Skip to main content

एक तो अन एक ती ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 30/09/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी शोधतो आहे एक तो अन एक ती ... बर्याच वर्षांपूर्वी ह्या इथेच दिसायचे ते दिलखुलास एकत्र रडायचे अन हसायचे ते ... न चुकता पहिल्या पावसात भिजायचे ते ... गर्दीतहि स्वतापुरते वेगळे असायचे ते ...

वार्धक्याला शाप असतो जगण्याचा ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 30/09/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
हळूहळू दिवस संपून जातात तारुण्याचे नि अलगद येतात दिवस वार्धक्याचे जात नाहीत दिवस ठाम थांबून राहतात बंद पडलेल्या घड्याळासारखे ...!!
काव्यरस

राष्ट्रसंघातील पंतप्रधानांचे भाषण अहितकारक?

लेखक इष्टुर फाकडा यांनी गुरुवार, 29/09/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा सकाळ मध्ये आलेला लेख जरूर वाचा, जसाच्या तसा इथे पेस्ट करत आहे....लेखकाचे नाव आणि जालिय - पत्ता लेखाच्या खाली दिलेला आहे. आपल्या पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेले भाषण भारताच्या दीर्घकालीन हितांना पोषक आहे काय? कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते.

अन्ताजीची बखर

लेखक अनिवासि यांनी गुरुवार, 29/09/2011 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच नन्दा खरे लि़खीत 'अन्ताजीची बखर' हे पुस्तक वाचले. आता पुढील भाग 'बखर अन्तकाळ्ची' हे वाचत आहे, मराठी इतीहासाचा एक नवा चेहरा पहावयास मिळाला. इतर कोणी मिपाकरानी वाचले असल्यास प्रतिसाद वाचायला आवडतील.

‘फोर लायन्स’ – बावळट जिहादींची आचरट ब्रिटिश कॉमेडी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 29/09/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Four Lions - Poster कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.

खादाडांसाठी कुपोषितांचे रक्तदान

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 29/09/2011 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक अर्थव्यवस्था आज एका ऐतिहासिक वळणावर उभी आहे. युरोपातल्या सगळ्या देशांची एकत्र मोट करून एकच चलन असलेली एकत्रित अर्थव्यवस्था त्यातल्या अंतर्भूत दोषांमुळे टेकीला आली आहे. युरोपातल्या जर्मनीसारख्या देशांची स्वतःची परिस्थिती बरी असली तरी ग्रीस, स्पेन आणि इटली या दिवाळखोरांच्या धोंडी गळ्यात बांधल्या गेल्याने भलेभले देशही बुडायला लागले आहेत. "युरोप बुडतोय आणि स्वतःबरोबर जगातल्या दोन सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था घेऊन बुडतोय" यावर सगळ्यांचंच एकमत झालंय. या दोन सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणजे अर्थातच अमेरिका आणि चीन.

पल पल दिल के पास.... एक स्वर्गीय अनुभव

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 29/09/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
पल पल दिल के पास! स्वर्गीय आनंद!!! इथे सुरवातीचे गिटार व अकॉर्डीयनने गाण्याची एन्ट्री तर फारच रंगली आहे. मोहक राखी अन् भावूक धर्मेंदर! त्या सिनेमाचे एक आणखी वैशिष्ठ्य- त्यातील धर्मेदरचे विविध ड्रेसेस. त्यात तो फारच रुबाबदार वाटतो. "हर रात यादों की बारात ले आए। " म्हणताना त्याच्या लांब कॉलरच्या रंगीत शर्टात....

उत्तरायण

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 29/09/2011 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
'उत्तरायण' हा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर लिहाव्या वाटलेल्या काही ओळी : "दुर्गी करशील का गं माझ्याशी लग्न ?" "खूप उशीर झाला रे रघू ...सगळ्या गोष्टी वेळेत व्हाव्या हेच होतं एक स्वप्न " "माझा जीव होता आधीपासून तुझ्यावर" "कधीच कळलं नाही रे; नसता सोसावा लागला घडलेल्या गोष्टींचा भार" "अजूनही वेळ नाही गेली उरलेले क्षण वेचत करू एकत्र प्रवास" "आयुष्याची संध्याकाळ झाली .. नको इतरांना आपल्या नवीन नात्याचा त्रास" "पुष्कळ भोगून झालंय तुझं .. उरलेल्या संध्येला तरी न्याय देऊ" "भिती वाटते मला सुखाची.. अगदीच खचून जाऊ" "जाऊ आपण दूर कोठे .. दु:खालाही न कळे वाट.. नव्या किरणांनी सुरू करू आयुष्याची नवी पहाट "

टॅमरिंड राईस/ पुलिओदराई/ चिंचेचा भात

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 29/09/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २ वाटया तांदळाचा शिजवलेला भात पाऊण ते एक वाटी जाडसर चिंचेचा कोळ (आपल्याला आबंटपणा किती हवे, त्याप्रमाणे कमी-जास्त करणे) १ टीस्पून चणाडाळ १ टीस्पून उडदाची डाळ १ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून हिंग ७-८ कढीपत्ता २-३ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून शेंगदाणे ३ टीस्पून तीळ व १ टीस्पून मेथीदाणे कोरडेचे भाजून त्याची एकत्र पुड करून घेणे मीठ चवीन