Skip to main content

७) एका खेळियाने - "युनायटेड" वुई स्टॅन्ड

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 27/09/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच आमच्या पराचं "भन्नाट" वाचत होतो... सु.शि. म्हणजे आधीच आपला वीक पॉईंट. त्यात पराच्या कन्सेप्टनीच डोक्याला शॉट दिला. दारा, मंदार, फिरोज आणि अमर विश्वास एकत्र?? एकेकाच्या "परा"क्रमाच्या कथा वाचताना सुद्धा भान हरपायला होतं. आणि हिथंतर पराभाऊ काय सांगून राहिले? दाराची अमानवी ताकद, अमरचं अफाट डोकं, मंदारचा स्मार्टनेस आणि फिरोजचं बैदुल एकत्र?? "अब्ब आयेगा मजा"। हे म्हणजे एका बाजूनी मॅक्ग्रा, दुसर्‍या बाजूनी वॉर्न, मागे गिलख्रिस्ट आणि स्लिप्समध्ये पाँटिंग झालं की राव ! च्यायला....

विद्यार्थ्यांची पटपडताळणी आणि कार्यवाही किती योग्य आहे ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 27/09/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सध्या सुरु आहे. शाळेत बोगस पटसंख्या दाखवून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटणार्‍या शिक्षणसंस्थांचा शोध घेतला जाणार आहे. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, केवळ नावाला संस्था आणि त्यांच्या शाळा आहेत. नावाला केवळ शिक्षक आहेत. आणि शासनाचे कोट्यवधी रुपये या शाळांवर खर्च होत आहे. विद्यार्थी नसतांना शाळेवर प्रचंड खर्च करावा लागतो, असे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे पट्पडताळ्णीची मोहीम सुरु करण्यात आली आहे.

व्वा! क्या बात!

लेखक मन यांनी मंगळवार, 27/09/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच "हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने" हे http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं. मूळचा मी राहणारा औरंगाबादचा. जुनं औरंगाबाद म्हणजे धाकटं हैद्राबादच म्हणता येइल. निजामाची मराठवाडा प्रांताची राजधानी. नवीन औरंगाबाद मध्ये राहिलो तरी तिथली ती खास मोगलाइ ष्टाइल, नवाबी कारभार ह्याचं थोडं थोडं दर्शनही झालच; . पण ती तिथली खास अशी वाटणारी मुसलमानी भाषा, त्या त्यांच्या टपर्‍यांवर लागलेल्या वेगवेगळ्या कव्वाल्या.... पुण्यात पोटापाण्यासाठी आल्यापासून कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं.

...तुझ्या अस्तित्वाची ओळखीची खुण

लेखक विकाल यांनी मंगळवार, 27/09/2011 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे रिकामं घरं..... तुझ्या असण्याची ओळख पटवत राहतं.... तुझ्या अस्तित्वाच्या न पुसल्या जाणार्या अमिट खुणा.. ती सोनचाफ्यासारखी पावलं... अनं ओघळतं गेलेलं दरवाज्यापर्यंतच हसू....!! तुझं नसणं पण कदाचित तुझ असणंच दाखवतं......!! ओळखीच्या क्षणांनाही मी दिला नाही मागमूस.... तुझ्या या नसण्याचा... बिलगत अनोखे ल्यात अपूर्व भान... आहोत जवळी अजून असाच तो भाव....!!! दारातला मोगरा अजूनही तसाच फुलतो.. समजावू का त्या निष्पाप कळ्यांनां...? आता तू नसतेस इथे म्ह्णून...!! पणं त्या फुललेल्या मोगर्यापरी तुझ येणं ते...? पारिजातक ही फुलतो अजून... निशिगंधाच्या सुवासाला वाट देत...! त्यांना नाही माहितं..

साखर चौथीचा गणपती

लेखक जागु यांनी मंगळवार, 27/09/2011 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.
काव्यरस

मै पिच्चर में जावू के नको

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/09/2011 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
मै पिच्चर में जावू के नको
ये करू नको, वो करू नको सदा ऐसेच बोलतेय आप तो मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे को ||धृ|| देखने में मै हूं बडी देखनी; सब बोलतेय मेरकू चिकनी नही कोई मुझमे कमी; मेरे बगैर पडती गली सूनी कैसी हिरोईन एक नंबर बनती तुम अभी देखो मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरेको ||१|| मुंबई शहर है बडा मोटा; नाही पैसेका उधर तोटा मत करो मेरेको बेटा बेटा; नाही होंगा अपनेको घाटा अब्बी मेरी अम्मीभी राजी हो गयी देखो मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे

(आपणच आता भान ठेवायला हवं)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/09/2011 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची टिलु(माझी कजाग शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " शुचि मी आज माझ्या नवर्‍याचे लाड केले" आता ही टिलु कजाग आहे.मी तिला म्हटलं "टिल्या संसारात आक्रस्ताळेपणा करायचा असतो? प्रेम, तडजोड नाही करायची .." तर ती म्हणाली "शुचि माझा नवरा माला म्हटला माझ्याशी (१५ वर्षानी )आतातरी म्य्त्री क्र्र्न्र क???????" आता मात्र मला शॉक बसला.

आपणच भान ठेवायला हव..............

लेखक gangotri_ यांनी सोमवार, 26/09/2011 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पिलु(माझी छोटी शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " दीदी मी आज वर्गातल्या एका मुलाला कानाखाली दिली" आता ही पिलु 2 रीत आहे.मी तिला म्हटलं "पिल्या तू शाळेत मस्ती करायला जातेस का? मारामारी नाही करायची .." तर ती म्हणाली "दीदी तो मुलगा माला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का???????" आता मात्र मला शॉक बसला.2 रीतल्या मुलांना कधीपासून लग्नाचं सुचायला लागलं ????? मी तिच्या शाळेत गेले , त्या मुलाशी बोलून त्याला समजावून सांगितलं की अभ्यासात लक्ष द्या . पण .......... पण..... प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच?????? तो त्यांच्या पुरता मिटला .

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 26/09/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमावास्या , नारळ आणि मनोविकार अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे? तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे. ती कशासाठी? अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का? अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का? ( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)