Skip to main content

किर्रक्केट

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/11/2015 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
'किर्रक्केट' क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस!   आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे'...

पावडर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 17/11/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.) **************************************************************************** गोष्ट तशी फारशी जुनी नाही. सहा आठ महिन्यांपूर्वी मी माझे गुजरात राजस्थान मधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षीच पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते.

कमोदिनी काय जाणे तो परिमळ

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 17/11/2015 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : गेले काही दिवस मिपावर फार मजेशीर प्रकार चालु आहे (म्हणजे तसा तो आधी पासुन चालु असावा, माझ्या निदर्शनास नुकताच आलाय.) काहीतरी अल्पस्वल्प वाचनाने आपले स्वतःचे काही तरी एकांगी मत बनवुन घ्यायचे, ते पकडुन कचकुन लेख पाडायचा , भले मग इतरांच्या भावना दुखावल्या जाओ न जाओ आपल्याला त्याच्याशी काय .

दोन वेडे !

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 16/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र झाली होती. विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता. मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती. "मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला. "अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत." "येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही." "विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही." "मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर." मार्कचा आवाज कंप पावत होता. "मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं." कोण ? सिकंदर ?" "नाही, सर आर.एम.

नवा पाहुणा - शिक्रा (इंडियन स्पॅरो हॉक)

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 16/11/2015 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
गेले पाचेक महिने घरा मागच्या हिरवाईत पोपट वगळता सामसूम होती. उरली ती कावळ्यांची कावकाव. नतदृष्ट कावळ्यांनी आसपासच्या झाडात तीन चार घरटी बांधली आणि त्यांच्या उपद्रवाला कंटाळुन खंड्या, हळ्द्या, दयाळ, बुलबुल, कोतवाल, तांबट, नर्तक, सनबर्डस वगैरे मंडळी दूर गेली. पोपट मात्र कावळ्यांना पुरून उरत होते आणि धिटाईनं वावरत होते. हळुहळु कावळ्यांची पिल्लं बहुधा मोठी होउन उडू लागली असावीत कारण वावर जरा कमी झालेला दिसला. साधारण महिन्या दिड महिन्यापूर्वी अचानक या जुन्या पाहुण्यांची चाहुल लागली आणि आनंद झाला.

न फिटणारं कर्ज... एक रुपयाचं

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 16/11/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्कूटर होती माझ्याकडे, हवा कमी झालेली, हवा भरली मग घाटाजवळच्या पंचरवाल्याकड़े, सुट्टे नव्हते, म्हणाला नंतर दे...त्यात काय एवढं, २-३महिन्यानी त्याच रोड वरुन गेलो, आता स्पेंडर होती हातात न कानात हेडफोन, सुट्टे असून पैसे न देता, घाइत होतो, अर्थात दुर्लक्ष करत, मग अनेकदा गेलो त्याच रोड वरून, त्या गोष्टीला आता दीड दशक होईल, अजुन ही जातो आता सैंट्रो असते, कर्ज वाढत चाल्लैय! तो रुपया अजुन दिलेला नाहिये, २-३ वर्षा पूर्वी मुद्दामून त्या रोड वर जरा स्लो झालो, खंत अजुनही होती मनात, पण दूकान नव्हतं ते, निराश झालो! वेळ असून वेळ गेलेली, आयुष्यभर सतावणार ती हवा!

एकसष्ठी , शाळकरी मित्र भेट आणि मुंपुमुं

लेखक नाखु यांनी सोमवार, 16/11/2015 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका विलक्षण जोगायोगाला सामोरा गेलो. हो हो जोगा योगाचा अर्थ सांगतो जुळवलेला योग आणि नंतर आपोआप आलेला योगायोग. त्याचे असे झाले नातेवाइकांमधील एक एका दूरच्या नातेवाईकांची एकसष्ठी कार्यक्रम होता.पुण्याच्या दक्षीण भागात. अनायसे लेकाला दिवाळीची सुट्टी मग त्याला एखादा सिनेमा दाखवावा हा कार्यक्रम झाल्यावर.त्या अनुषंगाने राहुल सिनेमाग्रुहात तिकिटे आरक्षीत केली आणि सक्काळी व्हाया (तुळशीबाग: फक्त चहा पावडर खरेदी व लेकासाठी चाम्डी कंबरपट्टा - पक्षी बेल्ट )खरेदी करून. अता कार्यक्र्माची वेळ सकाळी दहाची आणि कार्यक्रम स्थळी मी , मुलगा आणि उत्सवमुर्ती कुटुंब इतकेच होतो.

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

लेखक मार्गी यांनी सोमवार, 16/11/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक पहिलं शतक सायकलीवर पहिलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकासाठी जास्त वेळ थांबावं लागलं. सुरुवातीच्या राईडसनंतर काही आठवडे कामानिमित्त प्रवास करावा लागला.

सेकंड हनीमून

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 16/11/2015 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंड हनीमून .............................................................. सेकंड हनीमून च्या कल्पनेनं ति मोहोरुन गेली होती. ४२ ची झाली होती ति.. पार्लर मध्ये जाऊन केस ट्रिम केले होते, फेसियल..काय, काय काय चाललं होत तिच.. थट्टेत विचारले त्याने... गप्प रे तुला काही कळत नाही..त्याला गप्प केलं. . हिल स्टेशन च ते रम्य अन शांत वातावरण, सार वातावरण धुंद होते. ति त्याच्या मिठीत पहुडली होती. सार त्याला आठवलं.. ति पहिली भेट..उडालेली तारांबळ.. श्वासांचे तुफान..नजर मीळवण अन चोरण ते वाट पाहणं... सारच रोम्यान्टीक होते.. ते वय वेड होते..ती विशीतली कोवळी कळी होती..त्याची गद्धे पंचविशी नुकतीच संपत होती.. अन द

गुन्हा - 'तोंडातल्या तोंडात आणि गतीयुक्त शब्द्फेक'

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 16/11/2015 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात खुप खटल्यांना समोरा गेलो, खुप आहेत, अजुनही चालू आहेत, पण हे अपराध... नाही हो, कोण असतो परफेक्ट मला सांगा. माझ्या वरचा एक नेहमी ठोकला जाणारा आरोप म्हणजे 'समीर फार तोंडातल्या तोंडात + फ़ास्ट बोलतो' मी मान्य केलं, कशाला कोर्ट कचेरी!? आपलं आपल्यात बघून घेउ ना...