतात.

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं १ - ती आणि ते

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 31/08/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रतिसादात गणेशा यांनी एक सूचना केली होती. ती म्हणजे कवितांचं रसग्रहण करायचं असेल तर मिपावरच्याच एखाद्या नव्या कवीच्या चांगल्या कवितेचं रसग्रहण का करू नये? त्यायोगे कवीला व एकंदरीत सर्वच सदस्यांना आपलेपणा वाटेल. ही सूचना मला मनापासून आवडली. आपण कायम मराठी वाङमयात गाजलेल्या कवितांकडे लक्ष पुरवतो, त्यांचे गोडवे गातो. पण मिपावरदेखील अनेक कविता येतात. त्यातल्या काही आवडलेल्या कविता घेऊन रसग्रहण व चर्चा करायला काय हरकत आहे?

दोन प्रश्न - शरद पवार आणि बालाजी तांबे.

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 31/08/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्रश्न - १) शरद पवार हे कधी चेंडू-फळी हा खेळ खेळले आहेत काय? आमच्या माहितीप्रमाणे ते अधिकृतपणे (रणजी, एक दिवसीय, २०-२० वगैरे सारखे सामने) कुठल्याही सामन्यात खेळलेले नाहीत. मग त्यांच्याकडे बी सी सी आय च्या अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद कसे आले? आपल्यापैकी कुणाला या संदर्भात काही टिप्पणी करायची असल्यास स्वागत आहे. २) बालाजी तांबे यांच्याकडे नक्की कुठली वैद्यकीय पदवी (अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, युनानी वगैरे) आहे? आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही अधिकृत पदवी त्यांच्याकडे नाही. इथे या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया खुलासा करावा. कॉमॅ.

केळीचे उपजे

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी बुधवार, 31/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: पिकलेलं केळं - १, भरड दळलेला तांदूळ किंवा तांदुळाची कणी - १/२ वाटी, दलिया - १/२ वाटी, दाण्याचं कूट - ३-४ चहाचे चमचे, नारळाचा चव - १/४ वाटी, केळीचं पान, मिरची - १ किंवा चवीनुसार, कढीपत्ता - १०-२० पाने, लिंबू १/२, तेल - १/४ वाटी, पाणी, मोहोरी, जिरे, हळद, हिंग, मीठ कृती: १. तांदुळाची कणी, दलिया आणि दाण्याचं कूट एकत्र करून पाण्याने धुवावे. पाणी निथळून घेतल्यावर मिश्रण एका भांड्यात झाकून ठेवावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून पुन्हा एकत्र करून ठेवावे. ५-६ तास भिजवणे शक्य नसल्यास पाणी निथळून घेतलेल्या मिश्रणात सुरुवातीलाच मीठ, लिंबूरस घालून तासभर झाकून ठेवावे. २.

मोक्ष

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 31/08/2011 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी? एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...

'शांताराम' नावाचे गारूड !

लेखक ज्ञानेश... यांनी बुधवार, 31/08/2011 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
"I was a revolutionary who lost his ideals in heroin, a philosopher who lost his integrity in crime, and a poet who lost his soul in a maximum security prison." -Lin. कुठल्याही चांगल्या पुस्तकाचा एक असा निकष असतो की ते वाचून संपवल्यावर तुम्हाला कुठेतरी थकवा जाणवला पाहिजे. तुमच्यातून अचानक काहीतरी कमी झाल्याचे रितेपण जाणवले पाहिजे.

पावसाचा दरोडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 31/08/2011 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचा दरोडा आला सोसाट्याचा वारा उठलं धुळीचं रिंगण झाडझाडोरे हालता गेल सारं रान पिंजून || बांधावर आम्ही उभे आधार एकमेकांना दोघे तवाच ढग आले दाटून गेलं आभाळ फाटून || थेंब पावसाचे मोठे द्वाड अंगावर बसे वादीचा चाबूक जवा पाहिजे तवा नाही जवा नको तवा यायची खोड || विजा चमकून भिती घालती काही आगाव भुईला टेकती वंगाळ भिती मनाला खायी जिवासाठी आसरा शोधू पाही || उघडा सारा रानमाळ नव्हतं कुणाचं छप्पर ठिपक्यावानी झाड लिंबांच सावली देत उभं र्‍हातं || तेवढा तोच आधार तेचा आडोसा घेतला त्याखाली वल्ले होतो थेंब जोराचे चुकवत || एकाएकी आक्रीत झालं सन्नकन आला
काव्यरस