Skip to main content

श्री गणेशोत्सव - अजुन काही ऐतिहासिक कविता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 20/09/2023 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे. सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ १. दामोदर हरि - वय २७, २. बाळकृष्ण हरि - वय २४ आणि ३. वासुदेव हरि - वय १८. दामोदर आणि बाळकृष्ण ह्यांनी गणेशखिंडीत रॅन्ड ह्या अधिकार्‍याचा वध केला.

मढे-घाटाची अनवट वाट, रॅपलिंगचा थरार आणि गुंजवणीकाठची अंतरोली

लेखक चक्कर_बंडा यांनी बुधवार, 20/09/2023 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मढे-घाटाची अनवट वाट A पुर्वीचा अतिदुर्गम अशी बिरुदावली मिरवणारा व त्यामुळेच निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय समृद्ध असणारा, "प्रचंडगड" तोरणाच्या छत्रछायेखाली स्वतःचं अनवट वेगळेपण राखून असलेला तालुका म्हणजे "वेल्हा".

श्रीगणेश लेखमाला २०२३ - हळूहळू सवय होईल - रिलोडेड

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 20/09/2023 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्रज्ञानाने जग इतकं छोटं झालंय की अंतर्देशीय व तार यंत्राच्या जमान्यातला मी स्काइप आणि कायप्पावर मुलीला प्रत्यक्ष बघताना अचंबित झालो होतो. अर्थात याचीही हळूहळू सवय होत गेली. आता सकाळ-संध्याकाळ मोबाइलवर बोलणं दररोजचा दिनक्रम झाला. आता तिचं नसणं आंगवळणी पडलं. पुढे शिक्षण झालं, मनासारखा साथीदार मिळाला. आता एफडीवरचं व्याज मिळण्याची वेळ आली आणि आमची परदेशी जाण्याची बारी आली. पहिलटकरणीसारखी मन:स्थिती, काय होईल कसं होईल.. पण मुलांनी सूत्रं हाती घेतली आणी दे मेड इट पॉसिबल.... (अम्रीकेत जायचं म्हणजे थोडी प्रॅक्टिस नको!) बाकी... जाईन विचारीत रानफुला... हे होतंच ना.

दोन ओळींची कविता,......

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 20/09/2023 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छापत्र लिहून, संपत्तीची वाटणी केली वाचून बघ म्हंटल तर, दोन टिपे गाळून, तीने पावती दिली बघता बघता ढग भरून आले मधेच विज कडाडून गेली काय कमावले,किती कमावले, "ती", दोन टिपे खुप काही सांगून गेली तुमचं आपलं काहीतरीच बाबा,...... कागदावरची अक्षरे धुसर झाली दोन ओळीची कविता, बरेच काही सांगून गेली तीची दोन टिपे ,माझी दोन टिपे, जेव्हां एकत्र झाली.... वाटले, हरिद्वारची गंगाच दारी आली
काव्यरस