Skip to main content

ग्रहण-२

लेखक स्पा यांनी मंगळवार, 20/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच. "कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो.

काही रेखाचित्रे

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 20/09/2011 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर दुसर्‍याचे लेखन प्रकाशित करायचा प्रघात नाही हे माहिती आहे. परंतु माझ्या भावानेच काढलेली असल्यामुळे त्याची काही स्केचेस इथे डकवतो आहे. यातले एकही स्केच माझे (म्हणजे मी काढलेले ;) ) नाही. सगळी चित्रे माझ्या भावाने काढलेली आहेत. बाकी फारसे काही लिहिण्यासारखे नाही आहे. त्यामुळे चित्रेच डकवतो.

(गुरुपदेश)

लेखक daredevils99 यांनी मंगळवार, 20/09/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी चांदनी बारमध्ये माझ्या गुरुंना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला चांदनी बार परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला नेहेमी पाजण्याचा शब्द देणार्‍या आणि मी टल्ली झालो तरी मला पुन्हा-पुन्हा पाजण्याचा मोठे पणा दाखवणा-या अरूणभाईला पण भेटलो. त्यांला वर लॉजवरच्या रूममध्य जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त संवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता.

गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 20/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा... "Rajeev, what are you doing these days? "- प्रा.

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं ४ - माफ

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 20/09/2011 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच एक कविता वाचण्यात आली, माफ नावाची. निखिलचं शाईपेन या आयडीने लिहिलेली. कविता छान आहे, तांत्रिक बाजूत सुधारणेला वाव आहे. मुक्तछंदात लिहून एक लय, एक चढत जाणारा टेंपो पाळण्याच्या बाबतीत काही दुरुस्त्या करता येतील. पण त्यापलिकडे कवितेचा आशय प्रभावी आहे. संपूर्ण कविता वाचून मला पहिल्याप्रथम जाणीव झाली ती एका एकतर्फी केविलवाण्या प्रेमभंगाची. या जळजळीत अनुभवानंतर जी एक विरक्ती येते तिचं वर्णन या कवितेत आहे. पण ही विरक्ती खरी विरक्ती नाही. वेदना भळभळत असताना तिच्याकडे बघत म्हणावं, केलं, या घाव घालणाऱ्याला मी माफ केलं.

वेळ लावू नका

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 20/09/2011 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ लावू नका
रात नवेली आली चालून विडा ठेवला चुना लावून तुमच्या येण्याचा नाही भरवसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा वाट तरी पहावी कितीक बाई दिस गेला हि रात सरत जाई ऐन मोक्याला धोका कसला? जीव झाला येडापीसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा लाडीगोडीचं तुमचं बोलनं गोडगुलाबी कोडं घालनं आधारासाठी हात उशाला पांघराया अंग द्या न विसरता वेळ लावू नका बेगीनं या राजसा शिनगाराचा असल्या येळी आठव तुमची डोळा आली दोन्ही पापण्या न्हाती पाणी विरह सहन होईना जरासा वेळ लावू नका बेगीनं या राजसा - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०९/२०११
काव्यरस

आठवणी

लेखक मराठे यांनी मंगळवार, 20/09/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात काही काही आठवणी अशा असतात की कितीही प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी मग कधी कधी ह्या आठवणी मनात पिंगा घालायला लागतात. जसं जसं मागं जावं तशा तशा ह्या आठवणी थोड्या विरळ होत जातात. एकाद्या धूसर चित्रांचा अल्बम बघावा तशा.... एखाद्या सुराचा, एखाद्या गंधाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा संदर्भ घेउन अडगळीत पडलेल्या असतात. अडगळीप्रमाणेच.. कधी कधी तर आठवणी अगदीच असंबद्ध असतात. त्या स्मृतींची अडचण अजून का डोक्यात साठली आहे असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्मृती एखाद्या अद्भुत स्वप्नासारखी वाटते आताशा. लहानपणीच्या त्या आठवणी ..

मदत हवी आहे....

लेखक धन्या यांनी मंगळवार, 20/09/2011 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा च्या सर्व सभासदाना: मित्रहो, आपणा प्रमाणेच मी सुधा एक मराठी वाचक आहे पण मला आता english भाषेमधील novels वाचायच्या आहेत (उदा. Lady Chatterly's Lover or Exit to Eden)...आपल्या पैकी कुणाजवळ या बद्दल माहिती असेल तर प्लिज मला कळवाल का??

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ?

लेखक शाहिर यांनी सोमवार, 19/09/2011 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
दर १२ मैला वर भाषा बदलते असा म्हणतात ..प्रत्येक कट्ट्याची स्वताची अशी स्वतंत्र भाषा असते ..काळा नुसार ती बदलत जाते .. गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रत्येक गावात , कट्ट्या वर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते .. उदा : पुण्यामध्ये आयटम , मुंबई मध्ये छावी ..सोलापूरकडे खडा , आणि हुच्चभ्रू मध्ये बेब या प्रमाणेच म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल ..)बहुतेक शब्द कोल्हापूरहून ) मुली सुद्धा पंटर , छावा ..बैल ..मजनू असे शब्द वापरतात ..आपल्या कॉलेज मधले , कट्ट्यावरचे, मी. पा.