Skip to main content

पारंपारिक आकाशकंदिल

लेखक प्रिया ब यांनी मंगळवार, 11/10/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दसरा झाला, आता वेध लागले आहेत ते दिवाळीचे.... चकली, चिवडा, लाडू, फटाके, दिवे,पणत्या इति. आज मी एक सोप्या पद्धतीचा आकाशकंदिल दाखवणार आहे. साहित्य: - चार्ट पेपर (१) - काइट पेपर (२/३) - सोनेरी कागद (१) - फेविकोल - कात्री - पेन्सिल - पट्टी - दोरी/रिबिन क्रुती: १.

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

लेखक प्रास यांनी मंगळवार, 11/10/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय. कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे.

"दर्शन"

लेखक धन्या यांनी मंगळवार, 11/10/2011 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, या टुकार धाग्यासाठी क्षमस्व. मी जालावर मंगेश पाडगांवकरांची "दर्शन" ही कविता शोधतोय परंतू सापडत नाही. कवितेची सुरुवात "मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन" अशी आहे. काही ओळी मला पुसटशा आठवत आहेत. तू नाहीस? या वसंतातून कोण फुले मग तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग होत्या लाटा उधळीत आपुल्या फेनिल त्या कविता (?) फुलाफुलातून अखंड उमलत होती ती नवता (??) तुला पाहिले ऋतू-ऋतूतुन, स्थितीगतीतून... इत्यादी. कुणाकडे ही कविता पुर्ण उपलब्ध असल्यास इथे टंकू शकाल काय? धन्यवाद.

कोठे जाशी भोगा...!!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 11/10/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा.... ''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा...

प्रवास

लेखक प्रिया ब यांनी मंगळवार, 11/10/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी नेहमी वाटे कधी आपण मोठे होणार!!! बाबांसारखी brief case घेऊन कधी बरं office ला जाणार कल्पना साडी नेसून खेळू मैत्रीणी घर-घर हातात purse आईची आणि बाहुली असे कडेवर हळू हळू शिकत पुढे शिक्षण आपलं पूर्ण करतो टप्पे टोणपे खात engineer म्हणून बाहेर पडतो मग सुरू होतो आपला खरा अनोळखी प्रवास चालू होतात Campus Placements साठी चकरा आणि वाचू लागतो Classifieds Written Test, Tech round, HR च्या सापडतो जाळ्यात काही प्रयत्नानंतर अडकून जातो Corporate च्या विळख्यात Induction program नी मन अगदी मोहून जातं घर्-बस-office-weekend हे सगळंच अंगवळणी पडतं Office सुदधा एक शिक्षणाचं दालन बनतं, भेटतात स्वभाव चित्र

आज मी जरी का नसलो येथे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 11/10/2011 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
जरी का नसलो येथे
आज मी जरी का नसलो येथे आठवणीत मी असणार आहे लिखाणात मी नसेना कोठे काव्यात मी असणार आहे ||धृ|| कोठून आलो कोठे निघालो? कोठे थांबून कोठे गेलो? थांग या सार्‍याचा कधी मला लागलाच नाही ||१|| अवचीत न जाणो का कधी भेट आपली झाली होती ओळखीचे वाटेन जेव्हा लकेर एक येईल कानी ||२|| मला न उरली काही आसक्ती आज कसली तोडूनी बांध सारे सागरा मिळाले सरितेचे पाणी ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ११/१०/२०११
काव्यरस

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.