Skip to main content

बेधुंद (भाग ६ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 27/04/2016 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्याच रात्री अजीत नित्याच्या रूम वर आला . आदित्य अन रवी पण बरोबर होते . आतून दरवाजा बंद केल्याने आत काय चाललं आहे हे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळायला मार्ग नव्हता . तसही भीतीने किंवा 'उगीच लफड्यात का पडायचे !' म्हणून आधीच बाकीचे विद्यार्थी आपापल्या रूममध्ये जाऊन बसले होते . रूम मध्ये नित्या , सुऱ्या , तात्या , चंद्या अन अक्षा हे सारे होते . अजीत खाली बसला होता अन त्याची मान त्याच्या गुडघ्यामध्ये होती . 'मेस' मध्ये पिसाळलेल्या जनावरासारखा अजित आता एखाद्या लहान मुलासारखा बसला होता . 'करीयर' पण काय भयानक गोष्ठ असतें नाही ! त्याच्या समोर सुऱ्या उभा होता .

एक संघ मैदानातला - भाग १

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 27/04/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांच्या फायनली परीक्षा आटपल्या प्रँक्टीसला पुन्हा सुरुवात झाली. परत एकदा सकाळ संध्याकाळच मैदान गजबजायला लागलं. ह्या सिजानला लागोपाठ ६ स्टेट लेवल खेळायच्या आहेत म्हणल्यावर पोरींनी पण जोर धरला होता. आम्हाला चांगलं रगडून घ्यायचा आप्पांचा प्लान होता. त्यातच अशी बातमी आली की नँशलचे सिलेक्टर ह्या टूर्नामेंट बघूनच १८ ची टीम सिलेक्ट करणार आणि मग कॅम्प लावून फायनल १२ काढणार. मग तर काय हाणा-मारीला ऊत आला. कबड्डी कमी आणि कुस्तीचा आखाडा जास्त वाटायला लागलं मैदान. एवढ्या दिवसानंतर उतरले होते. सगळं अंग दुखत होते. ३ महिन्याच्या गँप नंतर उतरल्यावर दुसरे काय होणार ? तंगड्या गळ्यात आल्या होत्या.

(तिफण गोफण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 27/04/2016 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुळाक्षरे १ येते ऊबळ अधून -मधून , खाजर्या धाग्याची , टाळ्याखाऊ हर्षाची , तुझ्या कुजक्या शेर्यांची , अन त्यावर केलेल्या फेर्याची … येते सणक अधून -मधून , खुसपटी लिखाणाची , निसटलेल्या अर्थाची , तुझ्या डोळ्यातील अविश्वासाची , अन एकाचवेळी मिळालेल्या खेटरांची …. येते सुरसुरी अधून -सुरसुरी रतीबाच्या गवळ्याची , लागो झकाझकींची , तुझ्या खरडीतील (केलेल्या) मातीची , अन त्या क्षणी उडालेल्या एका आय्डीची …… ==================================== मुळाक्षरे २ ज्या लिखाणाला ऊंडारायचे(च) असते वाहवायचे अस

मि पा सदस्यांचे मत हवे आहे

लेखक shindebv यांनी बुधवार, 27/04/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे. हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी. खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले.

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 27/04/2016 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते!

सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 26/04/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

एक होती...

लेखक विजय पुरोहित यांनी मंगळवार, 26/04/2016 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
क्रींऽऽऽऽऽऽऽ गजराच्या कर्कश्श आवाजाने विवानला जाग आली. सकाळचे ७ वाजले होते. थोड्याशा अनिच्छेनेच तो आळोखेपिळोखे देत उठला. डोळे जरा कष्टानेच उघडल्यावर त्याने नजर आजूबाजूला फिरवली. ते कळाखाऊ घर बघून त्याला थोडंसं खिन्नच वाटलं. इथे आता सकाळी उठल्यावर चहा घेऊन आपली आई येणार नाही याची जाणीव त्याला अधिकच उदास करुन गेली. नुकतीच त्याची बदली या ग्रामीण आदिवासी भागात झालेली होती. इकडे येण्यास तसा तो नाराजच होता. परंतु येथे एक दोन वर्षे काम केल्यावर त्याला प्रमोशनसहित मुंबईत काम करण्याची संधी मिळेल, अशी साहेबांनी लालूच दाखवलेली होती. त्याला देखील ही ऑफर आवडलेली होती.

कहे कबीर (३)- उड जायेगा हंस अकेला

लेखक मनमेघ यांनी मंगळवार, 26/04/2016 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
उड़ जाएगा हंस अकेला। जग दर्शन का मेला ।। धृ ।। जैसे पात गिरे तरुवर के । मिलना बहुत दुहेला । ना जानू किधर गिरेगा । लग्या पवन का रेला ।। 1 ।। जब होवे उमर पूरी । जब छूटेगा हुकुम हुजूरी । जम के दूत बड़े मजबूत । जम से पड़ा झमेला ।।2 ।। दास कबीर हर के गुण गावे । वा हर को पार न पावे । गुरु की करनी गुरु जाएगा । चेले की करनी चेला ।। 3 ।। - तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन. आत्म्याला पक्ष्याची आणि देहाला पिंजऱ्याची उपमा अनेक काव्यातून दिसते. कबीरांनीही पक्ष्याची उपमा दिली आहे. मग ते हंसच का म्हणाले असावेत? हंसचं उलट केलं की सहं (अपभ्रंशाने सो$हं) होतं.

पुस्तक वेल्हाळ (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 26/04/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
Header पु पुस्तकाचा आणि पुण्याचा माझ्या मते एकच. मराठी पुस्तकांची जास्तीत जास्त प्रकाशने पुण्यात आहेत. पुण्याचा आणि पुस्तकांचा प्रथम परिचय करून दिला एका पुस्तक वेल्हाळाने. तसे तर वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचून काढायची हौस फार. शालेय पर्वात आसपासच्या सगळ्या लायब्रऱ्या घासून पुसून वाचलेल्या. अगदी चांदोबापासून ते सुशि, बाबा कदम पर्यंत. कॉलेजात गेल्यावर जरा दर्जेदार वाचनाची ओढ निर्माण झाली. पु.ल., गोनीदा, ना.सं.