Skip to main content

दोनुली-नदीचा काठ

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

दोनुली- पायवाट

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

दोनुली - प्रश्न

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं.

शाप आदीमायाशक्तीचा......!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 04/11/2011 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
शाप आदीमायाशक्तीचा......!

नाकतोंडात नळ्या घुसल्यावर
ती कासावीस झाली
रसायनाचा मार, हवेचा दाब
श्वास गुदमरला.....
प्राण निघायला लागला...
प्राण डोळ्यापर्यंत पोचताच
तिने पापण्या घट्ट मिटल्या
प्राण अडवला, मुठी आवळल्या
तोच तोंडातून शब्द फुटलेत
देवा! ..... वाचव रे देवा!!
दुसर्‍याच क्षणी संचारली तिच्यात
आदी-माया-शक्ती
गर्भाबाहेर आली.... आणि
कडाडली... वीज होऊन....!

"बाबा! का संपवलंत तुम्ही मला

क्रेयोन आणि मार्कर आर्ट!!

लेखक पूनम ब यांनी शुक्रवार, 04/11/2011 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेयोन आणि मार्कर वापरून बनवलेली चित्रे.. बांगडी चा वापर करून विविध रंगाच्या क्रेयोन ने वर्तुळे काढून घेतली आणि मार्कर ने त्यावर गणपती बाप्पा चे स्केच बनवले. काळ्या रंगाचा मार्कर वापरल्यामुळे गणपती उठावदार दिसत आहे.

लेडीज स्पेशल ट्रेन-एक सर्व्हे

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 03/11/2011 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
विनिता देशपांडे यांचा लेख वाचून मला काही दिवसांपुर्वीची आठवण झाली.. आम्ही काही जणींनी मिळुन संध्याकाळी सी एस टी हून सुटणार्‍या लेडीज स्पेशल ट्रेन मधे सहज एक प्रश्णावली दिली होती, अनेक जणीनी उत्तर दिलीच, शिवाय अशिक्षित बायकाना ही विचारून त्यांच्या वतीने उत्तरे भरली.. एक खूप छान अनुभव होता, पण निष्कर्ष तेवढा छान नव्हता..आश्चर्य म्हणजे, सगळ्यांच्या उत्तरात अनेक समान गोष्टी होत्या..अर्थात, यात काही सिध्द करणे वा रडगाणे गाणे वा खाजगी गोष्टीत नाक खुपसणे हा उद्देश नव्हता. जरा, सगळ्यांना व्यक्त होण्याची सन्धी देणे आणि मैत्री करणे ,हे अपेक्षित होतं.

Dual SIM मदत/सल्ला हवाय....

लेखक मन यांनी गुरुवार, 03/11/2011 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल? १.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.) २.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्‍या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.) आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको.

एका द्वयर्थी गीताचे रसग्रहण

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 03/11/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखाद्या वाक्यरचनेतून एकाहून अधिक अर्थ ध्वनित होतात तेव्हा श्लेष अलंकार साधला जातो. या गाण्यातही अशाच प्रकारे वाक्यरचनेतून दोन अर्थ आपण काढू शकतो.