डनिंग-क्रुगर इफेक्ट
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
अजून एक बार..
गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं.
एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं.
मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!)
दुपार थोडी अधिकच टळटळत होतं.
माझी ज्यूरी ड्युटी २
इथून पुढे चालू
आमच्या कोर्टाचा पुकारा होताच आम्ही सगळे हळूहळू कोर्टात हजर झालो. दारात एक कडक चेहर्याची पोलिसाच्या वेषातली कृष्णवर्णीय स्त्री होती. ती शेरीफ असल्याचे कळले. त्या बाईने होतकरू ज्युररांच्या यादीत प्रत्येकाचे नाव पाहून मगच त्यांना बसायची अनुमती दिली. एक म्हातारा ज्यूरर होता त्याने डोक्यावर टोपी घातली होती ती त्याला काढायला लावली. थंडीचे दिवस होते. म्हातारा म्हणाला की त्याला थंडी वाजते आहे म्हणून तो टोपी घालून आला आहे पण कोर्टाचा नियम असल्यामुळे त्याला टोपी काढणे भाग पडले.
माहेर वारी
पोचता पोचता उंबऱ्याशी माहेरच्या,
मनाच्या अंगणात पडतो आठवणींचा सडा
नव्याने अनुभवताना सवयीची माया
नकळत जातात भिजून, पापण्यांच्या कडा
परत परत लागतात शोधावे,
'माझ्या' कपाटात सजलेले अनोळखी खण
जुनाट फोटोत डोकावणारे सवंगडी
आठवतात नुसतेच बनून 'काही' जण
मायेच्या ऊन ऊन घासांत,
न शोधताच सापडते अमृताची चव
कौतुकानं लावलेल्या वेलीवर जुईच्या,
हवं तेव्हा चमकतं, लबाड दवं
गप्पांच्या फडात लावतात हजेरी,
हव्या - नकोशा नात्यांचे बेमालूम पाश
पायाखालच्या रस्त्यात खुणेला मिळतं,
चिमुकल्या डोळ्यांनी साठवलेलं हक्काचं आकाश
दरवेळी घेणं माहेराचा निरोप,
नव्यानं भासतो, नावराईच्या पाठवणीइतकाच कठीण
बांधून आसवं, निघायचं हसत
काव्यरस
माझा "वाचक" मित्र आणि मी!!
"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.
मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"
आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.
मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस. आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस.
अतृप्त.
ती उजव्या हाताला वळाली आणि थोडे पुढे येताच जसजसा मेन रोडवरील लाईटचा प्रकाश अंधुक होऊ लागला तसे गडद होत जाणाऱ्या अंधाराने आणि थंडीने तिला आज अमावस्या असल्याची जाणीव झाली आणि तिची पावले आता झपझप पडू लागली.
काळ्याकुट्ट अंधारातून कुडकुडत चालताना आपल्या मागून कोणीतरी येत आहे असा तिला भास झाला पण मागे वळून पहायचे तिने टाळले.आपले दोन्ही हात आपल्याच शरीराशी घट्ट पकडत ती थंडीची तिव्रता कमी करायचा प्रयत्न करू लागली तिला जिथे जायचे होते त्या ठिकाणाचे अंतर जसजसे कमी होऊ लागले तसे तिला आपल्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असे वाटू लागले नव्हे आता कोणाची तरी चाहूल तिला लागली आणि आता तिचा जीव भीतीने खालीवर होऊ ल
पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!
पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!
पुण्याच्या 'राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातर्फे देशोदेशीचे उत्तम चित्रपट दाखवणारा फिल्म क्लब चालवला जातो. दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता संग्रहालयाच्या प्रभात रोड येथील इमारतीमधील थिएटरमधे हे चित्रपट दाखवले जातात. या फिल्म क्लबची वार्षिक वर्गणी रु. १,५००/- आहे. हा खर्च आपल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीत सुमारे तीन ते चार चित्रपट पाहण्याइतका आहे. यात वर्षभरात देशोदेशीचे निवडक असे किमान ५२ चित्रपट पाहता येतात. याशिवाय जानेवारीमधे पुण्यात होणार्या इंटरनॅशनल फेस्टिवलच्या पासाच्या किंमतीत सवलत मिळते.
सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
मिसळपाव