Skip to main content

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क

लेखक मेघना मन्दार यांनी गुरुवार, 05/05/2016 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
हे फोटो Hyde park चे आहेत आणि एक फोटो Marble Arch चा आहे. आज इतकेच फोटो टाकता आले त्याबद्दल मी दिलगीर आहे. याच्या पुढच्या भागात आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व भागातील फोटो टाकेन. आणि त्यानंतर क्रमाक्रमाने फोटो टाकत राहीन. पुन्हा एकदा फोटो उशिरा टाकल्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. तुम्ही सर्वांनी फोटो संदर्भात केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. फोटो मोबाईल वरून काढले आहेत त्यामुळे clarity म्हणावी तितकी चांगली नाही तरी हे गोड मानून घ्यावे हि विनंती :) लौकरच पुढचे भाग आणि फोटो सुद्धा टाकेन.

'सह'ज जमेल

लेखक उल्का यांनी गुरुवार, 05/05/2016 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - मनातलं ब्लॉग्वर लिहायला लागले तेव्हा दोन महिन्यांपूर्वी हे दोन लेख लिहिले. लेखाचा सूर उपदेशात्मक आहे हे मान्य! पण ते माझे विचार मंथन आहे. सद्य परिस्थितीत काही खटकणार्या गोष्टींमुळे/वागण्यामुळे मनात आलेले विचार लिहिले आहेत म्हणुन तसा सुर त्या तमाम लोकाना उद्देशून आहे. कदाचित तुम्हालाही ह्या गोष्टी खटकत असतील असे वाटले म्हणुन तुमच्या बरोबर शेअर करते आहे. आणि म्हणुनच हे 'जनातलं मनातलं' ह्या सदराखाली लिहित आहे. :) पहिला लेख - सहज जमेल असे Kevin Abosch हा एक आइरिश फोटोग्राफर आहे. सध्या त्याचा २०१० सालचा एक फोटो चर्चेत आला आहे. फोटोचे मॉडेल आहे एक बटाटा!

आता वाटली ना काळजी ?

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/05/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले , त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते .. ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली , मेसेज करायला विसरली .

सायकलीशी जडले नाते ३१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 05/05/2016 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

[शतशब्द कथा स्पर्धा कथा : त्याग] भाग दोन (सीक्वल)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 05/05/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग (स्पर्धेत लिहिलेली कथा) ******************* अन केला सर्वस्वाचा त्याग... ******************* कोळस्याच्या राखेने, जागरणाने, इंग्रजांच्या रागाने डोळे रेलवेच्याच लाल बावट्याप्रमाणे तांबारलेले. बनारस, पॅरिस ऑफ़ द ईस्ट, इथे क्रन्तिकारी-ब्रिटिश लपछपी खेळत रोज. बनारस,पोटात धर्मदाय शिधा ,झोपायला घाट, आस एकच क्रांतिगुरु भेटावा.

सैराट आन सैराटच

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 05/05/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला.

अधांतर

लेखक समीर१२३४५६ यांनी गुरुवार, 05/05/2016 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची बाजारातील लगबग चालली होती.सर्वजण आपापल्‍या कामात मग्‍न होते. कृष्‍णाही इतर बायकांसोबत आपल्‍या कामाला लागला. आज सर्वजण दुस-या एका वाडीत जाणार होती, भिक्षा मागायला. कृष्‍णा आपला पदर सांभाळून उठतो,आणि लगबगीने आपल्‍या टोळक्‍याकडे पोहोचतो. सर्वजण मिळून नंतर दुस-या वाडीत भिक्षा मागायला जातात. कृष्‍णा आपल्‍या गोड बोलण्‍याने त्‍या समाजात खूपच प्रिय होता, मात्र आपल्‍याला त्‍या समाजात यावे लागल्‍याचे दु:खही त्‍याच्‍या मनात सलत असायचे.कृष्‍णा सर्व लोकांच्‍या टिका सहन करुनही हे काम करत होता. संपूर्ण आयुष्‍य जणू त्‍याने या कामासाठी घालवायचे ठरविले होते.

सैराट : एक दाहक वास्तव.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 05/05/2016 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर. नागराज पोपटरव मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शीत झाला आणि प्रदर्शनापूर्वीच सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा खुप झाली. आणि चित्रपट प्रदर्शनानंतरही सैराट या चित्रपटाची विविध माध्यमातून अधिक उणेची चर्चा अजूनही विविध पैलूंसह सुरुच आहे, असे दिसते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाची चर्चा खुप झाली, एक वेगळा चित्रपट म्हणुन अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली होती .

म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर

लेखक विनअता पुजारि यांनी गुरुवार, 05/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात म्हैसुर कुन्नुर आनि बन्दिपुर ला जान्याच थारवत आहे...क्रुपया महिति द्यवि.....

चला बनवुया मट्ण खिमा

लेखक गौतमी यांनी गुरुवार, 05/05/2016 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १. मटण खिमा १/२ किलो २. ४ मोठे कांदे बारीक चिरुन ३. २ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन ४. आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे) ५. २ तमालपत्र ६. ५-६ मिरी दाणे ७. तेल ८. हळद ९. लाल तिखट १०. गरम मसाला ११. मिट मसाला (मी सुहानाचा वापरला) १२. मीठ १३. बारीक चिरलेली कोथिंबिर चला तर मग करुया सुरुवात. क्रुती: १. प्रथम खिमा थोडी हळ्द आणी आल-लसुन पेस्ट(१/२ चमचा) टाकुन शिजवुन घ्या. (मी छोट्या कुकरमध्ये ५ शिट्यात शिजवुन घेतला.) २. आता खिमा थंड झाला की कढईत तेल घेउन गरम करा. (तेल जरा सढळहस्तेच घ्यायच बरं).यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. आता कांदा परतुन घ्या.