Skip to main content

काटा वजनाचा -३

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 24/01/2016 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -१ काटा वजनाचा -२ काटा वजनाचा -३ आता पर्यंत आपण पहिले कि वजन जास्त म्हणजे किती आणि कसे मोजायचे आणि जास्त वजनाचे तोटे काय आहेत. आता आपण हे पाहणार आहोत कि काही लोकांचे वजन पटकन का वाढते आणि काही लोकांचे काहीही केले तरी का वाढत नाही. प्रथम एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे -- केवळ जास्त वजन म्हणजे जास्त चरबी नव्हे.

डॉलर

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 23/01/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
ईच्छा माझी ,लिहावे नवे शब्द न वाचलेले ,लिहावे नवे काव्य मनाला उसवनाऱ्या ,लिहाव्या नव्या पंक्ती न भासणाऱ्या नको ,त्याच त्या व्यक्ती शिकवले मला ,जेव्हा होईल मी मोठा , दुख: माझी होतील लहान पण आज मला भीती ,लोकांची ,समाजाची कोण महान अन कोण लहान ? वाटते पुन्हा ह्यावे लहान , झोपताना ऐकावी आईची अंगाई , कधीकधी जातो मी जुन्या दिवसात जिथं असते झोपेबरोबर रजाई वाटत पुन्हा ,जावं भावाबरोबर , एकसारखी,एकारंगाची ,कपडे घालून भटकावं गावभर , चिंचा बोऱ अन वाऱ्यावर भिरभिरणारा पतंग बनवावे किल्ले अन जहाज तेव्हा ह्यायचे होत मोठ लवकर अन आज मी मलाच म्हणतो , ऊठ…कमवायचेत तुला खूप सारे 'डॉलर' (sorry f
काव्यरस

हिटलरने खरंच आत्महत्या केली का?

लेखक ऋत्विका यांनी शनिवार, 23/01/2016 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरं महायुद्ध अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. जर्मनीचा पूर्ण पराभव झाल्याचं स्पष्टं झालं होतं. फॅसिस्ट इटलीने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करलीच होती. इटालियन कम्युनिस्टांनी बेनिटो मुसोलिनी आणि त्याची रखेली क्लारा पेटाक्सी यांना गोळ्या घालून त्यांच्या मृतदेहांची जाहीर विटंबना केल्याची बातमी नुकतीच बर्लिनमध्ये आली होती. ती बातमी येण्यापूर्वीच रशियाची रेड आर्मी बर्लिनमध्ये शिरलेली होती. बर्लिनच्या चौकाचौकांतून जर्मन सैनिकांचा प्रतिकार सुरु होता, परंतु पुढे झेपावणार्‍या रशियन आर्मीला थोपवण्यात जर्मन सैनिक अयशस्वी ठरत होते.

प्रेमकथा-एका अनपेक्षित वळणावर-गोष्ट तुझी न माझी (भाग-2)

लेखक Savnil यांनी शनिवार, 23/01/2016 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
काळ वेळ क्षण सार कही तिच्या अवति भोवती गोठून गेल होत.निलांबरीला स्वताच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता बसत की खरच समोर तो उभा आहे. तिला अजूनही हां भासच वाटत होता.इतक्यात कोणीतरी घाईगड़बड़ित असणाऱ्या प्रवाश्याचा तिला धक्का लागला आणि ती आपल्या भावविश्वातून भानावर आली.मनातल्या मनात चरफडत तिने त्या प्रवाश्याला चार स्त्रिसुलभ शिव्या घातल्या.आणि पुन्हा एकदा नीलांबरी त्याला न्याहाळु लागली.नक्की तोच आहेना.हसरा चेहरा ,कुरळे केस, तजेलदार पण खोडकर डोळे ,बोलघेवडा कोणाशी बोलायला लागला की त्या व्यक्तीला आपलस करणारा,सावळा रंग.कदाचित सावळा होता म्हणूनच घरच्यानी त्याच नाव कृष्णा ठेवल होत.

सायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)

लेखक मोदक यांनी शनिवार, 23/01/2016 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
...नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला सकाळी कडाक्याच्या थंडीत जाग आली. सगळा परिसर धुक्याची दुलई पांघरून झोपी गेला होता. सुर्योदय होण्याआधी मी आवरले. थोड्या वेळात अमित आणि किरणही उठले व आवरू लागले. काल जेवताना व नंतरही आमचे बरेच वेगवेगळे प्लॅन्स ठरत होते व रद्द होते. तापोळा-बामणोली-सातारा-पुणे असे जायचे की पुन्हा महाबळेश्वर-पुणे करायचे वगैरे चर्चा झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 23/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.