Skip to main content

काही कविता

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 24/10/2015 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
. . "मुग्धा" उपमा विशेषण तुला पुरेना नाव साजीरे ओठी ठरेना कसे सुटावे क्लिष्ट कोडे आई-बाबा, आजी-आजोबांनाही कळेना! लखलख चमचम नभांगणातील | नक्षत्राचा तारा तू | माणिक-मोती, नीलम पाचू | अव्वल रत्ना हिरा तू || तू परी तू मंदाकिनी | निलाक्षी सुनयना तू | तू पल्लवी तू गोजिरी | सुहासिनी सुवदना तू || सकवार सोनाली तू | हळुवार हसरी स्मिता तू | तू रूपाली तू रातराणी | सुमना तू प्राजक्ता तू || तू मधुरा तू क

ही कसली उस्तुकता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 24/10/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ही कसली उस्तुकता? काल दसरा झाला. आज सर्व पेपरना सुट्टी.लोकसत्ता तेव्हडा चालू, म्हणून मिळाला. लोकसत्ता अपवादानं हाती येतो. कागद, छपाई दर्जेेदार ,मन भरुन आलं. मनात आलं पेपर लावावा . किती पेपर लावणार ,किती वाचणार दुसरं मन. आणि पान नं. ८ अर्थसत्ता वर आलो,तिथं एका बातमीचं हेडिंग, “मूहुर्ताची सोने खरेदी---------- -----------बाबत उस्तुकता , काय?उस्तुकता? हा कोणता शब्द?

उस तोड़....

लेखक आनंद कांबीकर यांनी शुक्रवार, 23/10/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पहाटच् मायन् दगड्याला बापाचा जुनाट सदरा घातला. बाह्या दुमटवल्या. गळयापासून पायापर्यंत तो झाकून गेला. चिमि अजुन झोपेतच् होती. मायन् तिला शेजारच्या कोपितल्या म्हातारी जवळ टाकलं. हातात कोयती घेऊन सगळे कोपीवाले निघाले. "का गं? दगडूला कामुण घेतलं आज संग?" सोबतच्या एकिन् मायला विचारलं. "अ गं! गेल्या हप्ती हाताला कोयतं लागून घेतलं म्हणून घरी ठीवलं त् त्या आंब्याखली जुगारी लोकाइला सिगरेटी-फुटान आणून द्यायला पळु लागलं. मनुन मनलं घीउ संगच्. तेव्हढच् चार दोन मोळ्या बी बांधू लागल." मायन सांगून टाकलं. दगडू सगळ्यांच्या पुढे कनाकना पाय उचलत चालत होता.

शिरवळ्या /शेवया.

लेखक इन्ना यांनी शुक्रवार, 23/10/2015 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाककॄती ह्या सदरात काही लिहीतेय ह्याच मलाच खरतर जाम हसू येतय . त्यातही हा पदार्थ कोकणातला फार खटाटोपाचा. मुद्दम इथे लिहितेय कारण एक हाती पाऊण तासात बनवून उत्तम ( आजीची आठवण झाली वगैरे कॉम्पीमेंट्स मिळवण्याइतका ) झाला . दसर्‍याला सहसा बासुंडी करतात आमच्या घरी. ह्यावेळी वेगळ काही कराव म्हणून हा घाट घातला . ( घाट घातला म्हणजे कसं भारदस्त , खूप कठीण पदार्थ जन्माला घातल्याचा फील येतो ;) ) माझ्या स्वैपाकघरातल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असल्यानी , आयत्यावेळी श्रिखंड आणायच मनात योजून ठेवल होतं .

चापण्याचा हव्यास

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/10/2015 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो गळ्याचा फास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे ती~ उपाशी ठेवू पाही, खाणे~ मज, जल्लोष होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता पो~कळितल्या खर्जातुनी, तक्रारीचा आवाज होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी
काव्यरस

नात्याला अर्थ पुरेसा.....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 23/10/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव? संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… … गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव… जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव…. तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव… ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे? ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
काव्यरस

(जेव्हा) काहीच करू नये. (असं वाटतं)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/10/2015 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
“काहीच करायचं नाही”,किंवा “असाच कुठे तरी वेळ घालवायचा” याचा अर्थ जीवनात कुणी आळशी असणं किंवा कुणी निष्क्रिय असणं असं नव्हे.” त्या दिवशी मी नरेंद्राच्या घरी काही कामासाठी गेलो होतो.तो एकटाच घरी होता.अगदी कंटाळलेला दिसला. “कायरे,नरेंद्रा अगदीच कंटाळलेला दिसतोस.बायको घरी नाही म्हणून तुझा वेळ जात नाही काय?” मी नरेंद्राला कुतूहल म्हणून विचारलं. “काहीच करू नये असं मला बरेच वेळा वाटतं.बरेच लोक त्याकडे निराळ्या अर्थाने पहातात तो अर्थ नव्हे .काहीच करू नये याचा अर्थ-चांगला आलेला दिवस मस्त घालवावा,अमुक ठिकाणी जाणार आहे,निर्दिष्ट स्थानाकडे जाणार आहे, असं न समजून चालत रहावं असं वाटतं.जीवनातले आनंदाचे क्ष

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १० इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/10/2015 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

बायपास...

लेखक आनंद कांबीकर यांनी शुक्रवार, 23/10/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
खुप मजा यायाची गावांत. पूर्वी एवढा पैसा कधीच दिसायचाच नाही. व्यवहार ज्वारी, बाजरी आणि गहु यांवर चालायचे. आठाभर बाजारी घातली कि हप्ताभरच्या चहाची सोय व्हायची. लोकं कष्टाळु होती तशीच प्रेमळ ही खुप होती. कुना एकाच्या दुःखावर अख्खी गल्लीच काय तर गांव गोळा व्हायचा. हाड़ाचं वैर असलं तरि दवाखाना म्हटलं कि उतरंडीत ठेवालेले पै पैसे निघायचे. अडल्या बाळंतनीला तालुक्याला नेयाला निम्म्यारातिला गाड्या जूपायच्या. पण ती अडदंड सड़क गावाला घासुन गेली अणि गांव बदलला. गावाचा भूगोल बदलला तसेच मानसशास्त्र हि बदलले. लोकांना पैस्याचा हव्यास जड़ला. कारखाने आले, मोठ मोठी दुकानं थाटली. लांडगी वाढली.

मूठभर खजूर [पूर्वार्ध]

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 22/10/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
मूठभर खजूर [पूर्वार्ध] (El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.) नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत! वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत.