Skip to main content

बीट आणि नारळाची कोसांबरी

लेखक Bhakti यांनी रविवार, 28/08/2022 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीची तयारी सुरू झाली,म्हणजे इट क्लीन :) मागे इथेच कोसांबरीची रेसिपी कोसांबरी वाचली होती.साधी सोपी आवडली होती. भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर यात होतो.मी बीट आणि ओल्या नारळाचा वापर केलाय. प्रोटीन आणि आयर्न यांचा चांगला मेळ यात मिळतो. साहित्य- एक किसलेले बीट,काकडी,सफरचंद एक वाटी किसलेले ओले नारळ एक वाटी भिजवलेली मुगडाळ एका लिंबाचा रस चवीनुसार चिरलेली मिरची,मीठ,चाट मसाला,साखरदाणे

मराठी संगीतकार ॠषिराज : माहिती पाहिजे

लेखक चौथा कोनाडा यांनी शनिवार, 27/08/2022 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
१९७८ - ८० चा सुमार असावा, बन्याबापू या सिनेमाची गाणी खुप गाजत होती. मी कशाला आरशांत पाहू गं, हे गर्द निळे मेघ, ले लो भाई चिवडा ले लो, प्रीतीचं झुळझुळ पाणी ही गाणी आकाशवाणी आणि गल्लीबोळातही गाजत होती. उषा मंगेशकर बरोबर हिंदीतील अमीतकुमार, शैलेद्र सिंग यांचा ही प्रेक्षकांना खुप पसंत पडला. ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सवातील मेळ्यामेळ्यात, कॉलेज मधील स्नेहसंमेलनात ही सादर होणार हे ठरलेले होते.

खरकट्या मिसळीची गोष्ट

लेखक मीउमेश यांनी शनिवार, 27/08/2022 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण !! प्रवासात चांगली आणि प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते या शोधात मी असतो. कित्येक वेळा तर मिसळ खाण्यासाठी फार दूरवरचा प्रवास मी केला आहे. मी मुळचा ठाणेकर असल्यामुळे मामलेदार मिसळ ही आमच्यासाठी पंढरी आणि आम्ही मिसळपंढरीचे वारकरी. सध्या मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा सुळसुळाट झालेला आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकच्या काळया मसाल्याची मिसळ, कुठे चीज मिसळ, सर कुठे तंदुरी मिसळ, कुठे मडक्यातली मिसळ, तर कुठे अजून काही..

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस !

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/08/2022 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अ‍ॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे.

एक किस्सा

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 26/08/2022 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक किस्सा असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे. अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते. हाच तो हाच तो संघी बौद्धिक कावा वगैरे बोलायला लागले. आणि भारतीय लोकांना वाईट खोड आहे की जे काही जगात आहे ते भारतीय लोकांनीच शोधले - ते तडतडलेच! मी म्हणालो माझा आणि संघाचा काही संबंध नाही. ते जरा थंड झाल्यावर त्यांच्या एका ज्युनियर डाव्याने विचारले की असे कसे बोलू शकता तुम्ही? अकाऊंटींग हे ईटालियन आहे. आणि त्यांनी ही पद्धती शोधून काढली. आणि याचे पुरावे आहेत.

खेला होबे

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 25/08/2022 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-unive… शे बोल से खेला होबे, भाजपा बोल से एटा ना चोलबे .... काय म्हणत असतील स्वर्गात टागोर गुरुनाथ ? बघून कुलगुरु गेला आत !! कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य कोलकाटा शिक्षक घोटाळा होलघाटा शिक्षणाचा वाटोळा पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री तीन दिवस नोटा मोजती यंत्रे अटकेत मुखर्जी अर्पीता पार्थ सर्व क

सजलेल्या दख्खनच्या राणीतून प्रवास (भाग-1)

लेखक पराग१२२६३ यांनी बुधवार, 24/08/2022 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खनची राणी त्या दिवशी दख्खनची राणी प्रवासाला निघण्यापूर्वी कधी नव्हे इतकी सजत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या तिच्या नेहमीच्याच फलाट क्र. 9 वर ती खूप लवकर येऊन उभी राहिली होती.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 24/08/2022 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७ आधिचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६ "ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..."

पुण्याजवळ, एकदम कमी पैशात होणारे रेंज ट्रेक

लेखक आंद्रे वडापाव यांनी मंगळवार, 23/08/2022 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
** उत्तराधिकारास नकार लागू ** सदर माहिती ही, आंतर्जालावरून गोळा करून इथे दिलेली आहे **या धाग्याचे प्रयोजन, हे ट्रेकच्या बाबतीत , मिपा वाचकांच्या मनात ब्रेनस्टॉर्मिंग सुरु करून देणे हा असुन ... **सादर माहितीच्या अचुकतेची कुठलीही शाश्वती नाही (जरी मी यातील ट्रेक स्वतः केलेले असले तरीही), वाचकाने स्वतःच्या रिस्कवर, ट्रेक करावा **हे ट्रेक करताना अगोदर पूर्ण माहिती घ्या, पाणी, जेवण बरोबर घ्या, माहितीचा माणूस बरोबर असेल तर उत्तमच.