Skip to main content

कांद्याच्या पातीचा घोळाणा

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 15/10/2015 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे नेहमी मेथी, पालक याचा घोळाणा करतात. त्याबरोबर कांद्याच्या पातीचा घोळाणा सुद्धा करतात. पोळी बरोबर खायला छान लागतो. साहित्य: 1. कांद्याची पात 2. शेंगदाण्याची पुड 3. मीठ 4. साखर 5. तेल कृती: कांद्याची पात बारिक चिरून घ्या. एका बाऊल मध्ये चिरलेली कांद्याची पात,शेंगदाण्याची पुड,मीठ,साखर,तेल (सर्व अंदाजाने)टाका. सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करा.

मेजवानी

लेखक अनाहिता यांनी गुरुवार, 15/10/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
सहभाग - इशा१२३, मितान, Maharani, स्वाती राजेश, प्रश्नलंका, स्मिता श्रीपाद, विशाखा राऊत. .

किचन टिप्स

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 15/10/2015 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
* लाटणे फ्रिजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. * मासे खाताना काटा घश्यात अडकल्यास एक-दोन केळी खावीत. * काजू व इतर ड्रायफुट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लंवग टाका. * कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. * स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा.

अ-'रुचि'क कहाणी(ण्या)-प्रीतमोहर पिशी अबोली

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 15/10/2015 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
'रुची' म्हटलं की खास मिपासंदर्भात पाकृ दालनात आलेल्या असंख्य तोंपासु आणि डोनि (डोळे निववणार्‍या) रेशिप्या आठवणं साहजिक आहे. पण काही मिपाकर सुगृ असले म्हणून काय झालं, अनेक मिपाकर तर नुसते गृ सुद्धा झालेले नाहीत अजून. (सं.-द्यायला पाहिजे का? एक ४-५ खव उघडा रँडम. सापडतील अनेक सारे ;)) किचन नावाच्या रणभूमीवर पदार्पण करताना अनेक लोकांच्या थेट पोटावर वार होत असतात. तरीही पोटात भूक कोकलत असताना हे 'सुरीधाराव्रत' सांभाळणं येरागबाळ्याचे काम नोहे. रुची विशेषांकात या पहिल्या लढायांच्या 'रम्या कथा' आल्याच पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटलं.

रेट्रो कांदेपोहे

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 15/10/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर : ( खालील लेखाचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी लेख १९१३च्या एखाद्या मराठी चित्रपटाची नायिका ही आपल्या फ़्लशबॅकमध्ये जाऊन सांगत आहे अशा टोन मध्ये वाचा. ) सन १९९९ जानेवारी. नुकतेच ऑक्टोबर मध्ये १८ पूर्ण केले होते आणि अचानक घरामध्ये आमच्या शुभमंगलाचे वारे वाहू लागले आणि आम्ही सावधान झालो. अरे माझे वय काय आणि एवढ्यातच मला ही काळ्यापाण्याची शिक्षा? पण तेव्हा वडीलधाऱ्याचा नजरेचा धाकच असा की हे विचार वादळासारखे मनात घुमत राहायचे. पण विचार जरी मनात घुमत असले तरी वयानुसार मनात स्वप्नांचे वसंत फुलतच होते आणि त्या वसंत बहरातून आमच्या मनीच्या राजकुमाराचा धुसरसा का होईना एक चेहरा अस्पष्ट दिसू लागायचा.

वजन कमी करण्यासाठी आहार

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 15/10/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वजन २०१२ पर्यंत ७५ किलो होते ते ६ महिन्यात ५८ किलोवर आणले आणि आमच्या घरात मी न भूतो न भविष्यति असा इतिहास घडवला! काही केल्या मी खाण्याच्या बाबतीत काहीही कंट्रोल करु शकत नाही आणि वजन तर या जन्मी कमी होणं शक्य नाही इतका माझ्या घरच्यांना माझ्यावर दांडगा विश्वास. पण मी त्या विश्वासाला तडा देउ शकेन हा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता. वजन जास्त असताना शिर्डी पदयात्रा केली तेव्हा घरातल्यांच्या एका विश्वासाला तर मी तडा दिलाच होता पण त्यावेळी मला भरपूर त्रास झाला होता हे मी अनुभव कथनात दिलेले आहेच.

पथ्थ्याच्या पाककृती

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 15/10/2015 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
‘पडू आजारी मौज हीच वाटे भारी’ ही कविता लहानपणी अभ्यासाला होती. तेव्हा शाळा बुडवायला आवडत नसले तरी आजारपणाचा आहार ऐकून तरी आजारी पडावे असे वाटे. पण मोठे झाल्यावर आणि त्यातूनही लग्न झाल्यावर कोणाचे आजारपण म्हटलं की, धडकीच भरे. कारण आता कुटुंबियांचा आहार स्वत: सांभाळायची वेळ येत असे. शक्यतो घरातल्या सगळ्यांनीच तेव्हा आजाऱ्याला चालणारे पदार्थ खाल्ले तर काही हरकत नसते. पण कडक पथ्य असलेल्या आजारात असे शक्य मोठेच प्रश्न असतात. अशावेळी सुगरणीची कसोटी लागते. आजारी व्यक्तीची सहनशीलता पुढे येणारे अन्न आनंदाने खाण्यासाठी टिकून रहावी यासाठी तिला नाना प्रयोग करावे लागतात.

आंतरजालावरील फूडब्लॉग्ज आणि फूडसाईट्स

लेखक के.पी. यांनी गुरुवार, 15/10/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल नवीन पदार्थ करायचा म्हटलं की आपण लगेच वेगवेगळी पुस्तके,फूडब्लॉग्स, खादयपदार्थांच्या वेबसाईट्स, मासिके शोधायला जातो,चाळत रहातो. त्यात मनासारखी पाककृती किंवा असंही म्हणा तोंडाला पाणी सुटणारा एखादा फोटो दिसला की, ती पाककृती करायला आपण मानसिकरीत्या तयार होतो आणि मग लवकरच तो पदार्थ आपल्या घरी बनवला जातो. इथे मी तुम्हाला आंतरजालावर असणार्‍या अशाच काही फूडब्लॉग्स आणि फूडसाईट्स बद्दल थोडीशी माहिती देणार आहे.

कॅम्पिंग मधले खाणे

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 15/10/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कॅम्पिंग करायला आम्ही सदैव उत्साही असतो. आम्ही म्हणजे मी नवरा आणि आमची अडीच वर्षाची लेक आणि कधी कधी काही मित्रमंडळी. उन्हाळ्यात तर दर दोन चार वीकेंड नंतर आम्ही कॅम्पिंगला जात असतो. या उन्हाळ्यात आत्तापर्यंत तीन वेळा कार कॅम्पिंग झालं. कार कॅम्पिंग मधे राहण्या खाण्याच्या सगळ्या गोष्टी रहाण्याच्या ठिकाणापर्यंत आम्ही कार मधुन नेतो. पूर्वी बर्‍याच वेळा आळस करून फक्त मॅगी आणि रेडिमेड उपमा पाकिटेच घेऊन जायचो. आता पोरीसाठी नव-नवीन प्रयोग करायला लागलो आहे. यावर्षी एकावेळी आम्ही पास्ता करण्यासाठी लागणारं सगळं सामान घेऊन गेलो.

शेफ परेड

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 15/10/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्लोवाकियामध्ये आल्यापासून इथली खाद्यसंस्कॄती, जेवणातील काही प्रमुख पदार्थ शिकायची खूप दिवसापासून इच्छा होती. ती आता पूर्ण होणार होती. फेसबुकवर Internations Bratislava ह्या नावाचा एक ग्रुप आहे. ह्या ग्रुपने २८ एप्रिलला, ब्रातिस्लावा मधे असलेल्या 'शेफ परेड" ह्या कुकिंग स्कूल मधे स्लोवाक कुकिंगचा प्रोग्रॅम आयोजित केला होता. मी ह्या ग्रुपची सदस्य असल्यामुळे मला त्याचे निमंत्रण आले होते. मी लगेचच पैसे भरुन माझी जागा निश्चित केली होती. आता मी २८ एप्रिलची वाट बघत होते. शेफ परेड हे स्लोवाकिया मधील पहिले प्रसिद्ध कुकिंग स्कुल आहे. ह्याची सुरवात २०११ मधे झाली. इथे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात.