Skip to main content

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 03/05/2016 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !

समन्वय व ताळमेळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 02/05/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक तरुण मुलगा राहतं होता त्याला २ बहिणी होत्या एकुलता एक भाऊ असल्याने २ न हि बहिणी ची भावा वर माया असते.. तिघेही गरिबीत दिवस काढत असतात भावाचे लग्न ठरते ..मुलगी गरीब घरची असते ... लग्ना निमित्त भावास एक नवा शर्ट व प्यांट शिवण्याचे ठरते..व त्या प्रमाणे शिवायला टाकतो नेहमी प्रमाणे शिंपी महाराज आज देतो उद्या देतो असे करत शेवटी कसेतरी ्लग्नाच्या अधल्या दिवशी रात्री ८ वाजता कपड्याचे पार्सल त्या तरुणाला देतो.. घरी आल्यावर बहिणी वाट पाहतं असतातच..व त्या म्हणतात आधी जेवून घे... जेवण गप्पा करत चालले असते ते झाल्यावर बहीण म्हणते बघ तरी कपडे कसे झाले आहेत.. मुलगा शर्ट घालतो तो व्यवस्थित शिवलेल

यथा शास्त्रप्रमाणेनं...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 02/05/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले.

सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव

लेखक मार्गी यांनी सोमवार, 02/05/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 3

लेखक मेघना मन्दार यांनी सोमवार, 02/05/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज लंडन मधील दुसरा दिवस – नवऱ्याला ऑफिसला लौकर जायचे असल्याने लौकरच सगळं आवरून तो ऑफिसला गेला. अजून माझा लंडन ट्यूब पास काढला नसल्याने आज मला कुठे लांब फिरायला जाता येणार नव्हतं. लंडन ट्यूब म्हणलं की आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेन्सची आठवण येते. कुठल्याही ठिकाणी पोहोचण्याचा सगळ्यात जलद मार्ग. फक्त यांच्या ट्रेन्स एसी असतात आणि आपल्याइतकी गर्दी नसते. लंडन ट्यूब हि ११ लाइन्स मध्ये विभागली गेली आहे . लंडन ट्यूबचा नकाशा आपलं काम एकदम सोप्पं करून टाकतो.

पांडुरंग/पौंड्रक,आणि विट्ठल??

लेखक खालीमुंडी पाताळधुंडी यांनी सोमवार, 02/05/2016 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला. लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय, http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय. >>> महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहसनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठून आला?

एक संघ मैदानातला - भाग ४

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 02/05/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढे दिवस आमच्यातल्या वीक पाँइण्टचा आप्पांनी अभ्यास करून प्रत्येकाला वेगवेगळे व्यायामप्रकार सांगितले. जेणेकरून शारीरिक क्षमतेत आम्ही कुठे कमी पडायला नको. प्रत्येकाच्या खुबींचा आणि शारीरिक ठेवणीचा विचार करून ते व्यायाम सांगितले कारण त्यांना काहीच्या पोटऱ्याचे स्नायू जास्त ताकदवान हवे होते तर काहींचे मांड्यांचे स्नायू..

मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 02/05/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री.