Skip to main content

घरगुती आकाशकंदील (छायाचित्रांसह)

लेखक स्वतन्त्र यांनी शुक्रवार, 28/10/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! ******************************* सर्वप्रथम, गणपा,आपला 'मदत -मिपावर फोटो चिकटवणे.' हा धागा खूपच उपयोगी आहे. वल्ली आणि पैसा -धन्यवाद,तुम्ही मदत केल्यामुळेच मी छायाचित्रे टाकू शकलो. धागा वाचून मला मी केलेली चूक कळाली आहे.मी छायाचित्राच्या 'प्रॉपरटीज' मध्ये जाऊन युआरएल कॉपी न करता ब्रोवसर मधली केली होती म्हणून हा घोळ झाला. पहिला धागा संपादित न करता आल्यामुळे,हा नवीन धागा टाकला आहे. माझी संपादक मंडळाला नम्र विनंती आहे कि त्यांनी पहिला धागा 'घरगुती आकाशकंदील' हा धागा उडवून टाकावा. कदाचित,या आधी धागा संपादित करण्याचा पर्याय उपलब्ध होता.

महेश लंच होम..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 28/10/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या. एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं. आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय.

हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस !!!

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 28/10/2011 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मेघना आज एक वर्षाची झाली. मेघना मी एक वर्षापूर्वी घेतलेली कार. ह्युंदाई आय टेन मॅग्ना १.२ या तिच्या पुर्ण नावामधल्या फक्त मॅग्नाचं मराठीकरण करुन आम्ही तिचं नाव मेघना ठेवलं. गेल्या वर्षी साधारण सप्टेंबर मध्ये आयुष्य भयानक कंटाळवाणं झालं होतं. जे व्हायला हवं असं वाटत होतं ते होईल असं अजिबात वाटत नव्हतं आणि जे व्हायला नको असं वाटत होतं ते मात्र पिच्छा सोडायला तयार नव्हतं. यातलं एक म्हणजे माझं ऑफीसमधलं काम. मी वेब डेव्हलपर आहे या वाक्याचा भुतकाळ झाला होता. आता मी जगभरात तीन हजार युजर्स असलेल्या आणि रोज काही ना काही फाटणार्‍या वेबसाईटचा टेक्निकल लीड होतो, सोळा जणांच्या टीमचा टीम कॉर्डीनेटर होतो.

ए रोझ फॉर ए रोझ

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 28/10/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबांचा गुलाब. गुलाबांचा डॉल्फीन.

दूर गाव माझा

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 28/10/2011 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
राहिला दूर गाव माझा मी असा का भरकटलो श्वास इथे अन आत्मा तिकडे खरे, असा मी का जगलो? क्षण क्षणातून जगलो मी का कण कणातून मी वधलो नेत्र इथे अन अश्रू तिकडे खरे, असा मी का रडलो? नव्हता दुश्मन रणही नव्हते दमून पुरता मी हरलो हृदय इथे अन स्पंदन तिकडे अरे असा मी का लढलो? जावे फिरूनी कुशी गावच्या साद गावची घुमत असे उगव भास्करा रात्र ढळू दे प्रभात मंगल पुन्हा दिसे.
काव्यरस

मोंगलाई बिरयाणी

लेखक जागु यांनी गुरुवार, 27/10/2011 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बासमती तांदूळ १ किलो मटण किंवा चिकन १/२ किलो दही ४०० ग्रॅम अननस १ (गोल चकत्या करुन) सुके आलू बुखार (७-८) ४-५ कांदे (उभे चिरुन) बटाटे (उभे कापुन) लवंग - १६ दालचिनी ८ तुकडे तमालपत्र ८ वेलची १० काळीमिरी १६ जिर १ चमचा मिरची पावडर १ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे हिंग हळद मिठ ३-४ चमचे तेल तुप गव्हाचे पिठ (मळून)

बदामपोळी

लेखक मितान यांनी गुरुवार, 27/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका काकुंकडे जेवायला गेले होते. तिथे हा बेत होता. काकूंचं घराणं वेदशास्त्रसंपन्न प्रवचनकारांचं. आजच्या म्हणजे दिवाळीपाडव्याच्या दिवशी हा नैवेद्य परंपरेने चालत आलेला आहे असे काकू म्हणाल्या. तुपात भिजलेली ती एक पोळी खाऊन दुपारी घरी येऊन जी झोपले ती तीन तासांनी आईने हलवून उठवल्यावरच उठले !!!