Skip to main content

सीमोल्लंघन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 07/10/2011 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा! रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं. पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.

काही श्लोक

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 07/10/2011 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे काही वाचतो, पहातो त्याचे आपल्या मनःपटलावर विचारतरंग उमटत असतात. आणि हे बरेवाईट विचारतरंग मूर्त स्वरुपात घटना बनून आपल्या आयुष्यात येतात. मला याचा इतक्यादा अनुभव आला आहे की योगायोग म्हणवत नाही. आतापर्यंत देवाची भक्ती करताना मी जे काही मंत्र म्हटले आहेत त्यामध्ये ढोबळमानाने मला पुढील प्रकार आढळले - (१) देवतेची स्तुती, (२) रक्षण करणारे कवच, (३) सुप्रभात, (४) धूप, शेज आदि आरती, (५)पाळणा.

आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 07/10/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय. १. आय आय टी होली काऊ आहे काय? नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला. २. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का? डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे.

अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 07/10/2011 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्‍या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.

स्टीव्ह जॉब्ज

लेखक विकास यांनी गुरुवार, 06/10/2011 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच जालावर वाचले की अ‍ॅपलने संपूर्ण संगणक जगात क्रांती घडवून आणणारे स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन झाले. This was the commercial that introduced the Apple Macintosh Computer to the world. अतिशय प्रेरणादायी जीवन जगलेल्या या व्यावहारीक संशोधकाला सलाम आणि श्रद्धांजली. अजून बरेच काही लिहीता येण्यासारखे. पण तुर्तास इतकेच...

इंडोवेशन

लेखक विकास यांनी बुधवार, 05/10/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि चेतन भगत यांचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कंपन्यां कशा या मुलांना वापरतात यावरून वाद चालला होता. पण दोघांचाही आपल्याकडील सिस्टीम आणि त्या सिस्टीमचे प्रॉडक्ट असलेले व्यावसायीक अशा दोन्हीवर रास्त असला तरी काहीसा त्रागाच दिसत होता. त्याच्याकडेच बघण्याचा दुसरा दृष्टीकोन कर्मधर्मसंयोगाने मला काल ऐकायला मिळाला. ठिकाण होते एम आय टी आणि वक्ते होते, डॉ. रघुनाथ माशेलकर. विषयाचा मथळा होता: Innovation's Holy Grail: Getting More from Less for Many. उपस्थित हे भारतीय तसेच अभारतीय होते - विद्यार्थी, प्राध्यापक/फॅकल्टी, उद्योजक आणि शास्त्रज्ञ.

नव्या संपादकांचे अभिनंदन

लेखक क्रेमर यांनी बुधवार, 05/10/2011 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे.

खरडवही व खरडफळ्यावरील मजकूर

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 05/10/2011 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर लेखन करण्यासाठी काही संकेत आहेत. त्यानुसार सामाजीक संकेतांचे पालन करून येथे जाहीर लेखन केलं जातं. यासोबतच मिसळपाववर खरडवही आणि खरडफळा अश्या सोई दिलेल्या आहेत. यापैकी खरडवही जरी सदस्याची व्यक्तीगत असली तरी त्यावरचा मजकुर अन्य सदस्यांना दिसतो.त्यामुळे खरडवही आणि खरडफळा या दोन्ही जागी काही लिहायचे असल्यास त्यावर सुध्दा मिपाचे नियम लागू होतात. गेल्या एकदोन दिवसांत मिपावर जो काही प्रकार चालू आहे तो चुकच आहे. मात्र त्या लिखानात तांत्रीक दृष्ट्या तरी चुक काढता येत नाही. मात्र त्याला विरोध म्हणून खरडवहीत जे खालच्या पातळीवर लिहील्या गेलं आहे ते तर १००% चुकच आहे.