Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 12/11/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, छायाचित्रणकला स्पर्धेच्या १४व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रवेशिका व स्पर्धेसाठी नसलेली छायाचित्रेही एकाहून एक होती. मत नोंदवणार्‍या अनेक मिपाकरांनीही हीच भावना व्यक्त केली आहे. तृतीय क्रमांक मिळाला आहे, मिनियन यांच्या येलोस्टोन तलावाच्या छायाचित्राला.

अंजीर बर्फी

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 12/11/2015 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सुकामेवा = १ कप सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन) खजुर = ७-८ तुप = ३ चमचे वेलची पावडर = १ छोटा चमचा जायफळ पावडर = १ छोटा चमचा कृती: १. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा. b1 २. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे. b2 ३.

सांज प्रहरी

लेखक तिमा यांनी बुधवार, 11/11/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम प्रहरी, या सुंदर गाण्याचे एक करुण विडंबन. सर्व पीडित स्त्रियांना अर्पण मूळ गाणे: http://www.aathavanitli-gani.com/Song/Ram_Prahari_Ram_Gatha सांज प्रहरी मार गाथा, वेदना ओठांवरी या वळांनी आसूडाचे चित्र हे पाठीवरी आवडीने चोळितो तो मीठ हे जखमांवरी मार खाता क्षीण काया कोसळे या भूवरी एककल्ली, संशयी तो, नशाधुंदी ज्या सदा भोगदासी मी तयाची दु:ख साही सर्वदा तोचि तारण, तोचि मारण, तोचि माझा सोयरी
काव्यरस

पुणे भेट

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 11/11/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी सुट्टी असून सुद्धा काम देतात च्यायला . लाज लज्जा शरम सगळं विकून आलेत हे लोक. कॉम्प ऑफ आणि एक्स्ट्रा पे ची लालूच दाखवून काम करवून घेतात . आणि आम्ही त्याला बळी पडलो . पण जाऊदे . संपलीच दिवाळी . तर , मुद्दा असा कि लैच कटाळा येतोय . आणि कोकणात जाण्यास सोबती मिळत नाहीये . पण बेळगावातून बाहेर पडायचं आहे , आणि पुण्याशिवाय दुसरी जागा सुचत नाहीये . त्यामुळे , पुढल्या रविवारी(म्हणजे २२ नोवेंबर ला ) पुण्यात येणे होईल . होऊन जाऊद्या एक कट्टा . काय म्हणता ?? वेळ :- सकाळी ५ - ६ दरम्यान पोचेन .

भूतकथा - किल्लेदार

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 11/11/2015 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
(*सूचना - फेसबुक वरील लोकप्रिय पेज भुताटकी (4400+LIKES) या पेज वरील लोकप्रिय कथा इथे देत आहे .

पेढे

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 11/11/2015 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या देशात पेढे, चितळ्यांची बाकरवडी असले काही पदार्थ मिळत नाहीत मग असे काही खायचे असेल तर दोन पर्याय उरतात एक म्हणजे मायभूत गेले की खाऊन, बांधून घ्या नाहीतर इथे घरी करा. लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला पेढे करायचे म्हणजे खवा घरी करण्यापासून तयारी, मग काहीतरी आयडिया लढवता येते का पाहिले आणि जादूची कांडी फिरून अवघ्या ५ मिनिटात पेढे फक्त वळायचे बाकी राहिले. तर आजच्या लक्ष्मीपूजनासाठीचे हे पेढे- साहित्य- १ कप मिल्क पावडर(मी नेस्ले ची निडो घेतली.), ५ ते ६ चमचे मिल्कमेड(नेस्लेचे मिलकमेड घेतले), २ टेबलस्पून साजूक तूप, २ टे स्पून पिठीसाखर (मिल्कमेड गोड असते त्यामुळे साखरेची गोडी आवडीनुसार कमी जास्त

चीनमधील "अकेले अकेले" - आज आहे ११/११

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 11/11/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज आहे ११/११ - चीन मधील एक महत्वाचा दिवस, आणि बहुतेक जगात इतरत्र कुठेही "साजरा" न होणारा दिवस (निदान चीन मध्ये होतो तितक्या जोरात) ! तुम्हालाही बहुतेक माहीत नसेल आज चीनमध्ये काय धमाल होते आहे - तेव्हा सांगतो.

'भडास (कादंबरी)' वरील साहित्यिक प्रतिक्रीयांची ज्ञानकोशीय दखल घेण्याच्या दृष्टीने एक उहापोह

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/11/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या एका ऑनलाईन दिवाळी अंकाने नव्वदोत्तरी साहित्य अशा स्वरूपाची थीम त्यांच्या दिवाळी अंकासाठी निवडली. या धागालेखाचा उद्देश नव्वदोत्तरी साहित्याचीपर्यंतचा मर्यादीत नाही, (लेखविषयात नमुद 'भडास (कादंबरी)' मात्र नव्वदोत्तरी साहीत्यातील महत्वाची कादंबरी असल्याच्या किमान काही प्रमाणावर साहित्यिक प्रतिक्रीया असाव्यात.

निरीक्षण शब्दांच्या अपभ्रंशाचे

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 11/11/2015 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
"सचीन शतकांसाठीच खेळायचा" कपील पा जी म्हणाला,"त्याच्यातल्या क्षमतेला अल्पसंतुष्टवृत्तीमुळे न्याय मिळाला नाही". मी वेगळाच विचार करत होतो. बंगाली साहित्यातून सुंदर नावं आली आहेत,मूळ शची +इंद्र =शचींद्र असावे ,मग उच्चाराला सोपे करण्यासाठी जसा देवेंद्रचा देवेन होतो तसा शचींद्रचा शचीन व पुढे सचीन झाला असावा.

शरद मामा

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 11/11/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
शरद मामा शरद मामा माझा सख्खा मामा... शरद मामा, भटजी... सध्या पालीला असतो. दोन मुलीआहेत, एकिचं लग्न झालंय आणि दुसरी अजून शाळेत आहे.