सध्या आरसीसी बांधकामाचा खर्च काय आहे ?,तो कसा कमी करता येईल.?
माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत
१. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ?
ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.
मिसळपाव
मी लहान असताना माझ्या जगाचे २ भाग होते. अद्भुतरम्य वाटणारं एक पुस्तकांनी रंगवलेलं जग आणि बुचकळ्यात पाडणारं एक आजुबाजुच्या मोठ्या माणसांचं जग. एका भागातलं जग फारच सुरम्य आणि सुरस होतं. त्यातली पात्रं चमत्कारीक होती, विक्षिप्त होती, ती मला त्यांच्या गोष्टी सांगायची. त्यांच्याबरोबर मी हळदीघाट पाहिला, शाहिस्तेखानाची बोटं तुटताना स्वत:ची बोटं अचंब्याने तोंडात घातली, अफझलखानाच्या शामियान्यात महाराजांना वाघनखं खुपसताना पाहिली.