Skip to main content

तू ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 10/10/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे काजळ घाली मोहोळ काया कातळ भासे मृगजळ सौंदर्य नितळ सरली मरगळ भावना कुरळ जशी हिरवळ करुनी ओंजळ झेलले वादळ आसांचे वर्दळ घाली गोंधळ तुझाच दरवळ घालतो भुरळ अशी आलीस जवळ आता अंतर अडगळ आता अंतर अडगळ - विश्वेश

हाथ छुटे भी तो...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 10/10/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न.

गझल सम्राटाचे निधन

लेखक Dhananjay Borgaonkar यांनी सोमवार, 10/10/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध गजल सम्राट जगजित सिंग यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेज मुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अतिशय प्रतिभावान कलाकार होते ते.

चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..

लेखक गवि यांनी सोमवार, 10/10/2011 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो. नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी.. काय?.. सांगतो.. सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्‍या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या. तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच.

कधी कधी स्वप्ने छान पडतात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 10/10/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी स्वप्ने छान पडतात हवी हवी अशी मस्त वाटतात स्वप्नात आपले वय दिसत नसते जसे स्वप्न तसे वय होऊन जाते कधी असतो आपण मस्त तरुण मन सुद्धा जाते गाणे गाऊन प्रेम सुद्धां अगदी छान जमून जाते प्रेमामध्ये मन हरवून जाते कशी मस्त मस्त ती दिसत असते अगदी हवी तशी वाटत असते रंगी बेरंगी फुलपाखरासारखी मनात कशी झुलत बसते ...? अशी स्वप्ने अशी स्वप्ने कशी अलगद अलगद येतात .? साखर झोपेत कशी गाणी गाऊन जातात अशी स्वप्न मोडू नये असे खूप वाटून जाते पण स्वप्नाना शेवट असतो हे खूप खरे असते तरीही काही स्वप्ने खूप काही देऊन जातात तुमचे मन टवटवीत नि सकाळ छान करून जातात ...!!

फिल्म दि मेसेज

लेखक यकु यांनी रविवार, 09/10/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते.

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/10/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ|| नका भानात वाहन चालवू नका जरा तेथे कधी थांबू दिसली नाही आगगाडी जरी जरा वेगात चलावं रुळावरी सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१|| लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता?