Skip to main content

पहायचं होत ग तुला एक नजर...!!!

लेखक kunal lade यांनी बुधवार, 11/05/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या भावाच्या लग्नात हे घडल होत....!!!!! पहायचं होत ग तुला एक नजर त्यासाठीच आलो होतो उन्हात फरफटत पण नशीब खोट नाही होता आल हजर.... म्हणून परत तुझ्या घरी आलो पण तू निघालीसाच नाही बाहेर.... म्हणून मित्रांच्या घोळक्यात पुन्हा शिरलो आणि तुझा भाऊ आला समोर.... म्हंटल परत करावा प्रयत्न म्हणून पोट भारलेल असताना देखील मुद्दाम पंगतीत घुसलो आणि जेवण संपल पाहून स्वतावरच हासत बसलो.... पहायचं होत ग तुला एक नजर पण नाहीच ग पाहता आल मग शेवटी काय गेलो बारवर मारली चार बिअर आणि झोपलो ढाराढूर....!!!!.
काव्यरस

माझा पहिला परदेश प्रवास - (लंडन) भाग 5

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 11/05/2016 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पाचवा हा भाग टाकायला जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व !! हा भाग जरा जास्तच मोठा झाला आहे पण फोटो सुद्धा खूप आहेत आणि एका दिवसात खूप फिरणं झालेलं असल्यामुळे शक्यतो एकाच भागात सर्व लिहिण्याचा प्रयत्न होता. पुढच्या भागांची लांबी एवढी असणार नाही याची काळजी घेईन. आज मी Hyde पार्क चालत फिरायला नाही गेले. दिवसभर एकतर चालणं खूप होत होतं. त्यामुळे सकाळी १ ते दीड तास चालून पुन्हा फिरायला बाहेर पडल्यामुळे जास्त दमायला होत होतं म्हणून ठरवलं की आता रोज Hyde पार्कला नाही जायचं. आज सुद्धा बाहेर ढगाळ वातावरण होतं. सकाळी थोडा पाऊस पडून गेला होता त्यामुळे बाहेर जरा जास्तीच थंड होतं.

सैराट - काव्यांजली

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 11/05/2016 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!

बेधुंद (भाग १०)

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 11/05/2016 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५-६ 'ल्यांड क्रुझर ' विद्यापीठात आल्या . आज विद्यापीठ एखाद्या राजकीय सभेची जागा वाटू लागले . आधीच ठरल्याप्रमाणे अश्विनी , नित्या , अक्षा अन सुऱ्या सकाळीच आपापल्या घरी निघून गेले होते , तशी सूचना त्यांना Student Council कडून आली होती . अमीरच्या वडिलाने कॉलेजच्या 'डीनला अन 'रेक्टरला' सुट्टी असताना पण बोलवले ! 'काय काय करणार आहे हि 'ब्याच' अजून ! आजपर्यंत ची सर्वात वाईट 'ब्याच' ही - ' असे कितीतरी वेळा बोलून डीन रिकामे झाले होते अन तसाच भाव 'डीनच्या' चेहऱ्यावर दिसत होता . डीन ने student council च्या फायनल एअरच्या विद्यार्थ्याबरोबर मीटिंग घेतली !

ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की

लेखक पुणे मुंग्रापं यांनी बुधवार, 11/05/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.

पाचोळा -२

लेखक स्पा यांनी बुधवार, 11/05/2016 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा -१ क्षणार्धात पायाखालची जमीन सरकली.एक बाई आणि दोन लहान मुली माझ्याकडे पाठ करुन बसलेल्या होत्या.हातातला पाण्याचा तांब्या दणक्कन खाली पडला आणि माझं लक्ष विचलित झाले त्या निमिषार्धात खोली पूर्ण रिकामी होती.तिथे आता कोणीच नव्हतं. मला भास झालेला का?

रासबेरी पाय - थोडक्यात ओळख

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 11/05/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : गावडे सरांनी ह्या इथे rbp केलेल्या विनंती वजा आज्ञेचा मान राखुन रासबेरी पाय ह्या भन्नाट गोष्टीची माहीती देण्यास हा एक अत्यंत छोटेखानी धागा काढत आहे ! __________________________________________________________

रासबेरी पाय Raspberry Pi

कल्पना करा की तुम्ही तुमचा कॉम्प्युटर खिषात घेवुन फिरु शकलात तर काय मजा येईल ! तसेही लॅपटॉप आपण पाठीवर घेवुन फिरतोच पण समजा आपल्या स्मार्टफोन प्रमाणे तुम्ही खिषात घेवुन फिरुशकलात तर काय मजा येईल नै ! ह्म्म .... नाहीना कल्पना करता येत .... "त्यात काय विशेष ?

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 11/05/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एख

अवचिता परिमळू...

लेखक मनमेघ यांनी बुधवार, 11/05/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।। चांचरती चांचरती । बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले । काय करु।। मज करा का उपचारू । अधिक तापभारू । सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।। तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू । लावण्य मनोहरू । देखियेला।। भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी । तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।। बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन । सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।। बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा । तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।। रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां?

सफर आडवळणावरील खेड्यांची....३

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 11/05/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
सफर आडवळणावरील खेड्यांची....! सफर आडवळणावरील खेड्यांची....२ ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- निघूया निघूया म्हणताना पुढच्या गावाला निघायला फारच उशीर झाला. मध्ये काही महिने मिपा वर येणच कठीण झालं होत, आता वेळ काढून परत काही लिहिण्याचा प्रयत्न करतोय, गोड मानून घ्या.