Skip to main content

वाळवणं

लेखक त्रिवेणी यांनी गुरुवार, 15/10/2015 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाळवणं म्हणजेच काय तर अडीअडचणीला उपयोगी पडणारे पदार्थ. आदिमकाळात जेव्हा मानव शिकार करू लागला, शेती करू लागला तेव्हापासून तो धान्य, वस्तू साठवायला शिकला. पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी ते मीठात खारवून ठेवणे, वाळवून ठेवणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करू लागला, आणि हीच पद्धत आपण आजपर्यन्त चालू ठेवलीय. उन्हाळा आणि वर्षभराचे वाळवणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. वर्षंभराचे हे पदार्थ करण्यासाठी प्रत्येक घरातील बायका पदर खोचून कामाला लागतात. मला आठवतं, आम्हालाही त्यात छोटी-छोटी काम सांगितली जायची. सगळ घरच या वाळवणाच्या तयारीला लागायचे. मी मुळची खान्देशी, फेब्रुवारीपासूनच ऊन तापायचे.

भेंडी पुराण

लेखक विशाखा राऊत यांनी गुरुवार, 15/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला नेहमी सांगितले जाते की भाज्या खाणे आरोग्याला गरजेचे असते. भेंडी ही भाजी अशी आहे कि ज्याला आवडते त्यांना खूपच नाहीतर मग नो नो नो. कोणीही करु दे चेष्टा भेंडीची पण भाजीत भाजी भेंडीची आणि भेंडी माझ्या प्रितीची! . * छायाचित्र आंतरजालावरुन साभार मग चला तर आज भेंडी पुराण मध्ये काही नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळे प्रकार बघुयात. १.

कोशिंबिरी

लेखक अजया यांनी गुरुवार, 15/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
. * छायाचित्र कोलाज आंतरजालावरुन साभार आपल्या मराठी जेवणात ताटाच्या डाव्या बाजूच्या पदार्थांचंही एक वेगळंच महत्त्व आहे. नुसतं बोट लावून चाखलं की जेवणाचा स्वाद आणि चव वाढवणारे हे पदार्थ. आजकालच्या डायेटवर लक्ष देऊन खाण्याच्या जमान्यात सॅलड्चं महत्व फारच वाढलंय. आपल्या कोशिंबिरीही हेच काम करतात आणि जेवणातली मजा वाढवतात.

आंब्याचे गोड तिखट लोणचे

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 15/10/2015 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य ---- राजापुरी कैरी २ किलो गूळ १ किलो लोणचे मसाला १०० ग्राम मिरची पावडर १ टेबल स्पून कढीपत्ता १ वाटी मीठ पाव वाटी (आवडीप्रमाणे कमी जास्त) लवंग १० मिरे १५ धने २ टी स्पून सुक्या मिरच्या १० तेल ३०० ग्राम पाणी २०० मिली कृती ----- राजापुरी कैऱ्या आणून धुवून सोलून घ्याव्या.

जायफळाच्या सालींचे लोणचे आणि मुरांबा

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 15/10/2015 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाककृती देण्यापूर्वी जायफळाचे झाड ज्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी हा फोटो. jayfal ही झाडावर दिसणारी फळे खालच्या बाजूने तडकतात आणि त्यातून जायफळ मिळते. जायफळ, त्यावर कडक आवरण, जायपत्री आणि त्यावर जाड साल असते. हे साल चवीला आंबट असते. त्यामुळे त्यापासून लोणचे, मुरंबा होऊ शकेल असे वाटले म्हणून हा प्रयोग.

काही पारंपारिक झटपट तोंडीलावणी

लेखक Maharani यांनी गुरुवार, 15/10/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात इन्स्टंट फूडला खूप महत्त्व आले आहे. बाजारात अनेक प्रकारची इन्स्टंट फूड्स मिळतात. पण आपल्या काही पारंपरिक पाककृती पण आहेत ज्या एकदा बनवून ठेवल्यावर हवे तेव्हा हव्या त्या प्रकारे झटपट वापरता येतात. आज मी पाककृती देत आहे आपल्या काही पारंपरिक कोरड्या तोंडीलावण्यांच्या ज्या भरपूर पौष्टिक तर आहेतच पण एकदा बनवून ठेवल्यावर झटपट वापरता येण्याजोग्या आहेत. डांगर: डांगर च्या प्रत्येक ठिकाणच्या करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काहीजण पोह्याचे डांगर बनवतात, काही उडदाचे तर काही मटकीचे.

ताटाभोवतीची सजावट(महिरप)

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 15/10/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! जागतिक अन्न दिनाच्या शुभेच्छा! k अन्न ही माणसाची मूलभूत गरज. माणसाला जगायला काय हवे असे विचारले तर उत्तर येईल अन्न, वस्त्र, निवारा. तर यातील अन्न मुख्य. आता माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो हा प्रश्न आला तर आपण बहुधा खाण्यासाठी जगणार्‍या गटात मोडू. बहुतेकांना खाण्याची आवड असतेच. बरोबरच आहे म्हणा सुरेख, स्वादिष्ट, रुचकर जेवण कोणाला आवडणार नाही?

काय वाढले पानावरती !

लेखक अनाहिता यांनी गुरुवार, 15/10/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे. हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च, घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरच नवल ! . गदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर, चविष्ट उदाहरण :) आता यापुढच्या लेखांमध्ये अशाच भरल्या ताटाचा अनुभव घ्यायला सज्ज होऊया! फोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर

आहारतज्ञाशी गाठ

लेखक अजया यांनी गुरुवार, 15/10/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यासाठी अन्न महत्वाचे आहे. आपल्या आहारात योग्य ती पोषकतत्वे असली तर शरीर निरोगी राहतं, शरीराची वाढ, विकास, शक्ती ह्यावर नियंत्रण ठेवता येतं. मानसिक आरोग्य संतुलित राहतं. आपण आपली जीवनशैली सुधारून, योग्य आहार घेऊन, व्यायाम करुन आरोग्यपूर्ण ठेवले तर आपले स्वास्थ्य निरोगी व शरीर सुदृढ बनेल. आणि यासाठीच रुची विशेषांक करायला सुरूवात करतानाच आहाराची योग्य माहिती आपण आहारतज्ञाकडूनच मिळवू असं ठरवलं होतं आणि तृप्ती ताम्हाणे या आहारतज्ञ मैत्रिणीची ओळखीतून गाठ पडली. तिनेही दिलखुलासपणे आम्हाला मुलाखत देण्याचे मान्य केले. या मुलाखतीदरम्यान आहाराचे अनेक पैलू नव्याने उमजले. अनेक गैरसमजांवर प्रकाश पडला.

दि केक आर्टिस्ट

लेखक उमा @ मिपा यांनी गुरुवार, 15/10/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवसाय उभा करायचा म्हणजे भरपूर भांडवल, विशेष प्रशिक्षण, वेगळे मनुष्यबळ या गोष्टी हव्यात ही समजूत बाजूला सारत अंगभूत कलागुणांचा उपयोग करून घेत, इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर यशस्वी घरगुती व्यवसाय उभारला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे, वृषाली विनोद. ग्राहकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्सचे केक बनवून देण्याचं काम वृषाली करते. हा तिने स्वतः सुरु केलेला घरगुती व्यवसाय आहे.