माझी राधा- ६
चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला.
मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते.
मागील दुवा : http://misalpav.com/node/50097
बराच वेळ त्या फांदीवर बसून राहिलो. डोक्यातला राग जात नव्हत. मग मीच माझ्याशी बोलू लागलो. "बघ तुला आता कळेल कान्हा किती चांगला आहे ते. दहीदूध की काय एकटा खातो का.
मिसळपाव